Home Blog Page 15

Sameerkunavar/ हिंगणघाट | उपजिल्हा रुग्णालयातील वीज खंडित प्रकरणाचा आढावा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- दी. 26 /09/25
शुक्रवारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात वीज खंडित झाल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप उसळला. नवजात बालकांची व महिलांची जीवित सुरक्षाही धोक्यात आली.

आज आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, महावितरण व पोलीस प्रशासन उपस्थित होते.

नागरिकांनी व पत्रकारांनी व्यवस्थेतील त्रुटींवर रोष व्यक्त करत अनेक गंभीर मुद्दे मांडले:

वीज खंडित होणे

जनरेटर अद्याप बंद

शौचालयांची दुरवस्था

झाडाझुडपांची वाढ व औषधांचा अभाव

आ. कुणावार यांनी सर्व तक्रारींची दखल घेत दोषींवर तातडीने कारवाईचे निर्देश दिले व झाल्या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना विस्तृत अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले.

Sameerkunavar /लवकरच येथील अव्यवस्थेचा प्रकार आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांचे कानावर घालून कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे कुणावार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Navdurga/हिंगणघाटची माँ राणी – भक्तांच्या श्रद्धेचा महासागर!

0

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट (जि. वर्धा): नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर हिंगणघाट शहरात माँ राणीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. साई मंदिर, नंदोरी रोड परिसरात प्रतिष्ठापित करण्यात आलेली माँ राणीची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हिंगणघाटची माँ राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुर्गा देवीच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना २२ सप्टेंबर रोजी नवरात्रारंभाच्या दिवशी करण्यात आली. माँ राणी नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मूर्तीची सजावट, मंडपातील आकर्षक रोषणाई, आणि साई मंदिर परिसरातील वातावरण भक्तिभावाने भरलेले आहे. परिसरात लहान मुलांसाठी झुल्यांची व्यवस्था, तसेच खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांची खास मेजवानीही उपलब्ध आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, विधिवत पूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य गरबा महोत्सव हे खास आकर्षण ठरत आहे. शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने माँ राणीच्या दर्शनासाठी येत आहेत.

Navdurga/भाविकांनी अधिक संख्येने उपस्थित राहून नवरात्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले आहे.

Sadabhaukhot/उमरगा तालुक्यात आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद

0

 

बातमीदार-: ऋषिकेश सुरवसे

Sadabhaukhot/उमरगा : मागील काही दिवसांपासुन होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह उमरगा तालुक्यातही शेतातील पिकांसह शेतशिवाराचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माजी कृषी राजमंत्री आमदार सदाभाऊ खोत व उमरगा नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी बांधावर जावून पाहणी केली.

यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याची सुचना देऊन शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिले.

उमरगा तालुक्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. मुग, उडीद व सोयाबिन पिकात पाणी उभारल्याने पिके नासुन गेली आहेत. तर तुरीसह इतर खरीप पिकांना पाणी लागुन ती पिवळी पडली आहेत. ऊसाचे फड आडवे झाले आहेत.

यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी वाट पहात आहेत.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचे काम आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.

त्यांनी तालुक्यातील येणेगुर, दाळिंब, येळी आदी गावात झालल्या नुकसानीचे शनिवारी (दि. २७) रोजी पाहणी केली. पाहणीदरम्यान उमरगा तालुक्यात शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करुन घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगुन यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.

मनोज यमुलवाड मंडळ अधिकारी दाळिंब, रंजना राठोड ग्राम महसूल अधिकारी येणेगूर, जी बी शेख सहाय्यक कृषि अधिकारी येणेगूर, अविष्कार भालेराव सहाय्यक कृषि अधिकारी दाळिंब, सदानंद इंगळे ग्रामपंचायत अधिकारी येणेगूर उपस्थित होते
यावेळी शेतकरी महेश सोनवणे,महेबुब मुल्ला, महादेव बिराजदार, सतिश जाधव, शरण बिराजदार, अल्ताफ मुल्ला, अजीम खजुरे उपस्थित होते.

