उसने पैसे परत मागीतले असता पती पत्नीस अश्लिल शिवीगाळ, एका विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Crimenews:शेगांव .उसनवारीचे ५० हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या पती पतनीस अश्लिल शिवीगाळ केल्याची घटना दि. १२/४/२०२४ रोजी रात्री दरम्यान तिनपुतळे परिसरात घडली.


हकीकत अशा प्रकारे आहे की-गजानन नानाराव शेगोकार व 39 वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार तीन पुतळे परिसर शेगाव ह मु पुणे यांनी अंबादास भगवान गवई यास पन्नास हजार रुपये उसने दिले होते.

घेतलेले उसने पैसे परत मागण्यासाठी फिर्यादी घरासमोर गेला असता आरोपीने फिर्यादीला आई वरून अश्लिल शिवीगाळ करून लोटपोट केली.

बारा वर्षापासून फरार असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला हिवरखेड येथून मोठ्या शिताफीने घेतले ताब्यात.( crimenews )

तुझे पैसे देत नाही तुझ्याकडून जे होते ते करून घे आरोपी व फिर्यादी यांचा वाद होत असताना फिर्यादीची पत्नी स्वाती ही समजावण्यासाठी गेली असता आरोपी याने फिर्यादीच्या पत्नीला सुद्धा शिवीगाळ केली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews :व पत्नीला जीवाने मारण्याचे धमकी दिली .याप्रकरणी गजानन नानाराव शेगोकार ३९ वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार तीन पुतळे परिसर शेगाव ह मु पुणे यांनी शहर पो.स्टे ला दिलेल्या रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी अंबादास भगवान गवई वय ४० राहणार ३ पुतळे परिसर शेगाव याचे विरूध्द अप २२१/२४ कलम २९४,३२३,५०४,५०६ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून तपास मा पोलिस निरीक्षक यांचे आदेशाने पोहेकाँ विनायक सरोदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Comment