वनपरीक्षेत्रात अवैध डांबरी रस्त्याच्या प्रकरणातील तो भ्रष्ट वनरक्षक अध्यापही मोकाटच.?( foreshtnews )

तक्रारदाराची चिरी-मिरी देऊन केले तोंड बंद.

 या प्रकरणात वरिष्ठ अधिकारीयांनी चौकशी करून संबंधित वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करावे

 या प्रकरणात होणार लवकरच तक्रार भ्रष्ट वनरक्षक प्रदीप मुंडे यांचेवर टांगती तलवार 

foreshtnews :बुलढाणा :- जिल्ह्यात येत असलेल्या तरोडा ते तारापूर वनपरीक्षेत्रातून जाणाऱ्या अवैध डांबरी रस्त्याची चौकशी करण्याची मागणी गेल्या वर्षभरा पासून शासनाच्या दारी रेटून धरण्यात आली आहे.

शुल्लक कारणावरून शेजार्यांमध्ये मारहाण, दोघे जख्मी, परस्पर विरोधात तक्रारीवरून दोन्ही कडील सात जणांविरोधात गुन्हा दाखल ( crimenews )

बुलढाणा जिल्ह्यातील येत असलेल्या वनपरीक्षेत्रात सण 2023 मध्ये तरोडा ते तारापूर या वनविभागाच्या परिसरात अवैध रित्या डांबरी रस्ता बांधकाम करण्यात आल्याने या भ्रष्टाचारात समाविष्ट असलेल्या प्रदीप मुंडे नामक वनरक्षकाची संबंधित विभागाने सखोल चौकशी करण्याची मागणी सर्व दुरून रेटून धरण्यात आली होती.

दरम्यान काही तक्रारदात्यांनी या करीता आंदोलन ही केले होते त्या आंदोलना वेळी उपवनसंरक्षक बुलढाणा च्या वतीने 28 ऑगस्ट 2023 रोजी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या वेळी उपवनसंरक्षक यांच्या वतीने यावेळी आंदोलकांना आश्वासन देत संबंधित प्रकरणातील भ्रष्ट वनरक्षक प्रदीप मुंडे यांच्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र हे नावापुरतीच 2023 पासून ते अध्याप पर्यंत या अवैध डांबरी रस्त्याची चौकशी अथवा संबंधित भ्रष्टअधिकाऱ्यांवर कुठलीही कार्यवाही न झाल्याने यातील मुख्य भ्रष्टवनरक्षक प्रदीप मुंडे हा अध्यापही मोकाटच असल्याचे चित्र दिसतं असून आपल्यावर कुठलीही कार्यवाही होत नसून आपले कोणीही काही करत नाही.

असे इतरांना सांगत सदर वनरक्षक फिरत असून याची मज्जाव वाढली आहे. यामुळे मात्र वन विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्हच उभे राहत असून विविध चर्चेला उधाण आले आहे.

माहितीचा अधिकार झाला डोकं दुःखी .आणि प्रशासन मात्र फार सुखी संबंधित प्रकरणात कारवाही तर नाहीच उलट सुलट चर्चेला उधाण ( foreshtnews )

विशेष म्हणजे वनरक्षक प्रदीप मुंडे हे वादग्रस्त म्हणून सर्वत्र चर्चेत असून हे महोदय जिथे ही जातात तिथे वादग्रस्त करता आपले नाव लौकिक करतात असे नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित विभागाच्याच एका कर्मचाऱ्यांनी सांगितले.

foreshtnews :या वनरक्षकाने एका विशिष्ट समुदायातील गरीब लोकांना हाताशी धरून लाखो रुपयांची अफरा-तफर केल्याचे ही गांभीर्य जनक बाब समोर येत आहे.

Leave a Comment