Home Blog Page 153

खामगांव अमरावती मेमो ट्रेन सुरु करा खासदार नवनीत राणा यांच्या कड़े राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव: खामगाव ते अमरावती अशी मेमो ट्रेन सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्यावतीने अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्याकडे दिलेल्या निवेदनद्वारे करण्यात आली आहे. अमरावतीच्या महिला खासदार नवनीत कौर राणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

की विधर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या बुलढाणा जिल्यातील सर्वांतमोठी व्यापार पेठ आणि सर्वात मोठे महत्त्वाचे शहर असलेल्याव मुंबई कोलकात्ता मध्यरेलवे लोहमार्गाच्या भुसावाळरेल्वे डिविजन मध्ये येणाऱ्या जलंब या लहानश्या रेल्वे स्टेशन पर्यंत खामगाव येथून सद्यस्थिती मध्ये 3 डब्यांची ट्रेन चालविली जाते.

खामगांव हे शहर अमरावती महसूल विभागात येत असल्याने तसेच शैक्षणिक व ईतर महत्वाच्या कामासाठी खामगाव व परिसरतील नागरीकांना दररोज अमरावतीला जावे लागते खामगांव येथून अमरावतीला जाण्यासाठी बस किंवा ट्रेवल्स शिवाय पर्याय नाही.त्याकारनाने नागरीकांना मानसिक आणि शारीरिक त्रास तर सहन करावा लागतो वेळेचासुद्धा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो.त्यामुळे खामगाव परिसरातील रहिवासी व्यावसायिक महिला प्रवासी, विद्यार्थी यांच्या सुविधे साठी खामगाव येथूनअमरावती पर्यंत मेमो ट्रेन सुरु करण्यात यावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

रेलवे प्रशासनाला खामगाव येथून अमरावतीला मेमो ट्रेन सुरु करण्यासाठी एक रुपया देखील अतिरिक्त खर्च करावा लागनार नाही.आणी रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात महसुलसुद्धा प्राप्त होईल.असेही या निवेदनात म्हटले आहे.

खासदार नवनीत कौर यांना दिलेल्या निवेदनावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा, विदर्भ ऊपाध्यक्ष मनिषाताई टाकसाळ,लिनाताई पाचबोले,रुपाली वानखडे,फुलाबाई राठोड, रजनी चव्हाण,ज्योतीताई बावस्कार,नलिनी राऊत,कुसुम चौहान, जेष्ठ पत्रकार राजकुमार व्यास,युवराज चौहाण,विनय चौहान, आदी सह अनेक जन उपस्थित होते navneetrana

संतापजनक! दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार,तिले जिवे मारण्याचा प्रयत्न, crimenews

0

 

बुलढाणा जिल्हयातील मोताळा,बोराखडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दोन वर्ष सहा महीन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री उशीरा घडल्यानंतर या चिमुकलीला उपचारासाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात आणण्यात आले आहे या,

बुलढाणा जिल्ह्यातील माेताळा तालुक्यातील बोराखडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन नराधमाने अडीच वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एका निर्जणस्थळी नेत लैंगीक शाेषन करून अत्याचार केले .

या प्रकाराची वाच्यता हाेण्याची भिती असल्याने आराेपीने धमकी, मारहाण करीत तिला जीवे मारण्याचाच्या प्रयत्न केला. व ही घटना मन सुन्न करणाऱ्या आहे या घटनेने बुलढाणा जिल्हयासह पूर्ण राज्य हादरले आहे.

https://www.suryamarathinews.com/crimenews-6/

या दरम्यान या चिमुकलीची प्रकृती प्रचंड गंभीर असल्याने तीला शुक्रवारी सकाळी उपचारासाठी व वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पुलिस करीत आहे. Crimenews

मुंबई येथील उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने जाणार पोलीस पाटील यांच्या बैठकीत निर्णय

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस पाटील जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला तसेच प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दिनांक २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान राज्यातील पोलीस पाटील बांधवांच्या विविध मागण्यांसाठी म.रा.गां.का.पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण व धरणे आंदोलन होणार आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पोलीस पाटील यांची सहविचार सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील,जिल्हा उपाध्यक्ष पवन चौधरी,पोलीस पाटील सुरेश खैरनार,राजरत्न आढाळे,लक्ष्मण लोखंडे,नरेश मासोळे,प्रफुल्ला चौधरी, युवराज पाटील,ललिता भालेराव,मुक्ता गोसावी,महमूद तडवी,सलीम तडवी,निलेश सोनवणे उपस्थित होते.

