गजानन महाराज प्रगटदिना निमित्ताने विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ( gajananmaharaj )

 

किर्तन आणि गीत गजानन कार्यक्रमाचे आयोजन

सिंदी रेल्वे ता.२ : स्थानिक श्री गजानन महाराज प्रगटदिन समितीच्या वतीने शेगाव निवासी संत गजानन महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने रविवारी (ता.३) भरगच्च विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील श्रीगणेश मंदीरात सकाळी ७ वाजता श्री चा शाश्वत अभिषेक सोहळा पार पडणार आहे.
त्यानंतर ९ वाजता टाळमृदगाचा गजरात गणेश मंदीर परिसरातुन श्री च्या पालखी आणि शोभायात्रेला सुरवात होणार आहे. दुपारी १२ वाजता पालखी समारोप महाआरती व कालाप्रसाद वाटपाने होणार आहे.

दुपारी ४ वाजता श्री संत गजानन महाराज प्रगटदिन किर्तनाचा कार्यक्रम नागपूरचे किर्तनकार हभप दिगंबरबुवा नाईक सादर करणार आहेत.

सारखे भांडण चालू असते रिलेशनशिप मध्ये, तर करा थोडा या गोष्टींचा विचार ( relationship )

 

सांयकाळी ७ वाजता श्रीची महाआरती आणि महाप्रसादाचे वितरन करण्यात येणार आहे.यानंतर रात्री ८ वाजता सुरश्री संगीत मंच वर्धा व्दारा प्रस्तुत “गीत गजानन” हा भक्तीमय गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सादरकर्ते अरविंद बटाले, विजय चांदेकर, आदित्य खंडारे, विशाल शेंडे, प्रवीण पायघन आणि संच सादर करणार आहेत

.बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

gajananmaharaj: आयोजित कार्यक्रमात शहरातील गजानन महाराज भावीभक्तानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच पालखी सोहळ्यात परिसरातील भजन मंडळानी टाळमृदगाचा एकच गजर करावा असे आवाहन श्री संत गजानन महाराज प्रगटदिन समितीच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Comment