तुटपुंज्या वेळेत हवं आहे चेहर्यावर चकमकीत सौंदर्य, तर मग Follow करा या हटके ट्रिक्स ( Beauty )

 

सर्वांनाच आपण चार-चौघात अगदी उठून दिसावे, असे वाटत असते. त्यासाठी मार्केट मधील नवनवीन प्रोडक्टस आपण वापरून बघतो.

मात्र बरेचदा आपल्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध नसतो. त्यावेळी अतिशय कमी वेळात तुम्ही अगदी घरबसल्या सुंदर त्वचा मिळवू शकता. त्यासाठी आम्ही काही हटके उपाय तुम्हांला सांगणार आहोत.

बेसन फेसपॅक एका वाटीत एक चमचाभर बेसन घ्या. त्यात थोडीशी हळद आणि कच्चे दूध घाला. हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.

हा फेसपॅक चेहर्याला आणि मानेला लावा. थोड्या वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. त्याचप्रमाणे तुम्ही पपईचा सुद्धा वापर करू शकता. त्यासाठी ४-५ पपईचे लहान तुकडे नीट मॅश करून घ्या.

 

प्रथमेश-क्षितिजा यांचा विवाह सोहळा पडला थाटामाटात पार ( Prathmesh parab wedding )

त्यात चिमूटभर चंदन पावडर घालाघाला आणि चमचाभर गुलाबजल टाकून मिसळून घ्या. हा फेसपॅक चेहरा आणि मानेला लावा. १०-१५ मिनिटांनंतर साध्या पाण्याने चेहरा वॉश करा. हा फेसपॅक आठवड्यातून २-३ वेळा करा.

लिंबू फेसपॅक चेहर्यावर झटपट चमक येण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घ्या व त्यात थोडे मध घाला. ३० मिनिटे त्वचेवर असेच लावून ठेवाठेवा व नंतर चेहरा धुवून टाका. असे केल्याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.

दही फेसपॅक एका भांड्यात १ चमचा टोमॅटो पेस्ट आणि २ चमचे दही मिक्स करून घ्या. हा फेसपॅक चेहर्याला आणि मानेला १५-२० मिनिटे असाच लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून टाका.टोमॅटो मध्ये ॲंटीएजिंग गुणधर्म असतात.

 

त्यामुळे त्वचेवर चमक येते. तसेच दही त्वचा स्वच्छ आणि तरूण ठेवते. त्यामुळे त्वचा तुकतुकीत दिसू लागते.
कॉफी फेसपॅक एक चमचाभर कॉफी आणि कोको पावडर एका भांड्यात मिसळा. त्यात २ थेंब मध आणि लिंबाचा रस मिक्स करा.

Beauty: गरजेनुसार दूध घालून मिश्रण एकजीव करा. या पेस्ट चा मसाज १० मिनिटे चेहर्यावर करत राहाराहाव नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.

Leave a Comment