Home Blog Page 135

बस अपघात: ६ महिने उलटूनही मात्र शासकीय मदत नाहीच, शेवटी मृतांचे नातेवाईक करणार फडणवीसांच्या घरासमोर रामनामाचा जप? ( Buldhana Bus Accident )

0

 

Buldhana Bus Accident: बुलढाणा समृद्धी महामार्गावर गेल्या १ जुलै रोजी खासगी बसचा अपघात झालं मात्र भीषण आग लागली होती. तर या दुर्दैवी घटनेत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

तर या भयंकर घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. मात्र या अपघातानंतर शासनाकडून कोणतेही मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांच्या मदतीची घोषणा केली होती.

तर मात्र सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कोणतीही प्रकारची या मृत्यू च्या नातेवाईक ला मदत देण्यात आली नाही, तर त्यामुळे नातेवाईकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

Samruddhi हीघवाय वर बुलढाण्याजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. तर या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता.

Crime News : शाळेत जाणाऱ्या पत्नीला पतीनेच संपवले; या कारणाने महाराष्ट्र हादरला

 

मात्र या समृद्धी महामार्गावरील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा अपघात आहे. तर या अपघातनंतर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती.

तर मात्र सहा महिने झाले तरी पीडित कुटुंबियांना मदत मिळालीच नाही, तसेच दोषींवरही कारवाई झाली नाही.

तर त्यामुळेच 20 पीडित कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालय समोर राम नाम जप करणार.

सूत्रांची माहिती असल्याचा इशारा दिला आहे. आज (१९, जानेवारी) हे परिवार रामनामाचा जप करणार होते, मात्र यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

मात्र पोलीस प्रशासनाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर राम नाम जपाचा आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

 

 

तर त्यामुळे संविधान चौक येथे दुपारी 12 ते 4 या वेळेत समृद्धी महामार्गावरील अपघाती मरण पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी मागणी केली जाणार आहे.

Buldhana Bus Accident : तर आता या दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. पण कुटुंबीयांकडून 25 लाख रुपयांची मागणी केली जात आहे.

Crime News : शाळेत जाणाऱ्या पत्नीला पतीनेच संपवले; या कारणाने महाराष्ट्र हादरला

0

 

Crime News : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला ही काळिमा फासणारी मोठी घटना गुरुवारी सकाळी घडली. या छोट्या गावातील बोरीतील एका शाळेत नववीत शिकणा-या जयश्री विश्वनाथ वाव्हळ (१६) या मुलीची पतीने तिला धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना समोर घडली आहे.

बोरी संभाजीनगरमध्ये राहणा-या जयश्री वाव्हळ हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे राहणारे रोहित गायकवाड वय (२२) याच्याशी झाला होता.

नेमके जयश्रीला शिक्षणाची खूप आवड असल्याने तिने आपलेच माहेरी बोरी येथे येऊन एका शाळेतनाव टाकलं व ती नववीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. व त्या दरम्यान गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास जयश्री वाव्हळ ही शाळेत जाण्यासाठी निघाली.

व त्या यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने ती एकटी जात असताना तीचा पती पाठीमागून रोहित गायकवाड याने पत्नीला धारदार शस्त्राने जयश्रीवर सपासप वार केले.

Breaking news | रेल्वे रोको पूर्वीच रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात ! बुलढाणा पोलिसांची राजूर घाटात कारवाई; ठाण्यासमोर कार्यकर्ते जमले

त्यात यात तिचे मानेवर व चेह-यावर सपासप वार करीत तिला गंभीर जखमी केले. ती यात जयश्री रक्ताच्या थारोळ्यात जागेवर पडली.

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिस ठाण्याचे जमादार कृष्णा शहाणे, सय्यद गयासोद्दीन यांनी गंभीर जखमी जयश्रीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती काळे यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविले.

या दरम्यान परभणीतील जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. पण यावेळी सपोनि. सरला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी संपूर्ण घटना ची केली.

