अकोल्यातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 30 विद्यार्थिनींना काविळची लागण ( Akolanews )

 

प्रतिनिधि सचिन वानखडे
सूर्या मराठी न्यूज अकोला.

Akolanews:अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 700 महिला पोलीस प्रशिक्षणार्थींपैकी 30 महिला प्रशिक्षणार्थींना दूषित पाण्यामुळे काविळची बाधा झाल्याची घटना समोर आली आहे..

महिला प्रशिक्षणार्थींवर अकोल्यातील खाजगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.याबाबत आज पोलीस प्रशिक्षण विभागाचे पोलीस उपमहासंचालक राजकुमार भटकर यांनी अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन आढावा घेतला..

30 मार्च रोजी अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण घेणाऱ्या महिला पोलिसांची दुषीत पाणी पिल्यामुळे अचानक प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले आहे.त्यातील 30 महिलांना काविळची बाधा झाली आहे.

धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध शेगाव येथे गुन्हा दाखल.( Crimenews )

दूषित पाण्यामुळे ही कावीळ झाली असावी असे वाटते.पिण्याचे पाणी व बाथरुमच्या पाण्याची लाईन झिरपुन त्यात पाणी एकत्र झालेले अनेकदा पहायला मिळते .

पाणी जरी आर ओ चे पिण्यासाठी असेल तरी स्वयंपाकासाठी दुसरे पाणी वापरले जाते का? तसेच स्वयंपाक शुद्ध केला जातो का त्याची तपासणी झाली पाहिजे. तसेच तापमान वाढलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात असा काही मुलींना त्रास झाला आहे का?

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रशिक्षण केंद्रांमध्ये जंतुनाशके व पेस्ट कंट्रोल करुन बाकीची स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टींबरोबर पाण्याचा सोर्स तपासून घेतला पाहिजे. तेथील महिला पोलिस अधिकाऱ्यांची प्रशिक्षण केंद्रावर एक समिती करावी.

अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रशिक्षण केंद्रात वारंवार तपासणी करण्यात यावी तसेच सदर घटनेचा कसून तपास करुन संबंधित महिलांना न्याय मिळवून देण्यात यावा. हलगर्जीपणा झाला असल्यास चौकशी करून कडक कारवाई करावी. अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे

तर विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

Akolanews :पोलीस प्रशिक्षण केंद्रातील काही मुलींना दूषित पाणी किंवा दूषित अन्नामुळे कावीळची लागण झाली असून संबंधित प्रशिक्षणार्थींच्या इलाजाचा खर्च पोलीस प्रशिक्षण केंद्र अंतर्गत करण्यात येणार असून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण विभागाचे पोलीस उपमहासंचालक राजकुमार भटकर यांनी दिली .

Leave a Comment