शुल्लक कारणावरून शेजार्यांमध्ये मारहाण, दोघे जख्मी, परस्पर विरोधात तक्रारीवरून दोन्ही कडील सात जणांविरोधात गुन्हा दाखल ( crimenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Crimenews : शेगांव .शेजारी राहणारे डोंगे व यादव परिवारात शुल्लक कारणावरून मारहाणीत दोघे जन जख्मी झाल्याची घटना दि.१४ एप्रिल २०२४ रोजी रात्री ९ वा चे सुमारास संगमनेर येथे घडली

याबाबत प्राप्त माहिती अशी की संगमनगर येथील रहिवासी सौ.आशा बबलू यादव हया घरी हजर असतांना यातील आरोपी क्र-१ ते ३ हे फिर्यादीचे घरी आले लोखंडी गेटला लाथा मारुन शिवीगाळ केली. फिर्यादीचा लहान मुलगा अजय हा बाहेरून आला असता आरोपी यांनी त्यास चापटबुक्यानी मारहाण केली तेव्हा फिर्यादी हा आवरण्यास गेली असता फिर्यादीस सुध्दा शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादी मोठा मुलगा आकाश यादव यास आरोपी तसेच शाम विठठल डोंगे याने त्याचे हातात असलेले काहीतरी वस्तू फिचे आकाश याचे डाव्या खांदयावर पाठीवर मारुन जखमी केले. त्यामुळे त्यातून रक्त निघाले. तसेच त्यांनी त्याचे डोक्यावर सुध्दा मारहाण केली.

हीच आहे ती खुर्ची आणि टेबल ड्रा. बाबासाहेब आंबेडकराबद्दल गौरव मोरेचे भावनिक पोस्ट ( dr babasaheb ambedkar )

व जिवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी सौ.आशा यादव यांचे तोडी रिपोर्ट व मेडी सर्टीफिकेट वरुन शहर पोलीसांनी आरोपी विठठल डोंगे,राम विठठल डोंगे, शाम विठठल डोंगे सर्व रा. संगमनगर शेगाव यांचे विरुद्ध अप नं. २२७/२०२४ कलम४५२ ,३२४,३२३,५०४,५०६,३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच – सौ. कल्पना विठठल डोंगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की आकाश बबलू यादव याने फिर्यादीचे मुलासोबत वाद केल्याने सदर घटणेबाबत समजावण्यासाठी फिर्यादी ही आरोपीच्या घरी गेली असता आरोपी क्र १ ते ४ यांनी शिवीगाळ केली व केस धरुन ओढताण केले तसेच फिर्यादीचे मुलांना चापटाबुक्यांनी मारहाण केली तसेच आरोपी क्र ३ व ४ यांनी घरात पळत जावून हातात लोखंडी पाइप आणून फिर्यादीचे मुलगा शाम व राम यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews: व जिवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. अशा तोडी रिपोर्ट व मेडी सर्टीफिकेट वरुन शहर पोलीसांनी आरोपी सौ. आशा बबलू यादव, बबलू यादव, आकाश बबलू यादव,अजय बबलू यादव सर्व रा. संगमनगर शेगाव यांचे विरुद्ध अप नं. २२८/२०२४ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले असून दोन्ही घटनेचा तपास पोना. निलेश गाडगे हे करीत आहेत.          

Leave a Comment