Home बुलढाणा SangrampurNews /अवैध रेती साठ्यावर महसूल विभागाची मोठी कारवाई; जप्त रेती २० घरकुल...

SangrampurNews /अवैध रेती साठ्यावर महसूल विभागाची मोठी कारवाई; जप्त रेती २० घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप

0
2

 

संग्रामपूर | प्रतिनिधी

संग्रामपूर तालुक्यातील सावळी, पेसोडा, खिरोडा व देऊळगाव घाट परिसरातून अवैधरित्या उपसा करून शासकीय जागेवर साठवून ठेवण्यात आलेली रेती महसूल विभागाने जप्त केली. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई करत जप्त केलेली रेती शासनाच्या नियमानुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप केली.

तसेच तहसील कार्यालयातील सुरू असलेल्या शासकीय बांधकामासाठी आवश्यक रेती नियमाप्रमाणे रॉयल्टी भरून उपलब्ध करून देण्यात आली.
मागील महिनाभरात संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये अचानक धाडी टाकून पूर्णा नदीपात्रातून अवैध उपसा करून ई-क्लास शासकीय जागेवर साठवून ठेवलेली रेती महसूल विभागाने जप्त केली.

या कारवाईत तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार विकास शिंदे, मंडळ अधिकारी तांबारे, ग्राम महसूल अधिकारी भोसले, नायब तहसीलदार राहुल वसावे तसेच महसूल विभागातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

जप्त करण्यात आलेली रेती कवठळ, मारोड, चांगेफळ आणि सावळा येथील २० घरकुल लाभार्थ्यांना महा-खनिज प्रणालीद्वारे मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपी पडताळणीनंतर शासनाच्या नियमांनुसार मोफत देण्यात आली. या लाभार्थ्यांना एकूण १०० ब्रास रेतीचे वितरण करण्यात आले.

याशिवाय तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या बहुउद्देशीय हॉलच्या शासकीय बांधकामासाठी ठेकेदार श्री. परळीकर यांना सुमारे १० ब्रास रेती नियमानुसार स्वामित्वधन (रॉयल्टी) भरून देण्यात आली.

Prashant patil /महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व साठवणुकीवर आळा बसण्यास मदत होणार असून, जप्त रेतीचा उपयोग गरजू घरकुल लाभार्थ्यांना आणि शासकीय कामांसाठी करण्यात आल्याने या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here