इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव: रस्त्याने पैदल जात असलेल्या किशोर कराळे याला ऑटो रिक्षा अंगावर आणून जखमी करणाऱ्या चौघांनी चाप्टा बुक्क्यांनी मारहाण केली.
व पाठीवर लोखंडी गजाने मारून जखमी केल्याची घटना आज 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दरम्यान घडली याबाबत जखमी किशोर कराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी चौघा आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
accdentnews:याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल संतोष कराळे राहणार मनसगाव यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की किशोर कऱ्हाळे रस्त्याने चालत असताना जगदीश किराणा दुकान जवळ शेगाव येथे ऑटो चालक याने ऑटो जखमीचे अंगावर आणला त्यामुळे या कारणावरून अनोळखी ऑटो चालक व जख्मी किशोर कराळे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला.
त्यानंतर किशोर कराळे हे जगदंबा किराणा दुकान येथे गेले असता अनोळखी चार इसम हे तेथे आले व त्यांनी कराळे यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यापैकी पांढऱ्या रंगाचे शर्ट घातलेल्या इसमाने लोखंडी गज किशोर कराळे यांचे पाठीत मारून जखमी केले
फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट व मेडीकल सर्टीफिकेट वरून शहर पोलीस स्टेशन मध्ये चौघा अनोळखी आरोपी विरुद्ध अप.क्र. 100/2024 कलम 324.323.504.506. 34 भादवी नुसार गुन्हा दाखल
accdentnews: दाखल करून तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या. आदेशाने पोहेका गवई ब न 715 यांच्याकडे देण्यात आला