आज येथील न्यायालयामध्ये पालक न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर , नागपूर खंडपीठ, नागपूर व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश . जगमलानी, बुलढाणा यांनी जळगाव जामोद न्यायालयाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत वकील संघ, जळगाव जामोद चे अध्यक्ष एडवोकेट रुपेश विश्वेकर,उपाध्यक्ष शिव खुपसे,सचिव एडवोकेट अभिमन्यू वाघ व संपूर्ण वकील संघातील वरिष्ठ तसेच ज्युनिअर सदस्य मंडळी उपस्थित होती.
अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची मागणी:
येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय लवकरात लवकर स्थापन करण्यात यावे, अशी मागणीचा प्रस्ताव माननीय पालक न्यायमूर्ती . एम. एम. नेरलीकर यांना वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट विश्वेकर, उपाध्यक्ष शिव खुपसे व सचिव एडवोकेट अभिमन्यू वाघ यांच्यातर्फे देण्यात आला.
उपस्थित मान्यवर:
या पाहणी दौऱ्याप्रसंगी समवेत कार्यकारी अभियंता तळले , कनिष्ठ अभियंता फुलसिंगे, कंत्राटदार अक्षय देशमुख, उपअभियंता सा.बां. विद्युत विभाग वाडीभस्मे , विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता मापारी, शासकीय विद्युत कंत्राटदार प्रशांत श्रीरसागर, तसेच तहसीलदार . पवन पाटील, ठाणेदार सचिन बाघूल तसेच जिल्हा सरकारी वकील . भटकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट करीम खान यांनी केले.
Courtnews/तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता एडवोकेट दत्ता खेडेकर, एडवोकेट उमरकर, एडवोकेट मानकर, एडवोकेट मुकुंदा, एडवोकेट प्रियांका कारंगळे, एडवोकेट कल्पना डोंगरदिवे, एडवोकेट वानखेडे, सहसचिव एडवोकेट विद्या ताथोड, एडवोकेट राहुल इंगळे,व सर्व वकील संघ सदस्य, जळगाव जामोद यांनी सहकार्य केले.







