बुलढाण्यात शिवसेनेतच लढत होण्याची चिन्हे! तीन दशके एकत्र झुंजले, आता एकमेकांना आव्हान ( lok sabha election )

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )

बुलढाणा: गल्ली ते दिल्ली पर्यंत गाजत असलेला महायुती मधील जागा वाटपाचा संभ्रम दूर झाला असून ही जागा शिंदेगटाला मिळाल्याचे संकेत मिळाले आहे. यापूर्वी आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटल्यात जमा आहे.

यापरिनामी मागील ३ दशकांपासून एकत्र लढणारी शिवसेना आणि लाखो शिवसैनिक आता एकमेकांविरोधात लढणार आहे. यापरिनामी बुलढाण्याचे रणांगण कुरुक्षेत्र ठरणार आहे.
मिशन- ४५ अंतर्गत भाजपने केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली एक वर्षापूर्वी बुलढाण्यात दावारूपी प्रवास सुरु केला. सहा भेटीत यादवांनी अख्खा मतदारसंघ पालथा घातला. याद्वारे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट व खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर दवाब निर्माण करण्यात भाजपा यशस्वी ठरली. यामुळे जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरला. मात्र सलग सहा टर्म (मेहकर विधानसभा व बुलढाणा लोकसभा ) मैदान मारणारे खासदार जाधव अविचल राहिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहिले. शेवटी’ निकालाचे नंतर पाहू, पण बुलढाणा आमचाच’, या शब्दात त्यांनी भाजपला सुनावल्याचे समजते. यामुळे अंतिम तडजोडीत बुलढाणा आपल्याकडे राखण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे, या घडामोडीत संलग्न वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. उद्या किंवा परवा शिंदे गटाची यादी जाहीर होऊन त्यात जाधव यांचे नाव पहिल्या क्रमांकावर राहील असा दावाही त्यांनी बोलून दाखविला.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! तयारी अंतिम टप्प्यात (voternews )

दुसरीकडे मागील तीन दिवसापासून खासदार जाधव यांनी बुलढाण्यातील संघ परिवार, ज्येष्ठ भाजप पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. त्यापूर्वी चिखली, जळगाव जामोद, खामगाव, सिंदखेडराजा या मित्र पक्षांच्या मतदारसंघात विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण व भूमीपूजन यांचा धडाका लावला. यामुळे ही जागा शिंदे गटाला मिळणार या चर्चेला पुष्टी मिळाली.

आचारसंहितेपूर्वीच्या ‘कॅबिनेट’ मध्ये खामगाव जालना रेल्वेमार्गासाठीच्या पन्नास टक्के वाट्याला मान्यता देऊन मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिले. या सर्व बाबी जागा शिंदे गटाला सुटल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला ही जागा जवळपास सुटली असून २० मार्चच्या बुलढाणा दौऱ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवाराची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे lok sabha election

..आता आमने सामने

या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात सेनेच्याच दोन गटात युद्ध होण्याची चिन्हे आहेत. एकप्रकारे ही लढत ठाकरे विरुद्ध शिंदे अशी राजकीय प्रतिष्ठेचे युद्ध ठरण्याची चिन्हे आहे. २० तारखेपर्यंत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

असा आहे इतिहास

नव्वदीच्या दशकात अगदी दूरवरच्या बुलढाण्यात एकसंघ शिवसेना फोफावली. १९८९ च्या आसपास मेहकरात झालेली सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा जिल्ह्यात सेनेचे भगवे वादळ आणणारी ठरली. तत्कालीन जिल्हा प्रमुख दिलीप रहाटे व त्यांचे सहकारी ( खासदार) प्रताप जाधव यांनी सभा लावली होती. याचे प्रत्यंतर १९९० च्या सभेत आले. बुलढाणा ( राजेंद्र गोडे) व जळगाव ( कृष्णराव इंगळे) हे दोन आमदार निवडून आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

भाजप सोबतच्या युतीनंतर १९९५ मध्ये विजय शिंदे( बुलढाणा), प्रताप जाधव( मेहकर) हे आमदार झाले. यानंतर सेनेची घोड दौड कायम राहिली. १९९६ मध्ये बुलढाणा लोकसभा पदरी पडल्यावर सेनेने थेट २०१९ पर्यंत बाजी मारली.

lok sabha election ):मात्र आता पुलाखालून बरेच पाणी नव्हे एकसंघ पुलंच वाहून गेलाय! यंदाच्या लढतीत सेनेची ही शकले एकमेकांविरुद्ध उभी ठाकण्याची दाट शक्यता आहे. असेच झाले तर, किमान जिल्ह्यात असली सेना कोणती? हा फैसला लागणार आहे…

Leave a Comment