Amarkale/”कलोडे चौकातील अतिक्रमण हटविण्याची मागणी – अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, खासदार अमर काळे यांची भेट

0
27

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट – कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टी अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशी प्रवेशले असून, खासदार अमर काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी केली.

संत तुकडोजी वार्डातील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून (२०१२ पासून) कलोडे चौकातील सर्वे क्र. १७६/२ येथील अवैध झोपडपट्टी हटविण्याची मागणी करीत आहेत. न्यायालयाचे आदेश असूनही (जून २०१७ व जुलै २०२२) प्रशासनाने कारवाई न केल्याने संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यालाच आता अन्नत्याग आंदोलनाचे स्वरूप देण्यात आले आहे.

या आंदोलनाला महाविकास आघाडी व विविध सामाजिक संघटनांचा सक्रिय पाठिंबा असून, “उपोषणकर्त्यांना काही झाले तर जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल”, असा स्पष्ट इशारा महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक सामाजिक आणि राजकीय नेते सहभागी झाले असून, आंदोलकांची मागणी आहे की अतिक्रमण हटवताना दुसरीकडे पुनर्वसनाची योग्य व्यवस्था व्हावी.
प्रमुख उपस्थिती: माजी आमदार राजू तिमांडे, अतुल वांदिले, अनिल जवादे, प्रवीण उपासे, मोहम्मद रफीक, सुनील डोंगरे, दशरथ ठाकरे, अशोक पराते, बालू वानखेडे, अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, राजेश भाईमारे, सीमा तिवारी, मीना सोनटक्के, सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी, नितीन भुते, हुकेश ढोकपांडे, परम बावने, सुरेंद्र बोरकर, पुरुषोत्तम कांबळे, पंकज भट, सूरज खोंडे, अमित रंगारी, विजय हजारे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Amarkale/निवेदनात दिला इशारा:
“जर लवकरच योग्य तो निर्णय न घेतल्यास, संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि यामुळे उद्भवणाऱ्या अनुचित प्रकारांना जबाबदार शासन/प्रशासन असेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here