ambulance accident | रुग्णवाहिका मालवाहू एसटीची समोरासमोर धडक;एक ठार

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

ambulance accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या बुलढाणा अर्बन बँकेच्या गोडवूनजवळ रुग्णवाहिका व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहू ट्रकची समोरासमोर जबर धडक होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक ठार तर तीन जण किरकोळ जखमी झाले.ही घटना शुक्रवार ५ जानेवारीला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.

शिरूर (पुणे) येथील रुग्णवाहिकेत बिहार येथील मृतदेह शिरूर येथून बिहार येथे पोहचवून रुग्णवाहिका क्रमांक एमएच ०४ एफके ५६२४ ने परत शिरूर कडे जात असता.

Murdernews | त्याला मारण्याची कारण होतं  हाच म्हणून  त्याला घरासमोरच शरद मोहोळला ठार मारलं, Exclusive माहिती आली समोर

समोरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहू ट्रक क्रमांक एमएच ४० एन ८४६३ च्या चालकाने मालवाहू एसटी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला जबर धडक दिली.

यात रुग्णवाहिकेचा चालक पियूष विकास सातकर वय ३२ राहणार शिरूर (पुणे) हा जागीच ठार झाला तर रुग्णवाहिकेमधील रामदास रवींद्र धुळे वय २३ राहणार शिरूर (पुणे) यासह तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळताच.

शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी,हेड पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पांडे,संजय वाघ,कुमरे,अनिल राठोड,पोलीस कॉन्स्टेबल हरिदास सोळंके,नामदेव आडे.

ambulance accident : व सुनिल सगणेसह गजानन महाराज बहुद्देशिय संस्था अध्यक्ष आमदार हरिष पिंपळे संचालित पथकाचे अमोल खंडारे,सेनापती शेवतकर,नारू अण्णा,सुनिल लछूवाणी यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.पुढील तपास मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

Leave a Comment