खा.मुकुलजी वासनिक संयमी व्यक्तिमत्व- विजय अंभारे(Lonar)

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :जागतिक पर्यटन दिन व खा मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिव‌साच्या निमित्ताने फोटोग्राफीचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांतीलालजी गुगलीया तर फोटो प्रदर्शनीय उद्‌घाटन मा. श्री. विजयजी अंभोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

व प्रमुख उपस्थितीमध्ये -शैलेशभाऊ सावजी (उपाध्य बु.नि.का. कमेटी) निसार शेख सर व्यवस्थापकीय संचाल विदर्भ अॅकेडेमी लोणार) प्रमुख उपस्थितीमध्ये भुषणभाऊ मापारी गटनेते बादशहा खान उपाध्यक्ष नगरपरिषद, ज्ञानेश्वर मामा चिभडे माजी सभापती पंचायत समिती शेख समद शेख अहमद शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी अनिकेत मापारी जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस को ज्योती ताई राठोड, महिला तालुकाध्यक्ष शे करामत माजी नगरसेवक इत्यादी उपस्थित होते.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

खा. मुकुलजी वासनिक साहेब यांनी काढलेल्या वन्यजीवांच्या फोटोचे प्रदर्शन अनेक विद्यार्थी व परिसरातील लोकानी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
अतिशय सुंदर असे वन्य जीवाचे फोटो बघुन साहेबांच्या फोटोग्राफीच्या कलेबद्दल सर्वांनी कौतुक केले.

याप्रसंगी लोणार परिसरामध्येचे अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून दिल्याबद्दल मा.शेख सर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा.विजयजी अभोरे यांनी खासदार मुकुलजी वासनिक साहेबांच्या राजकीय बरोबर त्यांना आवड असलेल्या वन्यजीव फोटोग्राफीबद्दल बरीच माहिती दिली वन्यजीव फोटोग्राफी करण्यासाठी संयम असणे फार आवश्यक बाब आहे.

आदरणीय वासनिक साहेबांमध्ये संयम असल्यामुळे ते एक यशस्वी राजकारणी व चांगले वन्यजीव फोटोग्राफर होवु शकले. अध्यक्षीय भाषणामध्ये शांतीलालजी गुगलिया यांनी लोणार हे जागतिक पर्यटन केंद्र आहे. अनेक देशांची व राज्याची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालते भविष्यामध्ये लोणारची सुद्धा अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालेल.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मा मुकुलजी सोबत अनेक वर्षापासुन काम करतो परंतु मा. मुकुल फोटोग्राफर आहे हे ऐवढे चांगले वन्यजीव फोटोग्राफर आहे माहित नव्हते या प्रदर्शनीमुळे त्यांच्या कलेची माहिती झाली याप्रसंगी बादशाह खान शैलेश सावजी मानवटकर सर यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक गजानन खरात यांनी केले तर सूत्रसंचालन मनीष पाटोळे यांनी तर आभार प्रदर्शन शेख समद शेख अहमद यांनी केले .

Lonar :कार्यक्रमाच्या आयोजन ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात व साहित्य आण्णाभाऊ सोशल फोरमचे प्रदेश अध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी केले होते या कार्यक्रमाचे माजी नगरसेवक संतोष मापारी माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे माजी नगरसेवक सतीश राठोड युवक काँग्रेसचे भरत राठोड ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे युवा काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे आतिक भाई माजी नगरसेवक पंढरी चाटे माजीद कुरेशी आप्पा शिंदे शहर उपाध्यक्ष गजानन मापारी व विदर्भ अकॅडमी चे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment