सोनाळा हद्दीत सहा देशी पिस्टलांसह 1आरोपीस अटक,1,84,320/-रु.चा मुद्देमाल जप्त.सोनाळा पोलीसांची यशस्वी कारवाई.(brekingnews )

 

बुलढाणा:-जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्याचे सीमेवरील पो.स्टे.सोनाळा, तामगांव,जळगांव जामोद हद्दीतील ग्राम टुनकी परिसरात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र (पिस्टल),काडसूसे वगैरेची खरेदी-विक्री होत असल्याच्या तक्रारी येत होत्या.

त्या अनुशंगाने तसेच आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 चे पार्श्वभूमिवर अशा अग्नीशस्त्रांची खरेदी विक्रीला प्रतिबंध करुन,असे व्यवहार करणारे ईसमांचा शोध घेवून,त्यांचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यसाठी पोलीस अधीक्षक सुनिल कडासने,अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,बी.बी. महामुनी यांनी संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कार्यवाही केली.

प्राप्त माहितीनुसार दि. 23.02.2024 रोजी सपोनि चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी,पोहेको,विनोद शिवरे, पोर्की,राहूल पवार, चापोकों शेख इम्रान शेख रहेमान सर्व पो.स्टे. सोनाळा यांचे पथकाला गोपनीय खबर मिळाली की, पो.स्टे. सोनाळा हद्दीतील ग्राम इनकी बु ते लाडणापूर रोडवरील केदार नदीचे पुलाजवळ एक इसम देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे ताब्यात बाळगून आहे.

सदर गोपनीय खबरे वरुन नमुद पोलीस स्टाफ यांनी सदर ईसमास पकडून,त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला. सदर प्रकरणी पो स्टे. सोनाळा येथे गुरनं.46/2024 कलम 3/25 अग्नी शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्यामध्ये पकडण्यात आलेल्या.

सासूने लाकडी बॅटने घेतले जावाईची विकेट बॅटने मारहाण केल्याने जावाई यांचं मृत्यू .( crimenews )

आरोपीची नांव-वसीम खान इंग्लीवास खान वय 22 वर्षे, रा. सिंगार, पुन्हाना, जिल्हा-नूरु, राज्य-हरीयाणा असे आहे.
आरोपी कडून जप्त मुद्देमाल
1) देशी बनावटीचे 06 नग अग्नीशस्त्र (पिस्टरन)कि. प्रत्येकी 30,000/-रुपये प्रमाणे 1,80,000/-रुपये,2) 07 नग पिस्टल मॅग्झीन कि.2000/-रुपये,3) एक नग जिवंत काडतूस- किं. 500/-रुपये,4) एक नोबाईल फोन क्रि. 500/-रुपये,5) नगदी रोख- 1120/- रुपये,6) एक बॅग कि 200/-रुपये

असा एकृण.1,84,320/-रुपयांचा
गुन्ह्यातील इतर आरोपीतांचा शोध व तपास सुरू आहे.
नमूद गुन्ह्यामध्ये ईतर आरोपीतांचा शोध घेणेकरीता पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि, अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्था गु शा. बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तयार करण्यात आले आहेत.

पत्रकार संतोष थोरहाते विश्वकर्मा पुरस्काराने सन्मानित !( journalist )

 

सदरची पथके अनोपंतांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेली आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी पो स्टे सोनाळा करीत आहेत.वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व कामगिरी पथक सदरची कामगिरी श्री सुनिल कड़ासने- पोलीस अधीक्षक बुलडाणा, श्री अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव श्री बी बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक

brekingnews: बुलढाणा, श्री डी एस गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली सपोनि चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी, पाहेको, विनोद शिबरे, पोकों राहुल पवार, चापोकों शेख इमान शेख रहमान सर्व पास्ट सोनाळा यांचे पथकाने पार पाडली आहे.

Leave a Comment