ही गर्दी निष्ठावंताची ललकारी विजयाची   खेडकर यांची खामगाव तालुक्यातील पिंपरी राजा येथे प्रचार सभा संपन्न (election ) 

0
3

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

election:खामगाव , माननीय श्री नरेंद्र खेडकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे यांची खामगाव तालुक्यातील पिंपरी राजा येथे रात्री प्रचार सभा संपन्न झाली. या प्रचार सभेसाठी पिंपरी राजासह पंचक्रोशीतील जनता प्रचंड शक्तीने एकवटली.

ही गर्दी प्रस्थापितांना धडकी भरवणारी आहे. हा जमलेला प्रचंड विशाल जनसमुदाय विजयाची ललकारी देत होता.

आपला स्वाभिमान जिवंत ठेवणारी ही निष्ठावंतांची फौज प्रस्थापितांच्या विरोधात २६ तारखेला माननीय श्री नरेंद्र ख खेडकर मैदानात उतरणार असून राजकीय जन्म देणाऱ्या मातोश्री सोबत केलेल्या गद्दारीचा बदला घेणार आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

या सभेस प्रत्येक जण आपल्या मनात विजयाचा निर्धार घेऊन आला होता. ठाकरे साहेबांशी आणि सत्याशी इमान असणाऱ्या या जनतेला माझा मनापासून सलाम.

या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना अंतकरण भरून आले होते. जीवाच्या आकांताने या जनतेला हा विश्वास दिला की, काळ कोणताही असो, तुमच्या प्रत्येक संकटात बाळासाहेबांचा हा सच्चा शिवसैनिक खंबीरपणे उभा असेल.

प्रस्थापितांच्या धनशक्तीपुढे, ही जनशक्ती दडपशाहीला कधीही मागे राहणार नाही हा मला विश्वास आहे माझ्या या संघर्षात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान आणि स्वाभिमान मी कधीही कमी होऊ देणार नाही असा विश्वास यावेळी उपस्थितांना दिला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

election:या प्रसंगी, मा. आ. दिलीपजी सानंदा, शाकीर भाई, जुलकर भाई, गोपालजी सातव, सचिन वानखेडे, जूनेहभाई मुल्लाजी, अनंता सातव, भगवान बोमटकर, तब्स्सून मॅडम यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here