दिनांक १२ एप्रिलला दुपारी मोताळा तालुक्यात प्रचंड गारपिटीसह वाऱ्या सहित अवकाळी
Farmer loss :दुपारी २:३० ते ३:३० वाजेच्या कालावधीत मोताळा तालुक्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने धुवाधार फटकेबाजी केली.
दरम्यान, मोताळा तालुक्यातील वासियांना भरपूर दिवसानंतर गारवा जाणवला. मोताळा तालुक्यातील गावांमध्ये रस्त्यारस्त्यांत पाणी साचले, नाले वाहू लागले व परिसरातील शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही ठिकाणी पिके जमिनदोस्त झाले आहेत.
गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर आहे. बुलढाणा, खामगाव, तालुक्यात शेतकऱ्यांना अवकाळीचा जोरदार तडाखा बसला.
यामध्ये मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, कांदा अशा पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक मातीत मिळाले.
Farmer loss :अजूनही दमट वातावरण असल्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येणे शक्य नाही.