शेगावात पकडला सव्वा सहा किलो गांजा ७६ हजार रू मुद्देमाल जप्त ( crimenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव शहरातील जिजामाता नगर मध्ये एका दुकानावर गुंगिकारक औषधद्रव्य (Narcotic drugs) गांजा जवळ बाळगून विक्री केल्या जात असल्याचे माहिती वरून शहर पोलिसांनी १४ मार्च रोजी रात्री छापा टाकला असता ६ किलो २६९ ग्राम गांजा किंमत ७५२२८ रुपयाचा मुद्देमाल व नगदी १६२० रुपये असा एकून ७६८४८ रुपयेचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे .

याप्रकरणी एका आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.याबाबत शहर पोलिस स्टेशनचे (Police Station)सपोनी श्रीकांत माधवराव इंगोले वय ४० वर्ष यांनी फिर्याद दिली.

यात त्यांनी नमूद केले की प्राप्त माहिती वरून गोपाल रामदास तायडे वय २९ वर्ष रा. डगडाळीपुरा जिजामाता नगर शेगाव यांचे टिनाचे टपरी दुकान डगडाळीपुरा जिजामाता नगर शेगाव येथे१४ मार्चचे रात्री ८ ते ९.४६ वा.दरम्यान शासकीय पंच व राजपत्रीत अधिकारी यांच्या समक्ष कायदयाचे सर्व नियमाचे पालन करुन रेड केला असता.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! तयारी अंतिम टप्प्यात (voternews )

त्याच्या ताब्यातून हिरवट, काळसर, कळीदार बिजा असलेला गांजा वजन 6.269 कि. ग्रॅम एकून किमती 75228/- रुपये चा मुद्देमाल व नगरी 1620 रुपये असा एकून 76848 रुपयेचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेवून जप्त करण्यात आला.crimenews

संपूर्ण जप्ती पंचनामा कार्यवाहीचे फोटोग्राफी (Photograph) करण्यात आलेली आहे. नमूद आरोपी याचे सदर कृत्य कलम 20 (ब) (2) गुंगीकारक औषधिद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा होत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews :असल्याने यांच्यावर अप नं. 127/2024 कलम 20 (ब) (2) गुंगीकारक औषधिद्रव्य आणि मनोव्यापारावर (Drugs and Psychotherapy) परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 नुसार गुन्हा १५ मार्च रोजी नोंदवण्यात आला.

Leave a Comment