 

व या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Crime News: सविस्तर या घटनेनंतर रोहित गायकवाड हा पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी वारंवार सांगूनही पत्नी जयश्री ही आपल्या सोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात तिचा खून केल्याचे पतीने पोलिसांना सांगितले.

Breaking news | रेल्वे रोको पूर्वीच रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात ! बुलढाणा पोलिसांची राजूर घाटात कारवाई; ठाण्यासमोर कार्यकर्ते जमले

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Breaking news: बुलढाणा : पोलीस कारवाई टाळण्यासाठी भूमिगत झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी राजूर घाटातून आज संध्याकाळी उशिरा ताब्यात घेतले.

त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाण्यासमोर तुपकरांचे कार्यकर्ते जमले असून घोषणाबाजी करीत असल्याने तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

१९ जानेवारीच्या मलकापूर रेल्वे स्थानकात आयोजित रेल्वे रोको साठी जातांना पोलिसांनी राजुर घाटातून ताब्यात घेतले. संभाव्य कारवाई लक्षत घेता भूमिगत झालेले तुपकर नवीन वाहनातून आज संध्याकाळी मलकापूर कडे रवाना झाले.

बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाटात करडी नजर ठेवून असलेल्या बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना पावणे आठ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांना कडेकोट बंदोबस्तात शहर ठाण्यात आणण्यात आले.

Crimenews | बसच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू ! शेवटी संतप्त जमावाने बस पेटवली.. या तालुक्यातील घटनेने खळबळ

याची वार्ता पसरताच कार्यकर्ते ठाण्यासमोर जमा झाले.त्यांनी घोषणबाजी सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. तिथे कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यांची रात्र ठाण्यातच जाण्याची शक्यता आहे.

कलम १५१अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना उद्या न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे.
आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव असून पोलिसांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे असा आरोप रविकांत तुपकरांनी यावेळी केला आहे.

 

Breaking news: मला अटक केली तरी माझे कार्यकर्ते आणि शेतकरी उद्याचे रेल्वे रोको आंदोलन पूर्ण करतीलच, असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले.

Crimenews | बसच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू ! शेवटी संतप्त जमावाने बस पेटवली.. या तालुक्यातील घटनेने खळबळ

0

 

संभाजी नगर | Crimenews:आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी चिमुकला निघालेल्या एका चार वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे. परंतु या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करत पेटवून दिली आहे.

या दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तसेच अग्निशमक दलाला पाचारण करून पेटवून दिलेली बसची आग विजवण्यात आली आहे. मग आता शाहरुख पठाण (वय ४ वर्षे) असे मयत मुलाचं नाव आहे. तर, आता याच अपघातात मुलाची आई देखील जखमी झाली आहे.

 

तर आता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर चार वर्षांचा शाहरुख पठाणने आपल्या आईचा बोट धरून किराणा दुकानात जात होता.

मग अचानक याचवेळी तिथून जाणाऱ्या एका शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली. ज्यात आई गंभीर जखमी झाली.

Rahul Narwekar: एकनाथ शिंदे मुळे राहुल नार्वेकर येणार अडचणीत? कारण मुंबई हायकोर्टाने पाठवली नोटीस

मग मात्र, शाहरुख पठाणने बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

परंतु नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाला डॉक्टरांनी मुलाला मयत घोषित केले.

 

चितेगाव येथील पांगरा रोडवर एका शाळेच्या बसने आई-मुलाला धडक दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली.

Crimenews : मुलाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेची बसची तोडफोड केली. बसच्या संपूर्ण काचा फोडण्यात आल्या. काही लोकांनी मध्यस्थी करून गर्दी पांगवली. मात्र, त्यानंतर काही अज्ञात लोकांनी येयून बस पेटवून दिली.मात्र आता ज्यात बस अक्षरशः पूर्ण जळून खाक झाली आहे.

