Home Blog Page 15

check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]

 

संग्रामपूर(सूर्या मराठी न्यूज ब्युरो )ः- तालुक्यातील एका शेतकऱ्यांस कांदा पिकाचे नुकसान भरपाई प्रकरणी धनादेश देवून तो न वटवल्याने अनादर झाल्याने संग्रामपूर दिवाणी फौजदारी न्यायालयाचे न्यायाधिष एस.एल.रामटेके यांनी एका ईसमास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड ठोठावल्याचा निकाल दिला आहे.civil court

ह्या प्ररकरणी अॕड.एस.आर गायकी यांनी काम पाहिले आहे.
ह्याबाबत प्राप्त माहिती अशी की,तालुक्यातील मौजे जस्तगाव येथील तेजराव रामचंद्र डोसे यांचे कांदा पिकाचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई झाल्याने ह्यासाठी वरवट (खंडेराव) येथील मारोती ,नामदेव बाजीराव बोरनारे ह्यांनी ५० हजाराचा धनादेश दिला होता.SangrampurNews

तो अनादरीत झाल्याने शेतकरी तेजरव डोसे ह्यांनी .एस.आर.गायकी यांचे मार्फत निगोशियल इन्कृमेंट अॕक्टचे कलम१३८ नुसार सा.फौ,गु.न.३४१/२०१८नुसार दि,५/ ७ /२०१८ रोजी संग्रामपूर दिवाणी फौजदारी न्यायालयात प्रकरण दाखल केले.

check bounce case/त्यामध्ये फि.चे विधीतज्ञ अॕड. गायकी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा आढळून आल्याने संग्रामपूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधिश एस.एल.रामटेके ह्यांनी आरोपी नामदेव बाजीराव बोरनारे ह्यास गुन्हा सिद्ध झाल्याने २ महिने साधा कारावास व ८५ हजार रु.दंडाची शिक्षा सुनावली आहे.

check bounce case/सदर प्रकरणात मुख्य बाब अशी की मुळ फिर्यादी तेजराव डोसे प्रकरण प्रलंबित मयत झाल्याने कायदेशीर तरतुदीचा तंतोतंत वापर करुन त्यांचे विधीतज्ञांनी (वकिलाने) मुळ फिर्यादीचे वारसास अभिलेखावर घेवून प्रकरण चालविले.

check bounce case/त्यामुळे तेजराव डोसे यांचा मुलगा अनिल डोसे व इतर वारस यांनी न्यायदेवता व अॕड,एस,आर,गायकी ह्यांचे मुळे न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करुन अश्याच प्रकारे कोणत्याही सत्य प्रकरणात गरजूंना न्याय मिळावा.अशी अपेक्षा करुन समाधान व्यक्त केले.

Yavalnews /चुंचाळे येथे क्रीडा शिक्षक युवराज पाटील सरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उद्या जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त; 32 वर्षांच्या सेवेला मानाचा मुजरा

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा व उच्च माध्यमिक विद्यालय, चुंचाळे येथे क्रीडा शिक्षक माननीय श्री युवराज यशवंत पाटील सर यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन सोमवार, दिनांक 30 मार्च 2026 रोजी करण्यात आले आहे. तब्बल 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.jalgaon

पाटील सरांनी आपल्या सेवाकाळात क्रीडा शिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य करत हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये केवळ क्रीडा कौशल्य विकसित केले नाही, तर शिस्त, वेळेचे भान, प्रामाणिकपणा, संघभावना आणि परिश्रमाची जाणीव यांसारख्या मूल्यांचीही रुजवण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.breakingnews

विशेष म्हणजे, त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राबद्दलची प्रेरणा जागवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

या गौरव सोहळ्यासाठी शाळेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात पाटील सरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवर आपल्या मनोगतातून पाटील सरांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाचा गौरव करणार आहेत. यावेळी पाटील सरांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थीही आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.

या निमित्ताने पाटील सरांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार असून, त्यांनी घडवलेल्या पिढ्यांचा सन्मान केला जाणार आहे. हा सोहळा केवळ एक सत्कार समारंभ नसून, एका समर्पित शिक्षकाच्या कार्याला दिलेला मानाचा मुजरा ठरणार आहे.

Yavalnews /एकूणच, हा सेवापूर्ती गौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, पाटील सरांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला जाणार आहे

Policenews /देऊळगाव राजाच्या तरूणाचा पोलिस भरती दरम्यान मृत्यू

 

बुलढाणा: पोलीस भरती दरम्यान मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालायतील मैदानावर शनिवारी सकाळी घडली. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी देत असताना अचानक त्याला ‘फिट’ आली. मैदानात बेशुद्ध होऊन कोसळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले.

उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर दलातील भरती प्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील मैदानावर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे.breakingnews

शनिवारी सकाळी मैदानी चाचणी सुरू झाली. पुरुषोत्तम बारकुल हा मैदानी चाचणीत सहभागी झाला. भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावण्याची चाचणी ही कठीण मानली जाते. पुरुषोत्तम याने मैदानाला दोन फेऱ्या मारल्या, तिसऱ्या फेरीत अचानक त्याला अपस्माराचा झटका (फिट) आली. तो धावताना मैदानावरच कोसळला. त्यच्याबरोबर असलेल्या उमेदावारांच्या लक्षात हा प्रकार आला.

Buldhana /भरती प्रक्रियेतीली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. मैदानावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्याच्या हृदयाचे ठोके मंद झाल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने ससून रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावल्याचे ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा

prataprao jadhav/एल.टी.टी. बल्लारशहा रेल्वेला शेगांव येथे थांबा मंजुर… खामगांव-जालना रेल्वे मार्गाचीही गोड बातमी लवकरच मिळणार-केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आज भेट…

 

बुलढाणा ( संपादक) अनिलसिंग चव्हाण

संतनगरी शेगांव रेल्वे मार्गाने नियमीत धावणाऱ्या परंतु थांबा नसणाऱ्या एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेसला शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा मंजुरी केल्याप्रकरणी केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची आज केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले. तर खामगांव-जालना रेल्वे मार्गा संदर्भात गोड बातमी लवकरच देऊ असे सुचक वक्तव्य केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी चर्चेदरम्यान केले.prataprao jadhav

त्यामुळे खामगांव-जालना रेल्वे मार्गाबद्दल केंद्र सरकारची सकारात्मकता दिसुन आली. या रेल्वे मार्गासंदर्भात अंतिम मंजुरातीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या बुलढाणा जिल्हयातील संत नगरी शेगांव येथे दररोज देशभरातुन लाखो भाविक येत असतात. शेगांव रेल्वे मार्गावरील नियमीत धावणाऱ्या एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेस सह इतर 3 सुपर फास्ट एक्स्प्रेसला शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी गेल्या महिन्यामध्ये केंद्रिय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन केली होती.shegaonnews

त्यातील एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेसला रेल्वे मंत्रालयाच्या वतीने थांबा मंजुर करण्यात आला आहे. आज 27 मार्च ला केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन बल्लारशहा एक्स्प्रेसला थांबा दिल्याबद्दल केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले याचवेळी खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करत असतांनाच त्यांनी रेल्वे मंत्रालय या रेल्वे मार्गासंदर्भात वेगाने काम करत असुन लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी देऊ असे सुचक विधान त्यांनी केले.

खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे मंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक भुमिका दर्शविल्याने खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी खामगांव-जालना रेल्वे मार्गाबद्दल विस्तृत चर्चाही यावेळी मंत्रीमहोदयांसोबत केली.

इंग्रज काळापासुन हा रेल्वे महामार्ग प्रलंबित असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हारेल्वे मार्ग करण्याचे आश्वासन बुलढाणा जिल्हयातील जनतेला दिले असल्याचे सांगुन या रेल्वे मार्गामुळे मध्य रेल्वे व दक्षिण रेल्वे जोडल्या जाणार आहे.

prataprao jadhav/हा रेल्वे मार्ग व्हावा हि जिल्हयातील नागरीकांची जनभावना आहे. असेही त्यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चेत सांगीतले. केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी दर्शविलेल्या सकारात्म भुमिकेमुळे या रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरात मिळण्याची शक्यता आहे.

Devendrafadnsvis /एसटी बसच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण

 

[ शहरी विभागासाठी सुविधा ग्रामीण भाग दुर्लक्षित.]
संग्रामपूर (सूर्या मराठी न्यूज ब्युरो )ः- महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची सुवर्ण किनार लाभली, तो क्षण आज विधानभवन प्रांगणात साकारला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर आणि उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांमध्ये ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. जणू इतिहास आणि वर्तमानाचा संगम घडवत या सोहळ्याने सार्वजनिक परिवहनाच्या नव्या युगाची पहाट उजळवली.

या दिमाखदार सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या ऐतिहासिक क्षणाची शोभा अधिकच खुलली.

St‘राजमाता जिजाऊ’ हे नाव उच्चारताच मातृत्व, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा मनात जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून केवळ प्रवास नव्हे, तर इतिहासाची प्रेरणादायी परंपरा प्रत्येक प्रवाशाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.busnews

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सुमारे तीन हजार बसचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार असून, सुरक्षितता, आराम आणि विश्वास यांचे त्रिवेणी संगम प्रवाशांना अनुभवता येणार आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ या गौरवशाली सेवांच्या परंपरेत ‘राजमाता जिजाऊ’ ही आणखी एक तेजस्वी कडी ठरणार आहे. पूजन, फीत कापून झालेल्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी या बसमधून प्रवास करत नव्या युगाची सुरुवात प्रत्यक्ष अनुभवली. बसच्या अग्रभागी घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊंचा देखावा जणू इतिहासाला सजीव करत होता—त्या दृश्याने संपूर्ण सोहळ्याला एक अद्भुत, प्रेरणादायी आणि आयाम प्राप्त झाला.

