दसरा नगर परिसरातून 6150 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल ( crimenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात पोलिसांनी छापा मारून 6150 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला आहे.

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलिसांना गुप्त व खात्रीशिर माहिती मिळाली की दसरा नगर भागामध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत आहे.

अमिताभ बच्चन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, नेमकं काय बरं झालं..?(amitabh bachchan )

या माहितीवरून पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता सुगंधी युक्त प्रतिबंधित बहार खानदानी पान मसाला असे लिहिलेले 39 प्लास्टिक पाकीट, तसेच बिएचआर तंबाखू असा एकूण सहा हजार 150 रुपयाचा माल जप्त केला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews :याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघमारे बकल नंबर 742 यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वैभव सुकडा तळोकार वय 24 राहणार दसरा नगर शेगाव विरुद्ध 128/24 कलम 328, 188 ,272, 273, सह कलम 26 (2) (1) 26 (2) (आय व्ही )59 सुरक्षा मानके कायदा सन 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पीएसआय काटकाडे साहेब करीत आहेत

Leave a Comment