माहितीचा अधिकार झाला डोकं दुःखी .आणि प्रशासन मात्र फार सुखी संबंधित प्रकरणात कारवाही तर नाहीच उलट सुलट चर्चेला उधाण ( foreshtnews )

 

माहिती अधिकारातील माहिती प्राप्त होऊन कारवाई शुन्य.प्रकरणात अनेक चर्चेला उधाण.

अनिल सिंग चव्हाण / बुलढाणा

foreshtnews: बुलडाणा:-तरोडा ते तारापूर वनक्षेत्रातून झालेल्या अवैध डांबरी रस्त्याची चौकशी करून माहे एप्रिल मे २०२३ मध्ये बिटावर कार्यरत प्रदीप मुंडे वनरक्षक पश्चिम कोथळी यांना निलंबित करणे बाबत माहिती माहिती अधिकारांतर्गत मांगीतल्या गेली होती.

परंतु सदर प्रकरणाची कोणतीही चौकशी झाली नाही अथवा कुणावरही अजूनही कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे सदर प्रकरणात पाणी कुठे मुरत आहे हे चर्चेचा विषय ठरला आहे.

उसने पैसे परत मागीतले असता पती पत्नीस अश्लिल शिवीगाळ, एका विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

आपण दि. २८/०८/२०२३ रोजी मी अमरावती येथील आंदोलन स्थगित करणे संदर्भात दूरध्वनी वरून संपर्क करून योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले व तक्रारींचे निराकरण करण्याचा शब्द दिला आहे.

तरी आपले निदर्शनास आणून देऊ इच्छितो की,प्रदीप मुंडे वनरक्षक हे आपल्या बुलडाणा विभागात कार्यरत आहेत तसेच त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिलेली असून त्याचेकडे असलेल्या प्रत्येक अतिरिक्त कार्यभारातील र्त्यांचा भ्रष्टाचाराचा आलेख चढता आहे

,त्यांनी मोताळा येथील एका विशिष्ठ समुदायातील गरीब लोकांना हाताशी धरून लाखो रुपये त्यांचे नावावर काढले आहेत वास्तविक त्यांचेपैकी कोणीही वन विभागाचे कामावर नव्हते.

हा घोटाळा कोट्‌यावधी रुपयांमध्ये असल्याने त्याची सविस्तर तक्रार मी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे लवकरच दाखल करणार आहे परंतु तत्पूर्वी त्यांनी त्यांचे कार्यकाळात तरोडा ते तारापूर हा रस्ता राखीव वनातून जात असुन सुद्धा कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

त्यामध्ये त्यांनी ठेकेदार यांचेकडून लाखो रुपये घेतले असल्याची चर्चा परिसरात आहे व या घटनेमध्ये वन संवर्धन अधिनियम १९८० अनुसार कार्यवाही झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. त्याकरिता प्रदीप मुंडे हे वन विभागाची संपत्ती नष्ट करण्यास जवाबदार असून त्यांची चौकशी करून वस्तू स्थितीवर दोषी असणाच्या वनरक्षकाचे निलंबन करणे आपले अधिकार क्षेत्रात येते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्याशिवाय या प्रकरणाची भी यापूर्वी सविस्तर तक्रार आपले वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल करून त्याची एक प्रत आपल्या कार्यालयास पोच केली आहे. मोताळ्यामधील भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकारी मुरकुटे यांचा निलंबनाचा प्रस्ताव आपण मा. मुख्य वनसंरक्षक अधिकारी प्रा अमरावती यांच्याकडे पाठविलेला आहे.

foreshtnews :परंतु या बाबतीत काहीही कारवाई करण्यात आली नाही.माहितीदार मेनेज झाला की काय? अशी जनमानसात चर्चा सुरू आहे.

Leave a Comment