Sadabhaukhotआमदार सदाभाऊ खोत यांनी वैशाली चॅरिटेबल ट्रस्ट याठिकाणी भेट दिले असता भारतीय संविधान व बुद्ध आणि धम्म ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वैशाली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष-प्रा.अजय कांबळे , उपाध्यक्ष-अमोल कांबळे व सर्व संचालक मंडळ तसेच सरपंच-निवृत्ती पवार ,शिवलिंगप्पा माळी (माजी सरपंच), व्यंकटराव मोरे(माजी उपसरपंच),प्रा.जी.एस.सुरवसे ,आयु.भिमराव निवृत्ती कांबळे, आयु.रोहिदास कांबळे आयु.संदीपान गणपती कांबळे, आयु.नागनाथ श्रीपती कांबळे,बबन कांबळे, अभिमन्यू कांबळे, विशाल कांबळे,हरीश कांबळे बाबा पवार आदी उपस्थित होते आदीसह विविध गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Umrganews/भाऊसाहेब बिराजदार बँकेची २९ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

0

अतिवृष्टीने शेतकरी सभासद अडचणीत असल्यामुळे १०% लाभांश देणार – प्रा . सुरेश बिराजदार
————

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन प्रा . सुरेश दाजी बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२७) रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे उत्साहात संपन्न झाली. धाराशीव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी सभासद मोठ्या अडचणीत आलेला आहे .त्यामुळे यावर्षी दहा टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी जाहीर केले .

यावेळी संचालक सुनील माने ,गोविंदराव साळुंखे , साहेबराव पाटील , विजयकुमार सोनवणे,  व्यंकटराव सोनवणे,डॉ . मल्लिनाथ मलंग यांच्यासह पद्माकरराव हराळकर ,योगीराज कदम ,आर.डी माने,अभिजीत माडीवाले,किसन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती
बँक आजतागायत सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मध्ये आहे .

बँकेचा ठेवीदार हा व्यवसायाचा कणा असतो. ठेवीदारांनी बँकेवर दाखवलेला विश्वासावरच बँकेची प्रगती अवलंबून असते. याशिवाय लातूर शहरात पुढील तीन महिन्यात एक तर सोलापूर, बीड, पुणे जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये भविष्यात उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी सभासद मोठ्या अडचणीत आहेत अशा परिस्थितीत त्यामुळे सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले .

पारदर्शक कारभार करून बँकेने विश्वासाने निर्माण केली आहे बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एटीएम , एस.एम.एस.,आरटीजीएस, एनईएफटी ,आय एम पी एस ,यु पी आय, सुरक्षीत लॉकर, सुविधा बँकेने सुरू केली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी आर . के . शहापुरे यांनी सभे पुढील विषय वाचन केले . नानाराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी तर आभार संचालक साहेबराव पाटील यांनी मानले .

Umrganews/यावेळी सुनिल साळुंके , शमशोद्दीन जमादार , रमेश बिराजदार ,संचालक इंद्रजीत घोडके , संजय गायकवाड ,सतीश साळुंखे , रामकृष्ण बिराजदार ,शिवाजीराव मोरे , राहुल पाटील , मधुकर सोनवणे , ॲड संदीप ढगे -पाटील ,यांच्या सह अशोक कारभारी , कमलाकर काळे, मारुती पाटील,संजय जाधव , व्ही एम.पाटील ,सत्यनारायण जाधव ,आयुब पटेल ,पवन पाटील ,
प्रा. सतीश इंगळे ,दयानंद बिराजदार, ब्रिजेश बिराजदार, सुरेंद्र पौळ ,विजय चव्हाण ,संतोष शिरगुरे , सतीश सुरवसे ,विष्णू माने, भरत जाधव, श्री . तांबे, श्री . माळी याच्यासह बँकेच्या सातही  शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते

jayshree shelke/ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न.