Rahul Narwekar: एकनाथ शिंदे मुळे राहुल नार्वेकर येणार अडचणीत? कारण मुंबई हायकोर्टाने पाठवली नोटीस

0

 

Rahul Narwekar: या प्रकरणात आता मुंबई हायकोर्टाने विधानसभा अध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस पाठवली आहे. पण आता ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र का केले नाही?

असं म्हणत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका प्रकरण दाखल केली होती.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनावाला यांनी राहुल नार्वेकर आणि ठाकरेंच्या १४ आमदारांना शपथपत्र सादर करण्यास सांगितलं आहे.

परंतु तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आता या प्रकरणे ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र करण्यात यावे यासाठी भरत गोगावले यांनी १२ जानेवारी रोजी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

आता शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला होता.

एकनाथ शिंदे गटाच्या १६ आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि शिवसेना कोणाची याबाबत नार्वेकरणांनी निर्णय दिला.

 

Crimenews | यावल पुनश्च तरूणी सोबत लिव्ह ईन रिलेश्नशिफ मध्ये राहणाऱ्या तरुणाच्या कुटुंबास मारहाण पोलीसात तक्रार

पण आता शिंदे गटाची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिलाय. परंतु तसेच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं.

मग सर्व मात्र, या निर्णयामुळे शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट नाराजी वेक्त केल्याचं दिसत आहेत.

एकनाथ शिंदे गटाची शिवसेना खरी तर मग त्यांचे प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप ठाकरेंच्या आमदारांना का लागू झाला नाही.

उद्धव ठाकरेंच्या १४ आमदारांना देखील अपात्र करायला हवं होतं, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली.

Rahul Narwekar: परंतु त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने याच मुद्द्यावरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. तर आता दुसरीकडे, राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला विरोध करत उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Rahul Narwekar: तर आता त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे-ठाकरे गट आमनेसामने येणार आहेत.

Shegaonnews विश्राम गृह शेगाव येथे लक्षवेध संघटनेची बैठक संपन्न झाली खास पत्रकार दिनाचे साधून ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ,

0

 

स्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

सामाजिक काम करत असताना लोकशाहीला मजबूत करण्यासाठी पत्रकार कायम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असतात परंतु आजची राजकीय सामाजिक परिस्थिती बघता जे खेळी मेळीचे वातावरण निर्माण होत

आहे त्या मध्ये सर्वसामान्य माणसाला हक्क आणि त्यांचा अवाज उचलण्याचे काम कायम पत्रकार आपल्या लेखिनीच्या माध्यमातून पुढे घेऊन जात असतात त्यामुळे आज लोकशाहीचा कणा पत्रकार आहेत ,

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

लक्ष्यवेध संघटनेच्या संस्थापिका अद्येक्षा सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी आजच्या बैठकीत बोलताना आपले मत मांडले आणि सर्व पत्रकर वर्गाला भेट देऊन त्यांचा सत्कार केला..

Shegaonnews : उपस्थीत पत्रकार वर्ग रामेश्वर गायकी, फहीम देशमुख, राजेश चौधरी, देवानंद उमाळे, नाना पाटील, नंदू कुलकर्णी, अमर बोरसे, दिनेश महाजन, राजवर्धन शेगांवकर, राजकुमार व्यास, शेख इस्माईल, समीर देशमुख, सतीश अग्रवाल, श्रीकांत कलोरे, रवी शेगोकार, समीर शेख, नारायण दाभाडे, संजय ठाकूर, प्रशांत खत्री, अनिल उंबरकर, हे होते.

Crimenews | यावल पुनश्च तरूणी सोबत लिव्ह ईन रिलेश्नशिफ मध्ये राहणाऱ्या तरुणाच्या कुटुंबास मारहाण पोलीसात तक्रार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील एका गावात एकाच समाजातील तरूण व तरुणी हे एकामेकाच्या सहमतीने लग्न न करता एकामेकांना जाणुन घेण्यासाठी हा योग्य पर्याय असुन.