[ ग्रामीण भागातील अश्या एस टी बस आगारामध्ये बस केव्हा येणार ? फक्त शहरी विभागासाठीच सर्व सुविधा असतात.मात्र ग्रामीण खेडेविभागात आमचे बुलडाडाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद), शेगाव ,खामगाव,बसआगाराला पाहिजे त्या नवीन बस पहावयास मिळत नाही.आशी खंत ग्रामीण भागातील प्रवाश्यांनी केली आहे.

Devendrafadnsvis /नेहमी भांगार व रस्त्यावर बंद पडणाऱ्या बासेस मिळतात.ही शोकांतिका आहे.
रामेश्वर गायकी सह अनेक सामाजिक कार्यकर्ते. संग्रामपूर तालुका]

Nivdnuknews /संग्रामपूर तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

 

बुलढाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.dham panchayat

यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील चार रिक्त पद, चिखली तालुक्यातील सहा पदे तर मेहकर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.nivdnuknews

संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे : मारोडा ग्रामपंचायत प्रभाग क्र.3(अनुसूचित जमाती), धामनगांव ग्रामपंचायत प्रभाग क्र.2(ना.मा.प्र.प्रवर्ग),वकाणा ग्रामपंचायत प्रभाग क्र.2( ना.मा.प्र.प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील) असे चार रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आह.SangrampurNews

मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे :* ग्रामपंचायत पारडा, ग्रामपंचायत पेनटाकळी, ग्रामपंचायत वाग्देव व ग्रामपंचायत दुर्गबोरी असे चार रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे.

Grampanchayat चिखली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे :थेट सरपंच पदासाठी कव्हळा ग्रामपंचायत(ना.मा.प्र), कोनड ग्रामपंचायत(ना.मा.प्र./स्त्री), किन्ही सवडत ग्रामपंचायत(अनुसूचित जमाती) तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी किन्हीनाईक ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 व 3 (अ.ज. स्त्री), बोरगाव वसु ग्रामपंचायत (अ.जा.) असे सहा रिक्त ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे.

*निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे :* निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. 17 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी करण्यात येणार आहे.

MIDC मधील पोटभाडे घोटाळा : उद्योग विकासाला लागलेला काळा डाग (midcnews)

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) हे राज्यातील औद्योगिक प्रगतीचे मुख्य केंद्र मानले जाते. उद्योगांना प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. मात्र नागपूर विभागातील काही MIDC क्षेत्रांमध्ये समोर आलेल्या पोटभाडे प्रकरणांनी या संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.midc

माहिती अधिकारातून उघड झालेल्या माहितीनुसार, अनेक कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहेत. प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणतीही औद्योगिक हालचाल नसताना देखील कागदावर उद्योग सुरू असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही बाब केवळ प्रशासकीय त्रुटी नसून, एक संघटित गैरव्यवहार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.midc

अशा कंपन्यांच्या माध्यमातून बँकांकडून कर्ज उचलणे, शासनाच्या योजनांचा लाभ घेणे आणि नंतर कंपन्या बंद करणे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यामुळे शासनाचा महसूल तर बुडतोच, पण खऱ्या उद्योजकांनाही नुकसान सहन करावे लागते.nagpurnews

अधिक चिंतेची बाब म्हणजे या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. चौकशीचा अभाव आणि कारवाई न होणे हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे.

Wardhanews /आता गरज आहे ती पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची. दोषींवर कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा ‘उद्योग विकास’ या संकल्पनेलाच गालबोट लागेल.

Palshijhashi/पळशी झाशी तिर्थ स्थळाला दोन कोटी रुपये मंजुर … संस्थांच्या वतीने करण्यात आला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार ..

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

Palshijhashi/बुलडाणा ( प्रतिनिधी )पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी या तीर्थस्थळाला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे संस्थांच्या वतीने केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार नुकताच सत्कार करण्यात आला .

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातर्गत येणारे पळशी झाशी शंकरगिरी महाराज संस्थांन हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे .

या संस्थांला सरकारच्यावतीने ब दर्जा तीर्थस्थळाचा दर्जाही देण्यात आला आहे . तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व या विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या वतीने या संस्थांना निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.

