Hingnghatnews/संत तुकडोजी वॉर्डातील समस्या निकाली काढा.

0
161

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील संत तुकडोजी वॉर्डातील समस्या निकाली काढण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महिला पदाधिकारी यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

शहरातील संत तुकडोजी वार्ड, येथील आदर्श नगर परिसरात रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. येथील नगरिकांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा चालू असल्याने खड्डा चुकवताना मोठा अपघात होऊ शकतो.

Sivshenanews / स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद हिंगणघाटच्या सार्वत्रिक निवडणूकी बद्दल शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची आडावा बैठक

तसेच आदर्श नगर परिसरातील विद्युत खांबावरील लाईट अनेक दिवसापासून बंद स्थितीत आहे. रात्रीच्या वेळेला संपूर्ण परिसर अंधारमय असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस परीसरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.

तसेच अन्नपूर्णा बेकरी समोरील मुख्य रस्त्यावर मोठा जिवघेणा खड्डा पडला आहे. परिसरातील नागरिकांना वाहन चालवताना नाहक त्रास होतो आहे. पावसाळा चालू असल्याने व त्या खड्ड्यात पाणी साचून असल्याने खड्डा चुकवताना मोठा अपघात होऊ शकतो.

करिता त्यावर तात्काळ उपोययोजना करण्यात यावी, तसंच या परिसरात गुरे (गाय) मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बसून असल्यामुळे वाहन चालकांना तसेच पायी जाताना नागरिकांना नाहक त्रास होतो आहे. वरील विषयाला गांभीर्याने घेऊन संत तुकडोजी वार्ड, येथील आदर्श नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या खडे तात्काळ बुजवावे तसेच परिसरात विद्युत खांबावरील लाईट तात्काळ सुरू करावे.

अन्नपूर्णा बेकरी समोरील मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजविण्याबाबत यावे तसेच संत तुकडोजी भवन मागील परिसरात गरे, (गाय) मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बसून असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याबाबत यावी. असे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानी मुख्याधिकारी यांना देण्यात आहे.

Hingnghatnews:यावेळी महिला शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष मिना सोनटक्के, शहर उपाध्याय दिपाली रंगारी, शहर सरचिटणीस सविता गिरी, आचल वकील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here