सिंदखेडराजा तालुक्यामध्ये एकूण 282कोरोनाचे रुग्ण !ग्रामीण भागामध्ये कोरोना चा विळखा अधिक घट्ट !196 ग्रामीण भागामध्ये तर86 रुग्ण शहरी भागातील !!

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

24 मार्चला कोरोना या जीवघेण्या संसर्ग रोगाला आपल्या देशामध्ये एक वर्ष पूर्ण झाले ‘आणि अजूनही संपूर्ण देश आज कोरोना च्या दहशतीखाली जीवन जगत आहे दिवसेंदिवस कोरोना चा विळखा घट्ट होत आहे !अगोदर शहरी भागांमध्ये कोरोना अधिक घट्ट होत होता ग्रामीण भागामध्ये कमीत कमी कोरोना आढळून येत होता ।परंतु आता ग्रामीण भागातही कोरोणाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे ।सिनखेडराजा तालुक्यामध्ये कोरोना चे एकूण 282 रुग्ण असून .त्यामधील 196 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे .तर 86 रुग्ण हे शहरी भागातील आहे ।त्यामुळे ‘ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला असून ‘नागरिकांनी अजूनही कोरोना या विषाणूला गांभीर्याने घेतली नसून ‘नागरिकांनी तोंडाला मास्क चा वापर व सॅनिटायझर चा वापर करावा असे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र कुमार साळवे यांनी केले आहे ‘त्यामुळे लोकांनी गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे !

Leave a Comment