यावल येथे आज २४ मार्च जागतिक क्षयरोग दिना निमित्त मास्क सेल्फी कॅम्पेनसह विविध उपक्रमांचे आयोजन

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

आज दिनांक २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिना निमित्त येथील यावल तहसिल कार्यालयासह यावल एसटी आगारातील कर्मचारी क्षयरोग जन जागृती कार्यक्रम अंतर्गत मास्क सेल्फी कॅम्पेनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलीत. या कार्यक्रमाची सुरुवात तहसिल कार्यालयातुन करण्यात आली याप्रसंगी प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, वैद्यकिय अधिकारी डॉ बी बी बारेला , यावलचे मुख्यधिकारी बबन तडवी, फैजपुर चे मुख्यधिकारी किशोर चव्हाण , यावल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी नईम शेख , पं.स . प्रशासन अधिकारी एम . के . रिढे विविध जिल्हा परिषद शाळाचे केन्द्र प्रमुख आणी मुख्यधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .आरोग्य विभागाचे श्रयरोग पर्यवेक्षक नरेन्द्र तायडे व सर्व आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक कार्यक्रमास हजर होते .क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरिमय ट्युबरक्युलोसीस नांवाच्या जंतुमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे डॉ. रॉबर्ट कॉक यांनी १८८२ साली क्षयरोगाच्या जीवाणुंचा शोध लावला. त्यांच्या प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत दिनांक २४ मार्च रोजी मांडला होता . असा या महान शास्त्रज्ञ डॉ . रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावल एसटी आगारातील वाहन चालक वाहक तसेच कर्मचारी यांना डॉ हेमंत बऱ्हाटे यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आलीत, याप्रसंगी आगार व्यवस्थापक शांताराम भालेराव , वाहन परिक्षक संजय सावकारे आदी उपस्थीत होते. २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य THE CLOCK IS TICKING वेळ निघुन जात आहे . क्षयरोग उच्चाटंन गाठण्याची हे वेळ असुन, याच धर्तीवर क्षेयरोग दिन राबविण्याचे येत असुन , जागतिक स्तरावर क्षयरोग जनआंदोलन कॅम्पेन राबविले जात आहे . तरी आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातुन क्षयरोग निर्मुलनासाठी वेगवेगळ्या उपाययोजना या घोषवाक्याच्या अनुषंगाने प्रसारीत करण्यात येत असल्याची माहीती यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी दिली .

Leave a Comment