गोवंश ची निर्दयपणे वाहतूक करणारे वाहन शेगाव येथील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.( shegaonnews )

 

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मधून गोवंशाची निर्दयपणे वाहतूक करणारे वाहन शहर पोलिसांनी जप्त करून आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हादाखल करण्यात आले आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिसांना माहिती मिळाली की टाटा एस कंपनीचे क्र. MH-04- FU-5535 मालवाहू वाहनमध्ये 03 बैल व 02 गोरे असे गोवंश जनावरे हे निर्दयतेने कोबुंन वाहतूक होत आहे.

या मिळालेल्या माहितीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या आदेशान्वये पोलीस पथकांनी सदर ठिकाणी जाऊन टाटा एस कंपनीचे क्र. MH-04- FU-5535 मालवाहू वाहनाची पाहणी केली असता.

प्रथमेश-क्षितिजा यांचा विवाह सोहळा पडला थाटामाटात पार ( Prathmesh parab wedding )

वाहनमध्ये 03 बैल व 02 गोरे असे गोवंश जनावरे हे निर्दयतेने कोबुंन वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून आले याबाबत उपयुक्त वाहन गोवंशयासह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

 

shegaonnews:पो.हे.कॉ. संतोष गवई ब.न. 715 यांच्या फिर्यादीवरून आरोपी – जमील खान बुडनखान वय २८ वर्षे रा. ईदगाह प्लॉट विरुद्धअप न. 98/2024 कलम 11 (घ) (ड) (च) नियम कुरतेने वागविण्यास प्रतिबंध आणि 1960 सह कलम 130/177 मो.वा.का. अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोहेकाँ वाघमारे बन 742 हे करीत आहेत

Leave a Comment