प्रथमेश-क्षितिजा यांचा विवाह सोहळा पडला थाटामाटात पार ( Prathmesh parab wedding )

 

“मला वेड लागले प्रेमाचे… ” असे म्हणत प्रसिद्धीत आलेला दगडू म्हणजेच मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब याने क्षितिजा घोसाळकर हिच्यासोबत सप्तपदी घेऊन आपल्या आयुष्याच्या नवीन टप्प्याला सुरूवात केली आहे.

प्रथमेशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटोज् शेअर सर्वांना ही गोड बातमी शेयर केली आहे. त्याने आपल्या चाहत्यांसाठी सप्तपदीचे फोटोज् पोस्ट केले आहेत. त्याच्या या फोटोज् वर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रथमेशचे चाहते त्याला वैवाहिक जीवनासाठी भरघोस शुभेच्छा देत आहेत..
अभिनेता प्रथमेश परबने लग्नात पांढर्या रंगाचा सदरा आणि गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती.

तर क्षितिजा घोसाळकरने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून त्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. प्रथमेशने आपल्या विवाहात गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा रुबाबदार दिसणारा फेटाही बांधला होता.

जिल्ह्यात चक्काजाम सगेसोयऱ्यांसाठी मराठा रस्त्यावर (Maratha Reservation: )

 

अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा यांनी लवमॅरेज केले आहे. सर्वात अगोदर आपल्या दगडू सोबत क्षितिजाची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यादरम्यान त्यांची एकमेकांसोबत घट्ट मैत्री झाली.

Prathmesh parab wedding: टाइमपास ३ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि सरतेशेवटी त्यांचे प्रेम जिंकले.

Leave a Comment