युवकांनो आरोग्य रक्षणासाठी मैदानी खेळात सहभागी व्हा : राजूरेड्डी
(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
(रमेश सुध्दाला
घुग्घुस : लुम्बिनी नगर स्पोर्ट्स क्लब द्वारे दिनांक 25 डिसेंम्बर ते 28 डिसेंम्बर पर्यंत “डे” नाईट शॉर्ट सर्कल क्रिकेटचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेचे उदघाटन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व युवक अध्यक्ष तौफिक शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी परिसरातील जवळपास पंचवीस ते तीस चमूने सहभाग नोंदविला उपस्थित युवकांना
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी संबोधित करतांना सांगितले की आजच्या प्रतिस्पधेच्या काळात आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे असून आरोग्यासाठी मैदानी खेळ हे सर्वात लाभदायक आहे.
यासोबतच जीवनात यश – अपयश येत असतात जीवनात कुठलेच यश किंवा अपयश हे शेवटचे नसतात म्हणून यशा – अपयशाने खचून जाऊ नये.
अपयश आल्यास पुढील लढ्या साठी सज्ज रहावे
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते सैय्यद अनवर,मदन डाकूर,सुरेश आस्कर,अलीम शेख, मोसीम शेख,विशाल मादर,नुरुल सिद्दिकी,अनुप भंडारी,रफिक शेख, हे उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजक रोहित डाकूर,राकेश डाकूर,सुबोध आवळे,श्रीकर डाकूर,शंकर ठाकरे,राजू वेमुला,ओम साई झाडी,रितीक मून यांनी केले.







