अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले नगदी चाळीस हजार रुपये व शेजारच्या घरातून दोन सिलेंडर केले लंपास शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..( crimenews )

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

crimenews:शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुरुषोत्तम पाटील नगर परिसरात घरातील कपाटात ठेवलेले चाळीस हजार रुपये. शेजाऱ्याच्या घरून दोन सिलेंडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 13 जून रोजी सकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पुरुषोत्तम पाटील नगर येथील दीपक नानाराव ससाने व 42 वर्ष यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

की त्यांचा भाचा व भाची जे शेगाव येथे शिक्षण घेत आहेत त्यांच्या शिक्षण शाळेची फीस भरण्यासाठी त्यांची बहीण सीमा राहुल इंगळे व जावई राहुल इंगळे यांनी शाळेची फी भरण्यासाठी चाळीस हजार रुपये दिले होते सदर पैसे घरातील बेडरूम मधील कपाटामध्ये ठेवले रात्री कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करून घरामध्ये झोपले असता.

पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या 21 वर्षीय तरुणीचा शिवनेरी चौकात विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल..( crimenews )

अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले चाळीस हजार रुपये व घराशेजारी राहणाऱ्या कैलास श्रीराम सुलताने यांच्या घरातील दोन भारत कंपनीचे गॅस सिलेंडर असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले नगदी चाळीस हजार रुपये व शेजारच्या घरातून दोन सिलेंडर केले लंपास शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..( crimenews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याप्रकरणी दीपक नानाराव ससाने वय 42 वर्षे राहणार पुरुषोत्तम पाटील नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध नंबर 334 ऑब्लिक 2024 कलम 380 457 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

crimenews:आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघमारे बक्कल नंबर 742 करीत आहेत

Leave a Comment