पांढऱ्या केसांना काळेभोर कसे करावे बुवा…. खोबरेल तेलात एकदा हे वापरूनच बघा. ( black hair )

 

वय वाढत चालले की केस देखील पांढरे होत जातात. मात्र केमिकलयुक्त हेअर डायर चा वापर करून आपल्या केसांचा हरवलेला रंग पुन्हा येत नाही.

तीव्र उन्हात राहणे,अपुरे पोषण यामुळे केस पांढरे होऊ लागतात.त्यानंतर मग केस पुन्हा काळे करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात.

अतिशय महागडे घटक केमिकलयुक्त प्रोडक्ट्स आपल्या केसांसाठी वापरण्यापेक्षा फक्त नारळाचे तेल केसांना लावून सुद्धा तुम्ही सुंदर, दाट आणि काळेभोर केस मिळवू शकता.

गजानन महाराज प्रगटदिना निमित्ताने विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ( gajananmaharaj )

हेंल्थलाईनच्या रिपोर्टनुसार नारळाचे तेल हे केसांसाठी एक बेस्ट कंडिशनरचे काम करते.त्यामुळे एक्स्ट्रा मॉइश्चर कमी होते व केसांच्या समस्या उद्भवत नाहीत.नारळाचे तेल हे आयुर्वेदिक तेलांपैकी एक आहे.

black hair:या तेलाच्या वापराने केसांना मुळापासून ते अगदी लांबी पर्यंत कित्येक फायदे मिळतात. या तेलात एंटी ऑक्सिडंट असतात. नारळाच्या तेलामुळे हानिकारक घटकांपासून बचाव होतो व फ्री रेडिकल्स पासून देखील बचाव होतो.

नारळाचे तेल आणि आवळा
आवळ्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून नारळाच्या तेलामध्ये आवळा एकत्रित करून लावल्याने केस काळेभोर होतात.

3 चमचे नारळाच्या तेलात 2 चमचे आवळ्याची पावडर मिसळून लावा आणि १ तासभर तसेच केसांवर लावू ठेवा. प्रत्येक आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास केस काळेभोर आणि घनदाट होतील.

नारळाचे तेल आणि मेहंदी
मेहंदी चे आपल्या आयुर्वेदात खूप महत्व आहे. त्यामुळे मेहंदी आपले केस काळे करण्यासोबतच केसांना मुलायम आणि दाट बनवते.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

black hair:तसेच मेहंदीने जर केस लाल होण्याची समस्या उद्भवत असेल तर 3 चमचे नारळाच्या तेलात 2 चमचे लिंबाचा रस मिसळून त्याची पेस्ट केसांना लावा व त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.यामुळे केसांना सुंदर चमक व लकाकी मिळते.

Leave a Comment