प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- दिनांक :-२५ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला सायंकाळी ठीक :०७:०० वाजता अशोक शिंदे(माजी आमदार ) यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची व शिवसैनिकांची होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात आढावा बैठक अशोक शिंदे (माजी उद्योग राज्यमंत्री तथा माजी आमदार) तथा जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तसेच उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद हिंगणघाटच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून आढावा बैठक घेण्यात आली. सदर आढावा बैठकीत अशोक शिंदे(माजी आमदार ) यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना देशभर मतदान चोरीबाबत यात्रा तसेच निदर्शने सुरू आहे.
याचे गांभीर्य लक्षात घेता आपल्यालाही या निवडणुकीत या मतदान चोरीचा फटका बसू नये म्हणून, शहरातील विविध प्रभागात वार्डा – वार्डात जाऊन निवडणूक आयोगाद्वारे मतदान यादी तील ज्यांची नावे मतदान असून डिलीट करण्यात आली, कुणी मय्यत नसून त्याला मय्यत दाखविण्यात आले.
तसेच काही लोकांकडे मतदार कार्ड असून सुध्दा यादीत नाव कापण्यात आले अश्यां सर्वांचे नाव घेऊन निवळनुक अधिकाऱ्यांना शिव सेनेकडून जाब विचारायचे आहे.
जनतेत अशी चर्चा मोठया प्रमाणावर आहे कि निवडणूक आयोगाने विशेषतः मुस्लिम आणि बोध धर्माच्या लोकांच्या नावाचे असे या चुका जानबुजून करण्यात आले हे सुध्दा लक्षात घ्या आणि अशा बऱ्याचशा चुका या देशाची स्वायत्त संस्था म्हणून काम करणाऱ्या निवडणूक आयोग हा केंद्र शासनाच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचे जनता बोलत आहे आणि भाजप निवडणूक जिंकण्याकरिता कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो .
हे आपण या देशात चाललेल्या आंदोलन व निदर्शनातून तसेच बरेचश्या राज्यात या भाजपवाल्यांनी कसल्या प्रकारे यांनी निवडणूक जिंकली आहे त्याचा विचार करून आपल्याला सतर्क होऊन या निवडणूक पूर्वी आपल्याला हे काम पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
शहरातील जनतेला या माध्यमातून आव्हान करण्यात येते कि संपूर्ण शहरात मतदार यादी पडताळणी मोहीम शिव सेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने हाती घेतले आहे तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या भागात मतदार यादीत काही त्रुटी निर्देशनास आल्यास उप जिल्हा:-प्रमुख सतीश धोबे-9764400610,तालुका प्रमुख:-मनीष देवढे-8459778673 याच्याशी संपर्क साधावा
.तसेच बैठकित पक्ष संघटन बाबत प्रभागात जाऊन घर तिथे शिवसैनिक तसेच प्रत्येक वार्डात शाखा निर्माण करण्याचे काम करण्यात यावे. याप्रकारे सर्वांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले.
Sivshenanews/सदर आढावा बैठकीत तालुका प्रमुख मनीष देवडे ,शहर प्रमुख चंद्रकांत भुते, श्रीधर कोटकर,भास्कर ठवरे ,शंकर मोहम्मारे, अविनाश धोटे, गजानन काटोले, शितल चौधरी, अनंता गलांडे, सुनील आष्टीकर,शंकर झाडे, नंदू रेडलावार,दिलीप वैद्य, नितीन वैद्य, शकील अहमद, फिरोज पठाण , प्रसिद्धी प्रमुख आशिष वाघ,संजय पिंपळकर, लक्ष्मण बकाने ,नरेंद्र गुळकरी, प्रशांत कांबळे , पप्पू घवघवे, दिलीप चौधरी,भास्कर मानकर, भास्कर भिसे, दिनेश धोबे, गौरव गाडेकर,हिरामण आवारी, गणेश वडूले इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.







