जिल्ह्यात चक्काजाम सगेसोयऱ्यांसाठी मराठा रस्त्यावर (Maratha Reservation: )

 

बीड प्रतिनिधी- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जिल्ह्यात भरातील मराठा समाज सगे सोयराच्या मुद्द्यावर आज रस्त्यावर उतरला होता जिल्हाभरात ठीक ठिकाणी रस्ता रोको करत चक्काजाम करण्यात आला..

यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बीड जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी रस्त्यावरती ठिय्या मांडून सगळी सोयरे कायद्याचे अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा घोषणाही दिल्या बीड तालुक्यात जिल्ह्याभरात मराठा समाजाने रस्ता रोक आंदोलन करून सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली..

वडवणी परळी केज पाटोदा आष्टी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले वडवणी मध्ये आंदोलन आणि पोलिसांच्या शाब्दिक चकमक झाली रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाभरात ठीक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

समृद्धि महामार्गावर भीषण अपघात १ ठार २ जख्मी वर स्त्याच्या कडेला पल्टी होऊन जळाला ट्रक (breking news ))

केज मध्ये जेजुरी नदीच्या पुलावर महिलांनी रस्ता रोको केला होता यावेळी घोषणाबाजी करत संतप्त महिलांनी रस्ता अडवला यामुळे बराच वेळ ट्राफिक जाम झाली होती.

रस्त्यावर उभ्या असणाऱ्या महिलांनी एकही गाडी पुढे जाऊ दिली नाही शेवटी पोलिसांनी आव्हान करून रस्ता रोको आंदोलन मागे घ्यायला लावले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं व सगेसोयरे अधिसूचना लागू करावी.

 

Maratha Reservation: यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले आदेशाप्रमाणे आज पाटोदा तालुक्यातील पारगाव येथे नरपुरवाडी अनपटवाडी धालेवाडी येथे सर्व जाती धर्माची समाज बांधव यांच्या वतीने रस्ता रोखून अगदी शांतते करण्यात आला विद्यार्थी व पेशंट यांना सोडण्यात आले .

Leave a Comment