Home Blog Page 16

Policenews /खामगावात घरफोडीचा गुन्हा उघड; अमरावतीतील महिलेला अटक, २ लाख १६ हजार रुपयांचे दागिने जप्त

 

अनिलसिंग चव्हाण ( संपादक )

खामगाव : शहरातील केला नगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात खामगाव शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अमरावती येथील एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून अंदाजे २ लाख १६ हजार ३२० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Crimenews /याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी साकेत संजय दशोत्तर रा. केला नगर, देशमुख मंगल कार्यालयाच्या मागे, खामगाव यांनी २६ फेब्रुवारी रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० ते ५.३० दरम्यान ते कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अंदाजे १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान सुरुवातीला कोणताही ठोस धागादोरा मिळत नसल्याने पोलिसांसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान होते. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सिमा परवीन नसीम शेख रा. साजिया नगर, हेदरपुरा, अमरावती हिला निष्पन्न करून ताब्यात घेतले.

तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यात सोन्याची अंगठी, कानातील झुमके, मंगळसूत्र पोत, नथ तसेच सोन्याच्या टिकल्या असा अंदाजे २ लाख १६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तपासात आरोपी महिलेने शेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतही तत्सम गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्या अनुषंगाने तेथील कलम ३३१(१), ३०५ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील गुन्हाही उघडकीस आला आहे.

Policenews /ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. एन. पवार यांच्या आदेशाने पोहेकॉ सागर भगत, पोका अंकुश गुरुदेव, पोका राहुल धारकर, मपोका दिव्या काळे, योका राम धामोडे, पोहेकॉ प्रदीप मोठे, भिमराव वानखेडे, पोका गणेश कोल्हे, पोका निशांत कळसकर व रविंद्र कन्नर यांनी केली.

Murdernews /रेती घाटाच्या ९८ लाखांच्या व्यवहारातून थरारक खून; रंगपंचमीला पाच आरोपी गजाआड

← Back

Thank you for your response. ✨

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

Breakingnews /वर्धा : वर्धा नदीतील बामर्डा रेती घाटाच्या कोट्यवधींच्या व्यवहारातून उफाळलेला वाद अखेर रक्तरंजित शेवटाला पोहोचला. ९८ लाख रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून पेटलेल्या संघर्षात भरत दयानंद नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रंगपंचमीच्या दिवशी पोलिसांनी धडक कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. नाशिक येथून अक्षय खडसे, सौरभ ठाकूर आणि अमोल कामडी यांना वर्धा गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले. तर नितीन कामडी व शेखर वांदीले यांना वरोरा पोलिसांनी अटक केली.

यापूर्वी सुनील झोरे, प्रफुल उमाटे आणि अतुल मोटघरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासानुसार, नागपाल यांच्यावर तलवारीने वार करून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत नदीपात्रात फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे.

Murdernews /या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल असून तपासाला वेग देण्यात आला आहे.

Murdernews/”होळीपूर्वी वाळूमाफियाच्या वादात बामर्डा घाटावर पुलगावच्या भरत नागपाल यांची हत्या, हिंसक हाणामारीत अनेक जण जखमी”

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

Chandrapur /वरोरा :चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बामर्डा घाट परिसरात १ मार्च रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता उघडकीस आलेल्या हिंसक हाणामारीत पुलगाव येथील भरत नागपाल यांची हत्या झाली.breakingnews

उत्खननाच्या सीमांकनावरून दोन गटांमध्ये वाद झाला, आणि त्यातून ही हिंसा घडली.

घटनेदरम्यान पाचपेक्षा अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली, आग लावली गेली आणि या संघर्षात अनेक लोक जखमी झाले.policenews

Breakingnews /ही घटना होळीच्या एका दिवसाआधी घडल्याने परिसरात अधिक तणाव वाढला आहे. वाळूमाफिया आणि उत्खननातील वादामुळे या हिंसाचाराची शक्यता आहे.