याच आधारावर न्यायालयाच्या परवानगीने लिव्ह ईन रिलेशनशिफ मध्ये राहात असल्याकारणाने तरूणीच्या कुंटुबाकडून तरूणाच्या कुटुंबास मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली.

असुन, लिव्ह ईन मध्ये राहणाऱ्यांच्या तरूणाच्या कुटुंबास मारहाण झाल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना असुन या बाबत मुलाच्या कुटुंब्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावल तालुक्यातील एका गावात मागील चार महीन्यांपासुन लिव्ह ईन रिलेशनशिफ राहणारे एकाच जातीच्या जोडप्यांच्या कुटुंबाला तरुणीच्या संत्पत झालेल्या कुटुंबीयांकडून दिनांक १५जानेवारी रोजी दुपारी १.३० च्या सुमारास तिन जणांनी तरूणाच्या घरात घुसुन कुटुंबांतील दोन जणांना मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

 

व घरातील सुमारे पन्नास हजार रूपये किमतीच्या मौल्यवान वस्तुची तोडफोड करीत तरुणांच्या कुटुंबातील काही सदस्यांना मारहाण केल्याची घटनासमोर आली.

Crimenews: असुन , तरुणाच्या कुंटुब्यांनी याबाबत यावल पोलीस ठाण्यात गावातील पोलीस पाटील यांच्या मदतीने जळगाव येथील राहणाऱ्या तरुणीच्या कुटुंबा विरूद्ध तक्रार दिली आहे .

Crimenews | समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्षा उमाताई बोचरे यांना राजकीय वैमण्यातून जीवेमारण्याची धमकी..!

0

 

बुलढाणा:-जिल्हातील समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती उमाताई बोचरे यांना राजकीय वैम्मान्यातून जिवेमारण्याची धमकीय व  अश्लील भाष्य करण्यात आलाये.

समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा श्रीमती उषाताई बोचरे यांचे जिल्ह्यातील वडनेर येथे नागरिकांच्या समस्यांच्या निवारणार्थ जनसंपर्क कार्यालय असून,

त्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांच्या निवारणार्थ त्या उषाताई नेहमी झटत असतात.

मात्र काही राजकीय समाजकंटकांनी त्यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यालयात येऊन  अश्लील  भाषेत शिवीगाळ केली.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

, एव्हढेच नव्हेतर त्यांना व त्यांच्या कार्यालयास जाळून टाकण्याची धमकी येथील काँग्रेस पार्टी चे अजमत बेग अहेमद बेग उपसरपंच वडनेर भोलजी, अब्दुल हमीद अब्दुल रसीद, वकील खान एहसान खान व रहीस खान शब्बीर हे त्यांना राजकीय वैमण्यस्यातून त्यांच्याच कार्यालयात येऊन अश्लील शिवीगाळ करून जिवेमारण्याची धमकी देत होते.

त्यांच्या विरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वेय गंभीर गुन्हे निंदविण्यात आले आहेत.

 

मात्र अध्यापही पोलिसांच्या वतीने कुठलीही कारवाई न झाल्याने आरोपिंची मज्जाव वाढली.

Crimenews :असून आरोपी अध्यापही मोकाटच आहेत. पोलिसांच्या या कृत्यामुळे मात्र शहरात चर्चेला वाव फुटले आहे.

Akolanews | शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार नुकसानीची मदत

0

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

Akolanews :मुर्तीजापुर तालुक्यातील मधापुरी या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार नुकसानीची मदत याची प्रतीक्षा करत असताना शेवटी शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या दरबारात निवेदनाच्या माध्यमातून आपली कैफियत मांडावी लागली.

Akolanews: मुर्तीजापुर तालुक्यातील मधापुरी,जेठापूर,हयातपूर येथील सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना निवेदन सादर केले दिलेले निवेदन नमूद केले आहे.की २०२३ मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली संपूर्ण शेती खरडून गेली अतोनात नुकसान झाले तरी लाभ मिळाला नाही.

