लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण अत्याचार युवतीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल ( crimenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

crimenews:शेगाव.प्रेम संबंध प्रस्थापित करत लग्नाचे आमिष देऊन युवकाने एका युवतीस येथील लॉजवर नेऊन तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची घटना दि. ३ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील पिडीत मुलीच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी सदर युवकाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अकोला जिल्ह्यातील कळमेश्वर येथील कृष्णा शंकर कदम (२४) या युवकाने गावातीलच एका वीस वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले.

मागील दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. फिर्यादी ही अनुसूचित जातीची आहे हे माहीत असूनही फिर्यादीला लग्नाचे आमीष दाखवून कृष्णा याने सदर मुलीस लग्नाचे आमिष देऊन शेगाव येथील राजश्री पॅलेस लॉज मध्ये आणून वारंवार इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील मुलीला दिली.

प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती रॅली( Yavalnews )

crimenews:याबाबत पिडित मुलीने येथील शहर पो.स्टे.ला तक्रारी दिली असून त्यावरून पोलिसांनी कृष्णा शंकर कदम यांच्या विरूध्द अप नंबर १९१/२४ कलम ३७६ (२) (n) ४१७, ५०६, Ipc, ३ (१)(w) (i) (ii), ३ (२) (v) अजाज अत्याचार

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील . तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी मलकापूर यांच्याकडे वर्ग केला आहे

Leave a Comment