Policenews /हिंगणघाट पोलिसांची होळीपूर्व धडक कारवाई; १ लाख ३ हजारांचा अवैध दारू साठा जप्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :

Wardhanews /होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत तब्बल १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दारू साठा जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या कारवाईत मूखबीरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार नागरी रोडवर नाकाबंदी करण्यात आली. त्या वेळी दुचाकी मोपेड क्रमांक MH 32 AW 2465 थांबवून तपासणी केली असता चालक सुजल विनोद कडू (वय १८, रा. तहसील वॉर्ड, हिंगणघाट) याच्या ताब्यातून प्रीमियम कंपनीच्या देशी दारूच्या १५० प्लास्टिक शिश्या (किंमत १५,००० रुपये) व डेस्टिनी प्राईम कंपनीची मोपेड (किंमत ७०,००० रुपये) असा एकूण ८५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत सोनू उर्फ प्रवीण ज्ञानेश्वर भांगे (वय ३३, रा. डांगरी वॉर्ड, हिंगणघाट) याच्या घरझडतीत रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूचे दोन लिटर क्षमतेचे पाच बंपर (किंमत १५,००० रुपये) जप्त करण्यात आले.
तिसऱ्या कारवाईत संत चोखोबा वॉर्ड येथील ओम सुपारे याच्याकडून देशी दारूच्या रॉकेट कंपनीच्या ३० शिश्या (किंमत ३,००० रुपये) जप्त करण्यात आल्या.

तीन्ही कारवायांमध्ये एकूण १,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Hingnghatnews /ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. पथकाचे इन्चार्ज सपोनि पद्माकर मुंडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे व रोहित साठे यांनी पार पाडली.

Hingnghatnews /“रेती माफियांना अभय कोणाचे?” — नदीपात्र लुटले जात असताना प्रशासन गप्प का?

 

हिंगणघाट/समुद्रपूर : प्रतिनिधी सचिन वाघे

Tahsilnews /तालुक्यातील लिलाव न झालेल्या नदी घाटांमधून सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खननाने आता गंभीर वळण घेतले आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात नदीपात्रातून रेती उपसली जाते, डंपर-ट्रॅक्टर रस्त्यांवरून सर्रास फिरतात; तरीही कारवाई मात्र शून्य. प्रश्न उपस्थित होतो — या सगळ्याला अभय कोणाचे?

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, निष्पक्ष चौकशी झाली तर पुरावे आपोआप समोर येतील. रेती चोरी करणाऱ्या मुख्य सूत्रधारांमध्ये प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. काही वाहनांवर नंबर प्लेट नसणे, तर काहींचे कागद दुसऱ्याच नावावर असणे, हे प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप आहे.
यामुळे वाहतूक यंत्रणा, परवाना प्रक्रिया आणि तपासणी प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

वन विभाग, पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा तसेच RTO विभागातील काही संबंधितांवर कथित “हप्ते” सुरू असल्याची चर्चा परिसरात होत आहे.
पर्यावरणीय दृष्टीने पाहता, अनियंत्रित उत्खननामुळे नदीपात्राची खोली वाढते, काठांची धूप होते, भूजल पातळी घटते आणि भविष्यात पूरस्थितीचा धोका वाढतो.

Wardhanews /नदी ही फक्त रेतीचा साठा नसून संपूर्ण परिसंस्थेचा आधार आहे — हे प्रशासन विसरले आहे का? नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे —
लिलाव नसताना उत्खनन कसे?
नंबर प्लेट नसलेली वाहने रस्त्यावर कशी?
संबंधित विभाग कारवाई का करत नाहीत?

जर सर्व काही कायदेशीर असेल तर प्रशासनाने तातडीने अधिकृत आकडेवारी जाहीर करावी. अन्यथा स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) नेमून संपूर्ण साखळीची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Hingnghatnews /नदी लुटली जात असताना यंत्रणा मौन बाळगणार का, की आता तरी कठोर कारवाई होणार? जनतेच्या नजरा प्रशासनाकडे लागल्या आहेत.

revenuenews/अवैध धंदे जोमात प्रशासन मात्र कोमात

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )

revenuenews/महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी भीष्णूर घाटात यांची पाहणी घरकुल धारकांसाठी राखीव असलेल्या भीष्णूर व नवाबपूर वाळू (रेती) घाटातून मशीनद्वारे रात्री व दिवसा होत.

असलेले अवैध उत्खनन तात्काळ थांबविण्याबाबात आष्टी तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी घरकुल धारक यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय अस्तित्वात आहे. त्यानुसार आपण आपल्या स्तरावरून भीष्णूर व नवाबपूर या वाळू घाट घरकुल धारकांसाठी विशेषतः राखीव ठेवून रेती नेण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.

परंतु दुर्दैवाने या दोन्ही घाटांमध्ये अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वीच चोरट्यांनी (तस्करांनी) मुबलक प्रमाणात रेती चोरून नेल्याने घाटात कोरड्या जमिनीत फक्त खडांगा रेतीमधील मोठे दगड उरलेले आहेत. तरीही सध्या पोकलॅंड मशीन, डोंगे इत्यादी यंत्रसामग्रीद्वारे रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व चोरी सुरू आहे.