0

 

बुलढाणा /पालकमंत्र्यांना दिले निवेदन.सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर डीपीडीसी बैठकीच्या अनुषंगाने धडक देण्यात आली.jayshree shelke

पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.मकरंद जाधव पाटील यांना मागणीची निवेदन ही देण्यात आले.यावेळी जिल्हासंपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई, शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर

बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने,डी एस लहाने सर, सुमित सरदार, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, आशिष रहाटे, गजानन ठोसर, विलास सुरडकर, तुकाराम काळपांडे, गजानन धांडे,सुनील घाटे,शिवसेना तालुकाप्रमुख विजय इतवारे,राजेंद्र वाघ, संतोष

jayshree shelke/दांडगे,विजय किसन धोंडगे,श्रीराम खिलदार,आत्माराम शेळके,ईश्वर पांडव, अशोक गव्हाणे नारायण हेलगे,जिल्ह्यातील शहर प्रमुख उपतालुका प्रमुख व सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते!

dhangar aarakshan/एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचे लाक्षणिक उपोषण

0

 

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा : महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, तसेच मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण सोडवण्यासाठी व धनगर समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशा मागनीचे निवेदन उमरगा तहसीलदार यांना शुक्रवारी (दि.२६) रोजी देण्यात आले.

उमरगा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाची अनुसुचित जमातीच्या (एस.टी.) प्रवर्गात व भारतीय घटनेत ३६ क्रमांकावर धनगर ही एकच जमात असून, भारतातील इतर राज्यामध्ये अंमलबजावणी झालेली आहे.

परंतू महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अनेक सरकारे आले आणि गेले फक्त आश्वासने देवून, जाणिवपूर्वक एस.टी. ची अंमल बजावणी करून .अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देत नसून, या बाबत महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाजावर फार मोठा अन्याय झालेला असून यासाठी मराठवाड्यातील जालन्यामध्ये धनगर समाजाचे दिपक बोऱ्हाडे हे गेल्या १० दिवसापासून आमरण उपोषणाला बसले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात येत आहे.

तसेच शासनाने तात्काळ निर्णय नाही घेतल्यास विजयादशमी दसऱ्यानंतर महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

dhangar aarakshan/निवेदनावर अखिल भारतीय धनगर समाज संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय गाडेकर, वैजीनाथ कागे, संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कलिंदा घोडके, महिला प्रदेशअध्यक्षा शिवाजी गावडे, माजी नगसेवक गोविंद घोडके,जालिंदर सोनटक्के,बालाजी घोडके,अरुण गडदे,उत्तमराव घोडके,राम घोडके,खंडू दुधभाते,अर्जुन दुधभाते,गोपाळ घोडके,लक्ष्मी घोडके,सुवर्ण ब्याळे,कविता घोडके,सविता दुधभाते,शोभा हिंडोळे, कोंडाबाई वाघमोडे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Farmernews /शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे

0

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

ओला दुष्काळ जाहीर करा -शेतकरी मित्र परिवाराची मागणी

सिंधी रेल्वे तहसील कार्यालयात जाऊन
अधिकाऱ्यांना दिले निवेदन
शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अतिदृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे सोयाबीन पिकावर येल्लो मोजक नावाचा रोग आलेला आहे या रोगामुळे सोयाबीनचे पीक नष्ट झालेले आहे पावसामुळे आणि रोगामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे कापसावर बुरशी तुरीचे पीक नष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु पिक विम्याची रक्कम शेतकऱ्याला मिळेल की नाही या विचारात शेतकरी भ्रमित आहे शेतकऱ्याची आवाज म्हणून शेतकरी मित्र परिवारातर्फे आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या पिकाचा नुकसान पंचनामा करून तहसील कार्यालयात पाठवा शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.

Farmernews /याकरिता शेतकरी मित्र परिवाराचे अध्यक्ष रवी भाऊ वाघमारे उपाध्यक्ष रामभाऊ सोनटक्के सचिव रामेश्वर घंगारे अमोल गवळी किशोर डकरे आशिष सातपुते जीवन बेलखोडे चंदन चव्हाण गणेश काळबांडे सुरेश गंगारे इम्रान राजू दांडेकर प्रभाकर तडस यशवंतजी बडवाई इत्यादी शेतकरी उपस्थित होते

Sameerkunavar /आ. समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट, दि. २५ सप्टेंबर:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमात पंडित उपाध्याय यांच्या सामाजिक कार्याचा व राष्ट्रहितासाठी दिलेल्या योगदानाचा आठवणींना उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यशैलीचा आणि स्वदेशीच्या मूलमंत्राचा उल्लेख करत, तळागाळातील नागरिकांपर्यंत विकास पोहोचवण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीबद्दल गौरवोद्गार काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत याप्रसंगी वृक्षारोपणही करण्यात आले.

पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करत, समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

Sameerkunavar/या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा छायाताई सातपुते, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, समाजसेवक रवी रोहनकर, माजी नगरसेविका शारदा पटेल, रवीला आखाडे, धनश्री वरघणे, वैशाली सुरकार, प्रा. डॉ. राजू निखाडे, अनिता मावळे, शुभांगी गेडाम, नीता गेडेकार, नितीन गेडेकार, प्रेमिला हिवंज, उमा पानवटकर, प्रेमिला झिंगरे, रुबीना शेख, स्वप्निल सुरकार, अनिल चाफले यांचा समावेश होता.कार्यक्रम यशस्वीतेकडे नेण्यात सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

Atulvandile /डोंगरगाव पुनर्वसन गाव वंचित – प्रशासनाचे दुर्लक्ष; राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची भेट

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

समुद्रपूर, ता. २५ सप्टेंबर: समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगाव येथील पुनर्वसन झालेल्या गावात मूलभूत सुविधांचा अभाव असून, स्थानिक नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. वीज, रस्ते, नाली व पिण्याच्या पाण्याची कमतरता असून, नागरिकांना आपल्या हक्कांसाठी अजूनही कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.

डोंगरगाव हे गाव नदीलगत असल्यामुळे वारंवार पूरस्थितीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण गावाचे पुनर्वसन केले, मात्र नवीन पुनर्वसन स्थळी अद्याप आवश्यक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.sharadpawar

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी डोंगरगावला भेट देऊन गावाची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या, त्यावर अतुल वांदिले यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून गावच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले. Sharadpawar

Atulvandileया वेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, प्रशांत गहुकर, सरपंच संजय वरघणे, संजय कारवटकर, खुशाल लोहकरे, नंदकिशोर धोटे, गजानन गिरडे, उमेश चंदनखेडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Hingnghatnews /ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या खेळाडूंचा जिल्हास्तरावर दमदार प्रवेश!

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट (23-24 सप्टेंबर 2025): जय जवान अकॅडमी, रिमडो येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत जिल्हा स्तरावर आपले स्थान पक्के केले.

14 वर्षांखालील मुलींच्या गटात:
वेदिका हांडे हिने लांब उडीमध्ये पहिला क्रमांक पटकावला.
अनन्या चौधरी हिने थाळी फेक या प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला.
17 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये:
भाविक सूर्यवंशी याने एकाच वेळी तीन स्पर्धांमध्ये (100 मी., 400 मी. धावणे आणि लांब उडी) प्रथम क्रमांक मिळवत उत्तुंग कामगिरी केली.
साई तडस याने 200 मीटर धावणे व 100 मीटर अडथळा धावणे या प्रकारात आपली वेगवान कामगिरी सिद्ध केली.

17 वर्ष वयोगटातील मुलींच्या गटात:
पल्लवी मुडे हिने थाळी फेक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
या सर्व खेळाडूंनी येत्या जिल्हास्तरीय स्पर्धेत वर्धा येथे शाळेचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
शाळेचे संस्थापक गिरधर राठी, अध्यक्षा अर्पना राठी, सचिव रशेष राठी, कोषाध्यक्ष प्रवीण धोबे, मुख्याध्यापक अभिनव जैस्वाल, क्रीडा शिक्षक रोहन हुमाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शाळेचे संस्थापक गिरधर राठी म्हणाले, “शिक्षणासोबतच क्रीडाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग आहे. शाळेतील खेळाडूंनी मैदानी क्रीडेत उल्लेखनीय यश मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.”