गाव सांभाळण्या पाठोपाठ ! शेती सांभाळून सरपंच पतीचे पेरू ‘डाळिंब टरबूज ‘चे विक्रमी उत्पादन !

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

शेती हा एक असा व्यवसाय आहे की जिथे शेतकऱ्यांना अहोरात्र शेतामध्ये राब राब राबावे लागते तेव्हाच कुठे त्यांना उत्पादन घेतले जाते ‘शेती आणि फळबाग यामध्ये खूप अंतर आहे फळबाग घेत असताना फळबागांची अहोरात्र काळजी घ्यावे लागतील औषधाची फवारणी करावी लागते ‘गारपीट असेल असे लिहून असेल ज्या नैसर्गिक संकटांना सुद्धा सामोरे जावे लागते ‘परंतु या सर्वांना तोंड देत ‘शिंदी येथील सरपंच पती विनोद खरात यांनी ज्या पडीत जमिनी मध्ये जनावरेसुद्धा चारा खाण्यात जात नव्हते ।अशा पडीत जमीनीतून जमीन कसून मुरमाड जमिनीतून सोन घेतलं असं म्हटलं तर वागवे ठरू नये !त्यांनी मुरमाड जमीन कसून तीन एकर डाळिंबाची लागवड केली ‘त्याच बरोबर साडे चार एकरामध्ये विविध प्रकारच्या जातीच्या पेरूची लागवड केली ‘व त्यामध्येच टरबुजाचे आंतरपीक सुद्धा घेतले ‘अशा पद्धतीने डाळिंबाचे उत्पादन त्यांना सरासरी वर्षाला 40 ते 50 लाख रुपये पर्यंत मिळते ‘शिवाय डाळिंब हे बांगलादेश मध्ये सुद्धा निर्यात होत असते ‘त्यानंतर त्यांनी साडेचार एकरामध्ये पेरूची लागवड केली चार ते पाच फुटापर्यंत पेरूच्या झाडाला दीड ते दोन किलो पेरू फळ येतं ‘सध्या पेरूच्या फळाची विक्री सुरू आहे तर आंतरपीक असलेल्या टरबुजाची विक्री सध्या सुरू आहे पेरू आणि टरबूज मिळून त्यांना खर्च वजा जाऊन दीड ते दोन लाख रुपये नफा मिळत असतो !त्यामुळे विविध प्रकारचे प्रयोग करून सरपंच पती विनोद खरात हे आपल्या शेती व्यवसायासाठी तसेच बागायती पीक घेण्यासाठी सिंदखेडराजा तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत !आतापर्यंत महाराष्ट्रातून दूरदुरून शेतकरी त्यांच्याकडून शेती पाहण्यासाठी व शेतीविषयक माहिती घेण्यासाठी येत असतात !

Leave a Comment