यामुळे घरकुल धारकांना आवश्यक रेती उपलब्ध होत नाही.आम्ही यापूर्वीही आपणास तोंडी माहिती दिलेली आहे. तालुक्यातील घरकुल धारकांना व्यवस्थित रेती उपलब्ध व्हावी यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे.

परंतु रेती तस्करांमुळे घरकुल धारकांना तसेच त्यांच्यासाठी रेती वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे अवैध उत्खनन पर्यावरणाला हानी पोहोचवत असून, शासनाच्या घरकुल योजनेच्या उद्देशाला धक्का लावत आहे.

तरी आपण या गंभीर विषयाकडे विशेष गांभीर्याने लक्ष देऊन खालील मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, ही विनंती: भीष्णूर व नवाबपूर वाळू घाटात होणारे सर्व अवैध उत्खनन मशीनद्वारे रात्री-दिवसा तात्काळ थांबवावे.

रेती तस्करांवर कठोर कारवाई करावी जप्ती, दंड, गुन्हे दाखल करणे घरकुल धारकांसाठी राखीव घाट सुरक्षित ठेवून रेती उपलब्धतेची व्यवस्था करावी.
आवश्यकतेनुसार पाहणी करून अहवाल तयार करावा व आम्हाला लेखी उत्तर द्यावे.

आपल्या त्वरित कारवाईमुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत रेती मिळेल आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी प्रभावी होईल, असा आम्हाला विश्वास आहे.revenuenews

revenuenews/तहसीलदार मॅडम यांना वारंवार लेखी मौखिक माहिती दिल्यानंतर सुद्धा लक्ष केंद्रित का करत नाही. या मध्ये काय साठ गाठ आहे हें समस्त गावकरी ग्रामस्थ विचार करत आहे.महसूल कर्मचारी जेव्हा येतात याची माहिती या लोकांना मिळते तरी कशी?

Yavalnews /यावल तालुका हादरला! हिंगोणात भरदिवसा चाकू हल्ला; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तिघे जखमी

 

यावल प्रतिनिधी : विकी वानखेडे

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ घडलेल्या रक्तरंजित चाकू हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच घडलेल्या या घटनेत प्रथमेश मुकेश महाले (वय अंदाजे २२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.

किरकोळ वादाचे भीषण रूप? प्राथमिक माहितीनुसार, एखाद्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका अल्पवयीन आरोपीने प्रथमेश महाले यांच्यावर धारदार चाकूने अचानक हल्ला केला. आरोपीने त्यांच्या छातीवर व पोटावर सपासप वार केल्याने ते जागीच कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

रुग्णालयात नेत असताना मृत्यू उपस्थित नागरिकांनी तात्काळ प्रथमेश यांना उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र छाती व पोटावर खोल जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सावदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणी करून प्रथमेश महाले यांना मृत घोषित केले.

मध्यस्थी करणारेही जखमी दरम्यान, वाद सोडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या रीना रोहित गजरे, मोहित राजेंद्र गजरे व निखिल राजेंद्र गजरे यांनाही आरोपीने चाकूने जखमी केले. त्यांच्या हातावर व शरीराच्या इतर भागांवर वार झाल्याची माहिती आहे. तिघांवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांची धाव, तणावाचे वातावरण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून दिवसा ढवळ्या आरोग्य केंद्रासमोर अशी घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकरणी गुन्ह्याची नोंद फैजपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. अल्पवयीन आरोपी असल्याने पुढील कायदेशीर कारवाई किशोर न्याय कायद्यानुसार होण्याची शक्यता आहे.

Yavalnews /नेमके कारण अद्याप अस्पष्ट हल्ल्यामागील नेमके कारण काय, पूर्वीपासून काही वाद किंवा वैमनस्य होते का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे संपूर्ण कारण स्पष्ट होणार आहे.