शासनाने मंजूर केलेले पीक विकण्याची २५% अग्रीम मदत सुद्धा मिळाली नाही.२०२२ मध्ये जाहीर झालेली मदत आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

२०२३ जुलै ते ऑगस्ट या दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे व जमिनीचे अतोनात नुकसान झाले परंतु चुकीच्या सर्वामुळे जे संबंधित गरजू लाभार्थी आहे.हेतूपुरस्कर वगळता आले असून त्याची चौकशी करण्यात यावी पिक विमा मंजूर झालेले शासनाचे २५% अग्रीम रक्कम अजून पर्यंत विमा काढलेले शेतकऱ्यांना मिळाले नाही.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

 

याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे विमा कंपनीचे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावे २०२२ मध्ये अतिवृष्टी सरसकट शेतकऱ्यांना शासनाने मदत घोषित केलेली होती.

परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अजून पर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.यादीमध्ये नाव असूनही विशिष्ट क्रमांक वीके अजून पर्यंत आलेला नाही.संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना देऊन याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी समस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Akolanews : तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याशी शेतकरी अमर ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली शिल्पा बोबडे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी शेतकरी अमर ठाकरे,चंद्रकांत उमक,अमोल पवार, सतीश मालधुरे,गजानन पवार,शंकरराव खरबडे,अश्विन आमटे,देवानंद मेरे,शिवाजी मेहरे, संजय बनाईत,चंद्रकांत गणोरकर,पांडुरंग डहाके,विनोद इंगळे,नरेंद्र दहीकर,कमल आमले व इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

Ravikanttupkar | १९ जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन! राजधानी व गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या रोखणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा

0

 

बुलढाणा: Ravikanttupkar: मागील तीनेक महिन्यापासून आपण शेतकऱ्यांसह रस्त्यावर लढत आहोत. मात्र निवडणूक अभियान राबविणारे मुख्यमंत्री असो वा अन्य सत्ताधारी नेते असो, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सवड नाही.

यामुळे आमचा संयम संपला असून येत्या १९ जानेवारीला ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

येथे प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना तुपकर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत नवीन आंदोलनाची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, बुलढाण्यापुरते सांगायचे झाल्यास जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात येईल. १९ जानेवारीला सकाळी ६ वाजताच आंदोलनाला सुरू करण्यात येणार आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

यावेळी हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मुंबई, दिल्ली व गुजरात राज्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रोखणार आहे. जीव गेला तर चालेल, पण स्थानकातून एकही रेल्वे सुटू देणार नाही, असे तुपकर यांनी यावेळी निक्षून सांगितले.

या आंदोलनाची कारण मीमांसा सांगताना ते म्हणाले की, मागील ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही लाखो सोयाबिन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी विविध टप्प्यात आंदोलने करीत आहे.

एल्गार मोर्चा, रथयात्रा, मंत्रालय ताब्यात घेणे, अन्नत्याग आदी आंदोलनाच्या माध्यमाने आम्ही राज्य व केंद्र शासनाकडे मागण्या रेटल्या.सोयाबिन, कपाशीला दरवाढ, यलो मोझाक, लाल्या, बोण्ड अळी मुळे झालेली नुकसानीची भरपाई, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीची भरपाई, सोयापेंड, पामतेल आयात बंद करावी या मागण्यांना राज्य व केंद्राने मान्यता दिली.

मात्र कारवाई शून्य असून शेतकऱ्यांना कवडीची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडला असताना मुख्यमंत्री शिवसंकल्प अभियान राबवून लोकसभेची तयारी करीत आहे.

त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही की मदतीसाठी त्यांच्याजवळ पैसा नाही,असे विचित्र चित्र आहे.

Ravikanttupkar : आता शेतकऱ्यांचा संयम संपल्याने रेल्वे रोको करण्यात येत आहे. सरकारला आम्ही १८ जाने वारीची मुदत दिली आहे. त्या मुदतीत मदत मिळाली नाही तर आंदोलन अटळ असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले.