श्रींच्या दर्शनासाठी शेगाव येथे आलेल्या खामगाव येथील विद्यार्थ्यांची जुनी पोलीस चौकी जवळून दुचाकी लंपास. अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल. ( crimenews )

0
2

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शनाकरिता खामगाव येथून आलेल्या विद्यार्थ्यांची हेंडल लॉक करून ठेवलेली गुचकी जुनी पोलीस चौकीजवळ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजून पाच मिनिटाच्या दरम्यान घडली.

याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील नांदुरा रोडवर

असलेल्या गोकुळ नगर येथील विद्यार्थी महेश गणेशराव वाघमारे वय 27 वर्षे हा 25 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या समाधीचे दर्शनासाठी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 28 एसी ८२२१ या दुचाकीने शेगाव येथे आला.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

त्याने मंदिराजवळ असलेल्या जुनी पोलीस चौकी जवळ मोटरसायकल हँडल लॉक करून तो मंदिरात श्रींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी केला दर्शन घेऊन परत जिथे गाडी लावली होती त्या ठिकाणी आला असता.

 बातमी लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

त्याला त्याची घडी मिळून आली नाही त्याने सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी दिसून आल्याने याबाबत 27 फेब्रुवारी रोजी महेश वाघमारे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली.

Crimenews :या तक्रारीवरून शेअर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार गजानन गावंडे बक्कल नंबर 669 करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here