आयशर कारच्या धडकेत एक ठार; तीन जखमी लव्हाळा मेहकर मार्गावर झाला अपघात ( accdent news )

 

बुलढाणा: साखर खेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत लव्हाळा फाटा जवळीत पावर हाऊस समोर आयशर व कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. 9मार्च चे उत्तररात्री पावनेतीन वाजता दुर्घटना घडली.

स्टेट बॅंकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैदराबाद जाणारा आयशर क्र. एम एच १८ – बी जी ८२२५ चालक सुनिल कोळी रा धुळे याने अवंढानागनाथ येथून दर्शनाहून बुलडाणा येथे निघालेल्या होन्डा एमेझ क्र एम एच 28 २५-बी के १७ ९५ ला जोरदार धडक दिली.

त्यामुळे कार मधील वैभव रामकृष्ण लोखंडे याचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे सर्व रा सुंदरखेड बुलडाणा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचेवर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.

रायपुरचे माजी ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी केली आत्महत्या,रायपूर ठाण्यात शोककळा ( policenews )

अविनाश पंजाब गव्हाने रा सुंदरखेड बुलडाणा हा किरकोळ जखमी आहे.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

accdent news:  अपघाताची माहिती मिळताच पोहेकॉ कडूबा डोईफोडे, पो कॉ लक्ष्मण ईनामे, पो कॉ. राजेश गीते, पो कॉ मेहेर यांनी घटनास्थळी मदत केली. दरम्यान पोलीसांनी आयशर चालकास ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment