Home Blog Page 101

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हा यांची मागणी..( vanchitnews )

0

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

vanchitnews:सांगली,दि. 30/05/2024 रोजी
वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने, मा. राज्यपाल सो, महाराष्ट्र राज्य शासन यांना मा. सांगली जिल्हाधिकारी सो यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे कळवित आहेत की,दिनांक 29 मे 2024 रोजी, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती स्तंभ महाड रायगड येथे, शालेय पाठ्य पुस्तका मध्ये मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

त्या वेळी दुपारी 12:30 वाजता त्यांनी अति उत्साही होवून आंदोलन करते वेळी डोळसपणा व तारतम्य न बाळगता भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृर्ती दहन करताना चा फोटो, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सर्व लाव यु कॅमेरासमोर सर्व न्युज प्रतिनिधी समोर फाडण्याचे वाईट कृत्य केले आहे.

सर्व देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करीत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य गुन्ह्यास पात्र असून त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद व्हावा.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्याचबरोबर, शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि वैदिक श्लोकांचा समाविष्ट करून ‘आरएसएस’ चा अजंडा राबविण्याचा काम करीत, सामाजिक तेढ निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग करणारे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

राज्यघटनेच्या तत्वानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण देण्यास मनाई असताना ही हा खोडसाळ प्रकार प्रयत्न या सत्ताधारी भाजप पक्षाने सुरू केला आहे. ते ताबडतोब थांबवण्यात यावे अन्यथा, आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करावे लागेल.

बातमी लाईव्ह पहा एकच क्लिक करा 

व होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे ‌यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी असा कडक इशारा दिला आहे.

vanchitnews:यावेळी, वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हाध्यक्ष महाविर कांबळे, महिला आघाडी उषाताई कांबळे, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रूपेश तामगावकर, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक संजय भूपाल कांबळे, जिल्हा सदस्य किशोर आढाव, सांगली शहर अध्यक्ष इरफान केडिया, मिरज शहर अध्यक्ष सतिश शिकलगार, अशोक लोंढे, हिरामण भगत, रतन तोडकर, चंद्रकांत कोलप, ऋषिकेश कोलप, मानतेश कांबळे,अतिश कांबळे,वाहिद सनदी, चेतन वाघमारे, वसंत सर्जे. यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करा डाँ भास्कर मापारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ( formernews )

0

 

formernews:सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे

, सध्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मार्फत सुद्धा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक झाले आहे, सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी बि बियाणे व खते खरेदी साठी पैशांची आवश्यकता आहे

ससून ला घडला खळबळजनक प्रकार ते रक्त बदलले एका खाजगी वेक्तीने ते बाईच कि आईच नेमका काय? ( Pune accdent porsche )

,तर काही शेतकरी आपल्याकडील पीक कर्जाचा भरणा करून लगेच नवीन पीक कर्ज उचलत असतात तसेच काही नवीन शेतकरी सुद्धा शेती उपयोगासाठी पीक कर्ज घेण्यासाठी खरीप हंगामाच्या तोंडावर प्रयत्न करताना दिसत असतात, परंतु आपल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेमार्फत मात्र नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासंदर्भात अध्याप कुठलेही पाऊल उचलले गेलेले नाही,

मान्सून आपल्या देशाच्या वेशी जवळ आलेला असताना सुद्धा अद्यापही केंद्रीय सहकारी बँकेकडून नवीन पीक कर्ज वाटपाविषयी उदासीनता दिसून येत आहे, यामुळे जिल्ह्यसह लोणार तालुक्यातील ग्रामसेवा सोसायट्याना सुद्धा सभासद शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत,

काही शेतकऱ्यांनी तात्पूर्त्या स्वरूपात खाजगी कर्ज काढून जिल्हा को ऑप रेटिव्ह बँकेत कर्ज भरणा केला त्यांना सुद्धा बँकेकडून पुन्हा पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे,एकंदरीतच जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यासह शेतकऱ्यांचे मात्र चांगलेच नुकसान होत आहे,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

नवीन पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी बी बियाणे व खते घेण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे प्रचंड अडचणीत आलेले आहेत, डाँ भास्कर मापारी संचालक गणेश विविध कार्यकारी सहकारी संस्था लोणार यांनी हा गंभीर प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे मांडला आहे.

formernews:तसेच जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या प्रशासकांना त्वरित शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याविषयी आदेशित करावे अशी आग्रही मागणी डाँ भास्कर मापारी संचालक गणेश विविध कार्यकारी सहकारी संस्था लोणार यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या कडे ई मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे

गरजू लाभार्थ्यांना डावलून मर्जीतील नागरिकांना घरकुलाचा लाभ .? ( gharkulyojna )

0

 

पंचायत समिती लोणार अंतर्गत ग्रामपंचायतीचे मनमानी कारभार…

gharkulyojna:शासनाच्या विविध योजने अंतर्गत नागरिकांना वैयक्तिक लाभ देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

लोणार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पारडी सिरसाठ व बोरखेडी गट ग्रामपंचायत येथे मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुलांना सुरुवात करण्यात आली परंतु या ठिकाणी सरपंच व सचिव यांनी गरजू लाभार्थ्यांना डाऊलून मर्जीतील लाभार्थी यांचे नावाने घरकुल मंजुर करून गरजु लाभार्थी यांना घरकुल लाभापासुन डावल्या बाबतची तक्रार लिला विजय मते,रा. बोरखेडी यांनी लोणार यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे दिली आहे.

दिलेल्या तक्रारी मध्ये नमुद आहे की,तक्रार करती महिला परितक्ता असुन मौलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे.गट ग्रामपंचायत पार्डी सिरसाट/बोरखेडी येथील ग्रामसेवक व सरपंच हे मनमानी कारभार करीत आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

आज रोजी मंजुर झालेल्या घरकुल यादीमध्ये त्यांनी हेतु पुरस्कर तक्रार करत्यासह इतर गोरगरीब नागरीकांचे नावे काही कोणतेही कारण न सांगता वगळले आहे.

एकत्रीत कुटूंबातील,जमीनी असलेले श्रीमंत व्यक्ती तसेच आज रोजी पक्के घरे असलेल्या की जे नियमात बसत नाहीत अश्या नागरीकांना घरकुल मंजुर करण्यात आले असुन घरकुल हप्ते वितरीत करणे सुरू झाले असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

वास्तवीक पाहता ज्यांना घरकुलाची गरज आहे ज्यामध्ये बेघर,विधवा, परितक्ता,अपंग या नागरीकांना आज रोजी मंजुर असलेल्या घरकुल यादीतुन वंचीत ठेवण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आहे. यावरून घरकुल मंजुर करण्यासाठी आर्थीक व्यवहार करावा लागणार का ? सरपंच व उपसरपंच यांनी सांगीतलेले नावांची यादीच ग्रामसेवक यांनी पंचायत समितीकडे पाठविली असेल का ? ग्रामपंचायतीने घरकुल मंजुर करण्यासाठी पाठविलेली यादीतील लाभार्थी यांचे घराचा गाव नमुना आठ तसेच ते योजनेमध्ये बसतात किंवा कसे हे पंचायत समिती मधील अधिकारी बघत नसतील का ? जे लाभार्थी आर्थीक व्यवहार करीत आहे त्यांचेच नावे घरकुल मंजुर होणार का? असे एक नाही तर अनेक प्रश्न पडल्या बाबत नमुद केले आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने मंजुर असलेल्या घरकुल लाभार्थींच्या जागेची प्रत्यक्ष मोका पाहणी तसेच त्यांच्या गाव नमुना 8 व इतर आवश्यक कागदपत्रांची सविस्तर चौकशी सात दिवसाच्या तक्रारकरत्या समक्ष करण्यात यावी,कारण ग्रामपंचायत कार्यालय आर्थीक व्यवहार करून घरकुल मंजुर करीत असल्याचा संशय तक्रार कर्त्याला आहे.

एका क्लिक वर लाईव्ह बातमी 

तसेच पक्के घरे व नियमानुसार जे बसत नाही ते सुध्दा घरकुले मंजुर होत असल्याने माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने जो पर्यंत चौकशी होत नाही तो पर्यंत आज रोजी सुरू असलेल्या घरकुलाचे हप्ते वितरीत करण्यात येवु नये.

gharkulyojna:तसेच ग्रामपंचायती कडुन घरकुल मंजुर करण्या करीता आलेल्या यादया जागेची प्रत्यक्ष पाहणी तसेच नियमानुसार लाभार्थी घरकुल घेवु शकतो किंवा कसे याची पाहणी करूनच घरकुल मंजुर करण्यात यावे. दिलेल्या तक्रारीवर योग्य कारवाई न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा तक्रारी अंती दिला आहे.

भरारी पथकांच्या कार्यवाहीला गती अकोट तालुक्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त जिल्ह्यात दोन विक्रेत्यांविरूद्ध गुन्हा ( krushinews )

0

 

krushinews:अकोला, दि. 30 : कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासण्यांना वेग देण्यात आला आहे.

कृषी विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे बुधवारी टाकलेल्या छाप्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. या पथकाने् मंगळवारी व बुधवारी केलेल्या दोन कारवायांत दोषी आढळलेल्या दोन विक्रेत्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस बियाणे जप्त अकोट तालुक्यातील उमरा येथील निर्मल दिलीपसिंग तोमर (ठाकूर ) यांच्या शेतातील मोडकळीस आलेल्या घरात बोगस बियाणे असल्याबाबत गुप्त खबर जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती.

त्यानुसार याठिकाणी बुधवारी (29 मे) दुपारी.4 वा. च्या सुमारास मोहीम अधिकारी महेंद्रकुमार साल्के, ,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतिशकुमार दांडगे, कृषी अधिकारी भरत चव्हाण व अकोट ग्रामीण पोलीसांच्या पथकाने छापा टाकला.

ससून ला घडला खळबळजनक प्रकार ते रक्त बदलले एका खाजगी वेक्तीने ते बाईच कि आईच नेमका काय? ( Pune accdent porsche )

त्यात बोगस कापुस बियाण्याची 75 हजार 200 रू. ची एकुण 47 पाकिटे जप्त करण्यात आली.
निर्मल तोमर (ठाकूर ) रा .उमरा ता .अकोट यांच्या विरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जादा दराने विक्री करणा-यावर गुन्हा दाखल तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील अश्विनी ऍग्रो एजन्सी (प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे) या बियाणे विक्री केंद्रातून अजित-155 बीजी 2 या कापूस बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याबाबत माहिती मिळताच भरारी पथकाने तत्काळ कार्यवाही केली.

मंगळवारी दुपारी 12 वा. च्या सुमारास मोहिम अधिकारी महेंद्रकुमार साल्के यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पथकाने डमी ग्राहकांच्या माध्यमातून या बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

छाप्यात अजित सीड्स उत्पादित संकरित कापूस बियाणे वाण अजित -155 बीजी 2 ची प्रति पाकीट 1 हजार 400 रु. याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे कृषी अधिकारी श्री. चव्हाण यांच्या तक्रारीवरून विक्री केंद्राचे प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे यांच्या विरोधात बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983,कापुस बियाणे किंमत (नियंत्रण ) आदेश -2015, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा -2009, महाराष्ट्र कापुस बियाणे नियम -2010 अन्वये तेल्हारा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

krushinews:पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, तालुका कृषी अधिकारी भरत चव्हाण, विस्तार अधिकारी गौरव राऊत, कोमल भास्कर, कृषी सहायक प्रदीप तिवाले आदींचा समावेश होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,अकोला शंकर किरवे व कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी मार्गदर्शन केले.
०००

अनोळखी तरुणीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ !घातपात की आणखी काय ( brekingnews )

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर लोणार

 

brekingnews:किनगावराजा येथून जवळच असलेल्या शेलगाव राऊत फाट्याजवळ एका अज्ञात तरुणीचा अर्धवट जळालेल्या आवस्थेतील मृतदेह अढळल्याने खळबळ उडाली असून खून करून मृतदेह नष्ट करण्याचा संशय व्यक्त होत आहे.


दिनांक ३० रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान शेलगावराऊत फाट्यानजीक असलेल्या पिंपळगावलेंडी शिवारातील द्वारका सुभाष गायके यांच्या गट क्र.१५२ मधील शेतातील जुन्या व पडक्या खोलीच्या मागे अंदाजे २० ते २५ वयाच्या तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

मृत महिलेच्या डाव्या पायाची बोटे कापलेली आढळून आली असून डाव्या पायाला सहा बोटे असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.अज्ञात व्यक्तींनी अज्ञात ठिकाणी सर्वप्रथम सदर महिलेचा खून करून पिंपळगावलेंडी शिवारात मृतदेह आणून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने जाळला असल्याची माहिती मिळाली आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

सदर मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय कारवाईसाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून अज्ञात आरोपींविरुद्ध किनगावराजा पोलीस ठाण्यामध्ये भा.दं. वी.नुसार कलम ३०२ व २०१ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी,देऊळगावराजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम,स्थानिक गुन्हा शाखेचे तपास किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे करीत आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

brekingnews:मारे कर्यांनी आधी गळा चिरला,डाव्या पायाची बोटे कापली नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्यांचा प्रयत्न केला.
महीलेची शोध पत्रिका प्रसिद्ध,अंगात jockey कंपनीचा निकर,डाव्या पायाला ६ बोटें रंग गोरा

तलवारीने कापला केक- गुन्हा दाखल.बीबी पोलीस स्टेशन ची कारवाई ( Cakenews )

0

 

Cakenews:दि.28/05/2024 रोजी बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरखेड घुले ता. लोणार जी.बुलढाणा या गावातील वैभव प्रल्हाद घुले वय-20 वर्षे याचा वाढदिवस असल्याने त्याने आपल्या मित्रांना आमंत्रित करून गावात रोडवर मोटरसायकल वर boss नाव लिहिलेले चार केक तलवारीच्या साहाय्याने कापुन हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केली.

व धड्याक्यात वाढदिवस साजरा केला. मात्र त्याचे हेच कृत्य बीबी पोलिसांना समजताच दि.29/05/24 रोजी बीबी पोलीसांनी वैभव घुले यास ताब्यात घेऊन विचारपूस करत त्याच्याकडून 01 तलवार जप्त केली.

व त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे बीबी चे ठाणेदार स.पो.नि संदिप पाटील,पोलीस अंमलदार अरुण सानप, यशवंत जैवाळ यांनी केली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

अलीकडच्या काळात तरुणांमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने DJ वाजविणे, तलवारीने केक कापणे असे कृत्य करून वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार वाढत असून त्यातुन एखादा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Cakenews:त्यामुळे पोलिसांकडून अशा कृत्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाढदिवसाला तलवारीने केक कापू नका,DJ वाजवू नका,पोलिसांचे आपल्यावर लक्ष आहे.असेच बीबी पोलीसांच्या कारवाई वरून दिसून येते.

ससून ला घडला खळबळजनक प्रकार ते रक्त बदलले एका खाजगी वेक्तीने ते बाईच कि आईच नेमका काय? ( Pune accdent porsche )

0

 

Pune accdent porsche: आता तर या ससून रुग्णालयात नेमकं खळबळजनक प्रकार घडला असल्याचे माहिती समोर आले आहे. तर आता तर या चाचणी करण्यास अल्पवयीन कार चालकाला ससून रुग्णालयात आणल्यानंतर खासगी व्यक्तींनी येथे येत प्रेशर करून रक्त बदलले. मात्र या तर या व्यक्तींनी ‘सोबत’ आणलेले रक्त तपासणीसाठी पाठवण्यास का भाग पाडले.

मात्र आता तर कल्याणीनगर हायप्रोफाईल कार अपघातप्रकरणात (Porsche Car Accident) दररोज नवनवीन खुलासे होऊ लागले असून, आता ससून रुग्णालयात मात्र या खळबळजनक प्रकार घडला असल्याचे माहिती समोर आले आहे.

तर आता या चाचणी करण्यास अल्पवयीन कार चालकाला ससून रुग्णालयात आणल्यानंतर खासगी व्यक्तींनी येथे येत प्रेशर करून रक्त बदलले. तर या व्यक्तींनी ‘सोबत’ आणलेले रक्त तपासणीसाठी पाठवण्यास भाग पाडले.

तर आता मात्र यासर्व गोष्टी डॉ. तावरे याला माहिती होत्या त्याच्या सूचनेनुसार हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. तर ऐनवेळी रुग्णालयात आलेले हे खासगी व्यक्ती कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

या ससून सूत्रांच्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात तपासणीसाठी मुलाला आणले. मात्र तेव्हा संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालक मुलाचे रक्त घेतले होते. तर मात्र, ऐनवेळी आलेल्या खासगी इसमाने संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे रक्त बदलण्यास भाग पाडले आणि स्व:तसोबत आणलेले रक्त त्या ठिकाणी ठेवले.Pune accdent porsche

मग काय तर त्यामुळे त्या दिवशी ससून रुग्णालयात आलेले ते खासगी इसम कोण? मात्र कुणाच्या सांगण्यावरून ते रुग्णालयात आले होते? या रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? नेमकं असे अनेक प्रश्न या ठिकाणी निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आता तर या दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल बदलणाऱ्या ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

तर आता डॉ. तावरे यानेच रक्त बदल करण्याचा सल्ला दिला होता. पण, आता फक्त रक्त बदल करण्याचाच नाही तर ससून रुग्णालयात खासगी व्यक्तीचा शिरकाव व बाहेरून आणलेलेबते रक्त जमा करणे, ही सर्व माहिती तावरेला होती.

‘ते’ रक्त एका महिलेचे कि आईचे

मात्र आता ‘ते’ रक्त एका महिलेचे असल्याचे समोर आले आहे. तर मात्र, ती महिला कोण आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. आई की दुसरीच महिला याचा तपास सुरु आहे.

Pune accdent porsche:मग काय तर या रक्त त्या तिघांनी बाहेरून आणले आणि डॉक्टरांना तपासणीसाठी दिल्याचा धक्कादायक प्रकार ससूनच्या चौकशी समितीतून समोर आला. मात्र आता दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली.

भुसावळ शहरात रात्री गोळीबार :, दोन ठार..संतोष बारसे, सुनील राखुंडे यांच्यावर झाडल्या गोळ्या.( brekingnews )

0

 

विकी वानखेडे सह प्रतीक कुऱ्हेकर भुसावळ

संतोष बारसे यांचे वडील मोहन पहेलवान यांच्यावर देखील जुलाई 2015 मध्ये असाच हल्ला झाला.

• माझी प्रभारी नगराध्यक्ष सोनी बारसे यांचे पती संतोष बारसे गोळीबारात ठार.
———————————-

brekingnews:जळगाव :-भुसावळ शहरात बुधवारी रात्री ९.४५वा. घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे दोघे ठार झाल्याचे वृत्त आहे. जळगाव नाक्यावर मरीमाता मंदिराजवळ अज्ञातांनी हा गोळीबार केला. घटनेच्या वेळी दोघेही कारमधून भुसावळकडे प्रवास करत होते.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

संतोष बारसे हे माजी प्रभारी नगराध्यक्ष सोनी बारसे यांचे पती आहेत. ते राखुंडे यांच्यासोबत कार क्रमांक एम.एच.१९- पी.जी. ०१८७ ने जळगाव नाका येथून जात होते.

