कॅनरा बँक शाखा व्यवस्थापकांकडून ग्राहकांची दिशाभूल( Canara Bank Personal Loan )

 

शाम वाळस्कर
प्रतिनिधी मूर्तिजापूर

Canara Bank Personal Loan: मुर्तिजापूर येथील स्टेशन विभागात राहणारे रवी बाळकृष्ण वाकपांजर यांनी १० जुलै २०१९ मध्ये नवीन घर बांधण्याकरीता व कर्जाकरिता गहाणपत्र करून दिले.परंतु बँकेकडून सर्वसाधारण कर्ज खाते मंजूर करण्यात आले.

बँकेने सदर ग्राहकांची दिशाभूल करून तत्सम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता परस्पर कॅनरा बँकच्या मूर्तिजापूर शाखेमध्ये सर्व साधारण कर्ज मंजूर करण्यात आले.

सदर ग्राहक यांना पीएम आवास योजनाचा लाभ मिळू शकला नाही.त्यामुळे त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.

Bajaj ने तर केली आता कमाल, Pulsar आता पेट्रोलवर नाही चालणार तर या इंधनावर धावणार( bajaj motorcycle )

बँक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना सदर कर्ज संदर्भात चुकीची माहिती देऊन जिल्हाधिकारी अकोला यांची दिशाभूल करून चुकीची कागदपत्रे सादर करून कायद्यानुसार जिल्हाधिकारी अकोला यांच्या जप्तीचा आदेश पारित करण्यात आला.

 

सदर घटनेबाबत कॅनरा बँक व्यवस्थापक शाखा मूर्तिजापूर यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी अकोला यांना चौकशी करिता निवेदन देऊन सदर घटनेबाबत ग्राहकाने बँक व्यवस्थापकांना २९ जानेवारी २०२४ रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

परंतु मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मध्यस्तीने सदर घटनेचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला.

Canara Bank Personal Loan:: परंतु बँक व्यवस्थापकांच्या अरेरावीमुळे व त्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सदर ग्राहकाने पोलीस स्टेशन मूर्तिजापूर येथे बँक विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

 

Leave a Comment