संग्रामपूर (सूर्या मराठी ब्युरो)ः– तालुक्यातील शेवगा खुर्द येथील स्मशान भूमीचे जागेवरून दि.१० / सप्टेंबर रोजी संध्याकाळ चे दरम्यान वाद निर्माण होऊन दोन गटात हाणामारी होऊन तामगाव पो.स्टे,ला परस्परविरुद्ध 40 जणांवर विविध कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले असून ह्या घटनेत एका गटातील ५ तर दुसऱ्या गटातील ७ असे १२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.brekingnews
याबाबत प्राप्त माहिती अशी की तालुक्यातील शेवगा खुर्द हे गाव अंदाजे ७०० लोकसंख्या वस्तीचे असून येथे बौद्ध व कोळी समाजाचे दोन गटात स्मशानभूमी जागेच्या वादावरून फिर्यादी अभिजीत विष्णू सोनोने (कोळी))वय 23 वर्ष रा. शेवगा खु.ता. संग्रामपूर यांनी तामगाव पो.स्टे.ला फिर्याद दिली की,10/ 9/ 10/9/2026 /रोजी संध्याकाळी 5.30 वा. दरम्यान आरोपी क्र.1 ते 20 जणांनी संगनमत करून फिर्यादी व त्याचे नातेवाईकांना लाकडी काठ्यांनी व सिमेंटचे गट्टू ने डोक्यावर ,छातीवर, हातावर, खांद्यावर ,पाठीवर स्मशान भूमीच्या जागेच्या कारणावरून मारहाण करून जखमी केले. तर आरोपी क्र.९ ह्याने फि.चे आते भावाच्या पत्नीचा विनयभंग केला. अश्या फिर्याद वरुन तामगाव पो.स्टे.अप.क्र. 312/26 कलम 76, 118 (1), 115(2), 189(2), 191 (2), 191 (3 ),190 भा.न्या.सं 2023 नुसार 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BuldhanaUrban/३४ कोटी ७७ लाखांचा कथित आर्थिक घोटाळा; बुलढाणा अर्बनच्या अधिकाऱ्यांवर FIR!
तर दुसऱ्या गटाचा फिर्यादी प्रकाश किसन डोंगरदिवे (बौद्ध) वय 48 वर्ष रा.शेवगा खु. ता.संग्रामपूर यांनीही तामगाव पो.स्टे.ला फिर्याद दिली की 10/ 9 /2026 रोजी संध्याकाळी 6 वा.च्या दरम्यान शेवगा खु. येथे आरोपी क्रमांक 1 ते 20 हे संगनमत करून हातात काठ्या, लाठ्या घेऊन बेकायदेशीर जमा होऊन फिर्यादी व त्याचे नातेवाई कांना मारहाण करून जखमी केले. तुम्ही महार हलकट जातीचे असून गावात राहायचे लायकीचे नाहीत. अशी जातीवाचक शिवीगाळ केली व जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.
अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट करून तामगाव पो.स्टे.ला अप क्र. 313 / 2026 कलम 118 (1), 115 (2), 351(2), 189 (2), 191(2), 191 (3), 190 भा.न्या.सं 2023 सह कलम 3(2), (v) ,(a), 3(1),(r), (s) नुसार आरोपी क्रमांक 1 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास मा.पो. उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे देण्यात आला आहे..
[दोन्ही गटात चांगलीच हाणामारी झाली असता गावात पोळ्याचे दिवशी चांगलेच वातावरण तापून निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तामगाव पो.स्टे.चे ठाणेदार श्रीकांत निचळ सह पोलीस घटना स्थळी पोहचून ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन करुन परिस्थिती आटोक्यात आणली.
Crimenews/सदर घटनेतील एका गटातील ५ तर दुसऱ्या गटातील ७ असे १२ जण जखमी झाले असून त्यांना शेगाव रुग्णालयात रेफर केल्याची माहिती मीळाली आहे. काही जण आकोला येथे उपचार घेत असल्याचे समजते.]