त्याचवेळी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. चालकाच्या बाजूने दोघांवर गोळीबार झाला आहे. ही कार सुनील राखुंडे हे चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यानंतर शहरात पळापळ सुरू झाली आणि दुकाने तातडीने बंद करण्यात आली.
ही घटना कळताच शहर पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले हल्ला झाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी तातडीने डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात नेले.

brekingnews:मात्र या हल्ल्यात बारसे आणि राखुंडे हे दोन्ही जण ठार झाल्याच्या वृत्ताला डॉ. राजेश मानवतकर यांनी दुजोरा दिला आहे. संतोष बारसे यांचे वडील मोहन पहेलवान यांच्यावरदेखील जुलै २०१५ मध्ये कन्या शाळेच्या मैदानाजवळ हल्ला झाला होता.
———————————-

अकोट तालुक्यातील युवा पत्रकार पुर्णाजी खोडके राज्यस्तरीय युवाश्री पुरस्काराने सन्मानित. ( journalist )

0

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

journalist:अकोला:जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार व परिसरातील युवा पत्रकार तथा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष, ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख, पुर्णाजी खोडके यांना,तरुणाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या अकोला जिल्हा साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय, युवाश्री स्वामी विवेकानंद, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी हास्यजत्रा फेम कलावंत कुणाल मेश्राम, प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ संदीप चव्हाण, श्रेष्ठ साहित्यिक प्रा. सतीश तराळ, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख, पत्रकार संजय कमल अशोक, प्रा. देवानंद गावंडे, डॉ. किरण वाघमारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुर्णाजी खोडके यांना राज्यस्तरीय युवाश्री स्वामी विवेकानंद पुरस्काराने सन्मान करण्यात आले.

पुर्णाजी खोडके हे चोहोट्टा परिसरातील पत्रकार असुन अनेक, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक पुरस्कार व युवाश्री पुरस्कार प्राप्त पत्रकार असून, त्यांनी आतापर्यंत अवैद्य धंदे विरोधत, घरकुल प्रश्न ,आरोग्य प्रश्न, रस्ते,पाणी ,तलाठी मुख्यालय संदर्भात ,

अकोल्यात शेतकरी पेटला बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केला चक्का जाम ( formernews )

विद्यार्थ्यांसंदर्भात ,शेतकरी बांधवांसंदर्भात ,अपंग निराधार संदर्भात, विविध क्षेत्रात सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलेले आहे..गोरगरीब अपंग दिव्यांग दिणदलीत लोकांसाठी शाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांचे विचार घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत.

 

journalist:पुर्णाजी खोडके अनेक उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कामगिरी बद्दल पूर्णाजी खोडके यांना युवाश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.

कु धनश्री उंबरकर चे कौतुक ( buldhananews )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

buldhananews:शेगाव येथील जेष्ठ पत्रकार,डिजिटल मिडिया परिषद चे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांची मुलगी कुमारी धनश्री उंबरकर हिला एसएससी इयत्ता दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळाले.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

याबद्दल शेगावातील पत्रकार बांधवांनी कुमारी धनश्रीचे अभिनंदन केले

अ भा श्री गुरूदेव सेवा मंडळाचे वतीने केंद्रीय सचिव राष्ट्रीय किर्तनकार सुशिल महाराज वणवे,जिल्हा सेवाधिकारी गणेश महाराज जवंजाळ,महेंद्र ठोंबे,अतुलदादा उमक,मनोहरदादा

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

buldhananews:पाचपोर,जुगल राठी,शांताराम घुये,ज्ञानेश्वर गासे,शिवाजी माळी,दशरथ तायडे आदीनी धनश्री उंबरकर व क्रिष्णा वणवे यांचे यशाबद्दल त्यांचा सत्कार करून
कौतुक केले.