Tahsilnews /जगन्नाथ मंदिर जमीन प्रकरण : वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्णय लवकरच मौका चौकशी अहवाल सादर फेरफार आदेशाबाबत अंतिम भूमिका ठरणार

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :

Hingnghatnews /हिंगणघाट येथील नझुल शिट क्र. १८, ब्लॉक क्र. ११ मधील भुखंड प्रकरणात महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या मौका चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, आता अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

संबंधित जमीन पूर्वी “जगन्नाथ मंदिर” या धार्मिक संस्थेच्या नावे नोंद असताना २००७ मधील फेरफार आदेशाद्वारे खाजगी नावे कायम करण्यात आल्याचा वाद निर्माण झाला आहे. क्रमश

Vadnernews/प्रशासक कार्यकाळात व्यवहार कसे झाले? विस्तार अधिकारी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

 

प्रतिनिधी :सचिन वाघे

Hingnghatnews /वडनेर :पोहणा येथील आनंदमेळा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून ६ लाख रुपयांच्या कथित देयकापासून ते पार्किंग वसुलीपर्यंत विविध मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वे नं. ३७८ व सर्वे नं. ३८० (बोहरा ले-आऊट) येथील शेतजमिनीच्या वापराबाबत तसेच संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वे नं. ३८० मधील काही प्लॉट बोहरा बंधू यांच्या नावावर असल्याचे ऑनलाईन नोंदीत दिसते. सूत्रांचा दावा आहे की, रोडलगतच्या प्लॉटधारकांना वगळता सुमारे ६ लाख रुपये विश्वनाथ बावणे यांनी बोहरा बंधूंना दिल्याची चर्चा आहे. इतर काही प्लॉटधारकांनाही पाच आकडी रक्कम देऊन जागा तात्पुरत्या स्वरूपात घेतल्याचे सांगितले जाते.

यानंतर संबंधित जागेवर स्टॉल वाटप करून व्यावसायिकांकडून शुल्क आकारण्यात आल्याचे आरोप पुढे आले आहेत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत प्लॉटधारकांची कायदेशीर जबाबदारी कितपत ठरते, याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय, पोहणा यांनी दिनांक २९/०१/२०२६ रोजी प्राप्त अर्जानुसार विश्वनाथ अंबादास बावणे (रा. अकोला) यांना महाशिवरात्री उत्सवानिमित्त मौजा पोहणा येथील वेणूबाई रामदासजी कोंबे यांच्या शेत सर्वे क्र. ३७८ मध्ये भोईराज अम्युसमेंट पार्क (आनंदमेळा) व मिनी बाजार सुरू करण्यासाठी दिनांक १५/०२/२०२६ ते २१/०२/२०२६ या कालावधीत उत्सव साजरा करण्यास हरकत नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतील ठराव क्रमांक ०७ (दि. ३०/०१/२०२६) नुसार हे प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच, दोन शेतजमिनी पार्किंगसाठी वापरून सुमारे १ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. पार्किंगच्या नावाखाली दुचाकींसाठी २० रुपये तर चारचाकींसाठी ५० रुपये वसुल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या वसुलीची अधिकृत परवानगी होती का, तसेच त्याची नोंद ग्रामपंचायत किंवा महसूल खात्यात आहे का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.hingnghatnews

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

ग्रामपंचायतीत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक कार्यरत असताना असे व्यवहार कसे झाले, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. विस्तार अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, तसेच संपूर्ण आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.

Wardhanews /अधिकृत चौकशी अहवालानंतरच दोष व जबाबदारी निश्चित होणार असली तरी, सध्या मात्र गावात आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले आहे. प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे पोहणा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Hingnghatnews /‘मुतारी बंद आहे, पुढे जा’; हिंगणघाट नगर परिषद शौचालयात नागरिकांची गैरसोय

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :हिंगणघाट येथील नगर परिषदेकडील सार्वजनिक स्वच्छतागृहात मुतारी (युरिनल) संदर्भात नागरिकांची सातत्याने गैरसोय होत असल्याची तक्रार पुढे येत आहे. प्रत्यक्ष ठिकाणी नागरिकांना “मुतारी बंद आहे, पुढे जा” असे सांगितले जाते, तर काहीवेळा “मुतारीला समस्या आहे” असे कारण दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांकडून मुतारी सेवा मोफत असल्याचे सांगितले जात असले तरी जागेवर त्याबाबत कोणताही स्पष्ट सूचना फलक दिसत नाही. परिणामी, नागरिकांना टॉयलेटसाठी १० रुपये भरावे लागत असून मुतारीची सुविधा उपलब्ध आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, मुतारी खरोखरच तांत्रिक कारणाने बंद असल्यास त्याची लेखी सूचना फलकावर लावावी.

Hingnghatnews /दुरुस्ती तातडीने करून सुविधा सुरू करावी.
शुल्क व मोफत सेवांबाबत स्पष्ट दरपत्रक लावावे.
सार्वजनिक सुविधांमध्ये पारदर्शकता व नियमित देखभाल नसल्यास नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याची चर्चा शहरात रंगत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.