या पाठपुराव्याला यश आले असून 13 मार्च रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्यामुळे या तीर्थस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Palshijhashi/या निधी अंतर्गत भव्य सभागृह प्रसादालय इतर विकसित कामे केल्या जाणार आहे दिलेला शब्द पाळला आणि भरीव अशी मदत पळशी झाशी संस्थांना केल्याबद्दल संस्थांचे विश्वस्त अरुण पाटील मोरोडे यांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन सत्कार केला .

Umrganews /स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पगार, पीएफ अनियमिततेची चौकशी करा

ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
—————

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे

उमरगा : उमरगा नगर परिषदेसाठी काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पगार, PF कपात आणि देयक प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित महिला कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने निवेदन द्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नगर परिषद उमरगा येथील मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, उमरगा शहराची स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी केवळ रु.६२९०/- इतकाच मोबदला दिला जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा पगार बँक खात्यात न देता रोखीने (बाय हँड) दिला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा अंदाजे रु. १४०० ते १७०० पर्यंत भविष्यनिर्वाह निधी (PF) कपात केली जाते. मात्र हा PF संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नियमितपणे जमा होत आहे की नाही, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच या महिला कर्मचाऱ्यांसाठी बँकेत खाती उघडण्यात आली असली, तरी त्यांची पासबुक त्यांच्या ताब्यात देण्यात आलेली नाहीत, अशीही तक्रार करण्यात आली आहे. काही ठिकाणी वर्षभरातील सह्या एकत्रितपणे पे-स्लिपवर घेऊन काही त्रयस्थ व्यक्ती पगार उचलतात आणि त्यातील केवळ रु.६२९०/- इतकीच रक्कम महिला कर्मचाऱ्यांना दिली जाते, अशीही गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत आवाज उठवला किंवा तक्रार केली तर नोकरीवरून काढून टाकण्याची भीती दाखवली जाते, अशा दबावाखाली या महिला काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने पुढील बाबींची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे :

(1) महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पगार व PF कपातीची सखोल चौकशी करावी.

(2) कपात करण्यात आलेला PF संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे की नाही याची खात्री करून त्याची लेखी माहिती द्यावी.

(3) सर्व कर्मचाऱ्यांचे पगार थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्याची व्यवस्था करावी.

(4) संबंधित महिला कर्मचाऱ्यांना त्यांची बँक पासबुक व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात द्यावीत.

(5) आर्थिक अनियमितता आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी.
उमरगा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी परिश्रम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना न्याय्य मोबदला, पारदर्शक पगार प्रणाली आणि सुरक्षित कामाचे वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Dharashivnews /या निवेदनावर सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, राजू बटगिरे, करीम शेख, ज्योती माने, संतोष चव्हाण, बबिता मदने, शबाना उडचणे, किशोर बसगुंडे, ऍड. ख्वाजा शेख, ऍड. अर्चना जाधव, कविता साळी, सीमा कांबळे, विमल वजनमकर, छबाबाई सुरवसे, ठकूबाई कांबळे, अश्विनी सौंदर्गे, मीना येरसन, लक्ष्मी कांबळे, किरण भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Policenews /खामगावात घरफोडीचा गुन्हा उघड; अमरावतीतील महिलेला अटक, २ लाख १६ हजार रुपयांचे दागिने जप्त

 

अनिलसिंग चव्हाण ( संपादक )

खामगाव : शहरातील केला नगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात खामगाव शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अमरावती येथील एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून अंदाजे २ लाख १६ हजार ३२० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Crimenews /याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी साकेत संजय दशोत्तर रा. केला नगर, देशमुख मंगल कार्यालयाच्या मागे, खामगाव यांनी २६ फेब्रुवारी रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० ते ५.३० दरम्यान ते कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अंदाजे १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान सुरुवातीला कोणताही ठोस धागादोरा मिळत नसल्याने पोलिसांसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान होते. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सिमा परवीन नसीम शेख रा. साजिया नगर, हेदरपुरा, अमरावती हिला निष्पन्न करून ताब्यात घेतले.

तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यात सोन्याची अंगठी, कानातील झुमके, मंगळसूत्र पोत, नथ तसेच सोन्याच्या टिकल्या असा अंदाजे २ लाख १६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तपासात आरोपी महिलेने शेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतही तत्सम गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्या अनुषंगाने तेथील कलम ३३१(१), ३०५ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील गुन्हाही उघडकीस आला आहे.

Policenews /ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. एन. पवार यांच्या आदेशाने पोहेकॉ सागर भगत, पोका अंकुश गुरुदेव, पोका राहुल धारकर, मपोका दिव्या काळे, योका राम धामोडे, पोहेकॉ प्रदीप मोठे, भिमराव वानखेडे, पोका गणेश कोल्हे, पोका निशांत कळसकर व रविंद्र कन्नर यांनी केली.