अनोळखी तरुणीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ !घातपात की आणखी काय ( brekingnews )

0
2

 

प्रतिनिधी सय्यद जहीर लोणार

 

brekingnews:किनगावराजा येथून जवळच असलेल्या शेलगाव राऊत फाट्याजवळ एका अज्ञात तरुणीचा अर्धवट जळालेल्या आवस्थेतील मृतदेह अढळल्याने खळबळ उडाली असून खून करून मृतदेह नष्ट करण्याचा संशय व्यक्त होत आहे.


दिनांक ३० रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान शेलगावराऊत फाट्यानजीक असलेल्या पिंपळगावलेंडी शिवारातील द्वारका सुभाष गायके यांच्या गट क्र.१५२ मधील शेतातील जुन्या व पडक्या खोलीच्या मागे अंदाजे २० ते २५ वयाच्या तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

मृत महिलेच्या डाव्या पायाची बोटे कापलेली आढळून आली असून डाव्या पायाला सहा बोटे असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.अज्ञात व्यक्तींनी अज्ञात ठिकाणी सर्वप्रथम सदर महिलेचा खून करून पिंपळगावलेंडी शिवारात मृतदेह आणून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने जाळला असल्याची माहिती मिळाली आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

सदर मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय कारवाईसाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून अज्ञात आरोपींविरुद्ध किनगावराजा पोलीस ठाण्यामध्ये भा.दं. वी.नुसार कलम ३०२ व २०१ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी,देऊळगावराजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम,स्थानिक गुन्हा शाखेचे तपास किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे करीत आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

brekingnews:मारे कर्यांनी आधी गळा चिरला,डाव्या पायाची बोटे कापली नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्यांचा प्रयत्न केला.
महीलेची शोध पत्रिका प्रसिद्ध,अंगात jockey कंपनीचा निकर,डाव्या पायाला ६ बोटें रंग गोरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here