सदर बैठकीचे नियोजन जिल्हा संघटक अशोक पाटील यांच्या वतीने करण्यात आले.राज्यातील पोलीस पाटील यांच्या काही प्रमुख मागण्या असून अनेक वर्षांपासुन शासन दरबारी प्रलंबीत आहेत परीणामी सदरील मागण्या मान्य होण्यासाठी म.रा.गां.का.पोलीस पाटील संघातर्फे मंत्रालयात बैठका,निवेदने,भेटीसाठी पत्रव्यवहारासह लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्यात आला असून देखील अद्यापपर्यंत शासनाने त्यावर योग्य निर्णय घेतला नसल्याने संघटनेने उपोषणाचा मार्ग निवडला असल्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

प्रसंगी पोलीस पाटीलांचे मानधनात वाढ करुन ते दरमहा किमान रु.१८०००/- (अक्षरी अठरा हजार रुपये) मिळावे,ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे,निवृत्तीचे वय ६० वर्षावरुन ६५ वर्षापर्यंत करण्यात यावे,निवृत्तीनंतर किमान २५,००,०००/- (पंचवीस लाख रुपये) ठोस रक्कम मिळावी,नुतनिकरण पहिल्या पाच वर्षानंतर पुढे कायमचे बंद करण्यात यावे,

गृह व महसुल विभागातील पद भरतीमध्ये पोलीस पाटील व त्यांच्या वारसांना पात्रतेनुसार आरक्षणाचा लाभ मिळावा,शासनातर्फे पोलीस पाटीलांचा २०,००,०००/-रु. (वीस लाख रुपये) चा विमा उतरवण्यात यावा व त्याचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावे,शासनाकडुन पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेमचा लाभ मिळावा,प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा ३०००/-रु. (तिन हजार रुपये) मानधना सोबतच मिळावे,पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटीलांना त्यांच्या निवृत्तीकाळा पर्यंत कायम ठेवण्यात यावे.

त्यांची पदे खंडित करु नये,अपिलांचे निकाल पोलीस पाटीलांच्या बाजुने लागुनही त्यांना पुन्हा पदभार देण्यास दिरगांई केली जाते ती टाळावी व त्यांना तात्काळ पदभार देण्यात यावा या व इतर मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी, कैलास कडलग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे , तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरिक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक यावल,फैजपूर यांना देण्यात आले आहे.

दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रू किंमतीचे मंगळसूत्र हिसकावले crimenews

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव .येथील किरणबाप्पू देशमुख यांची बहिन नेहमी प्रमाणे फिरायला जात असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांचे गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किंतीचे सुवर्ण मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना दि.२३/११/२०२३ रोजी ९ वाजेदरम्यान घडली.

हकिकत अशा प्रकारे आहे की किरणबाप्पू देशमुख यांची बहिन श्रीमती ज्योती अरुण थोरात ही जेवण झाल्या नंतर घरा समोरील रस्त्यावर फिरत असताना खामगाव शेगाव रोड वरील उत्तमराव देशमुख कॉलेज जवळील रामेश्वर मुक्तीलाल शर्मा याचे घरा समोर असतांना एक दुचाकीवर दोन अज्ञात इसम काळे टि शर्ट घातलेले फि चे बहिनी कडे पाहून समोर थांबले त्यानंतर फि ची बहिन काही अंतर समोर गेली असता.

मोटर सायकलवर आलेली दोन अज्ञात सडपातळ असलेली मुले बहिनीचे पाठिमागे दुचाकीसह जावुन मागे बसलेल्या मुलाने फि ची बहिन श्रीमती ज्योती हिचे गळ्यात असलेले सोन्याचे मंगळसुत्र अंदाजे वजन ३० ग्रॅम त्या मध्ये आठ काळे मनी असलेली कि. अंदाजे १ लाख ५० हजार रुपये बळजबरीने हिसकावुन चोरून घेवुन खामगाव कडे मोटर सायकलसह पळुन गेले.

याप्रकरणी किरणबाप्पू देशमुख यांचे तोंडी रिपोर्ट वरुन शहर पोलिसांनी दोघा अनओळखी चोरट्या विरूध्द अप न ५८५/२०२३ कलम ३९२, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनि आशिष गंद्रे हे करीत आहेत.crimenews

उपचारा दरम्यान ४६ वर्षीय व्यक्ती चा अकोला रूग्णालयात मृत्यू

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव छातीत वेदना होत असल्याने उपचारासाठी अकोला येथील ओझोन रूग्णालयात शेगांव येथील जयंत बळीराम वानखडे या ४६ वर्षीय व्यक्ती चा मृत्यु झाल्याची घटना दि.२१/११/२०२३ संध्याकाळी ७.१५ दरम्यान घघडली.

हकीकत अशी की, स्थानिक इंदिरा गांधी न.प. हायस्कूल येथे कार्यरत शिक्षक जयवंत बळीराम वानखड़े वय ४६ वर्ष रा. रोकडीया नगर हे दि. २१/११/२०२३ रोजी सायंकाळी ५.१५ वा आझोन हास्पीटल ,अकोला मध्ये भरती झाले होते. त्यांचेवर दि.१९/११/२०२३ ला पाइल्स आजारावर कोरपे हॉस्पीटल ,अकोला येथे शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांचे छाातीत वेदना होत असल्याने त्यांना ओझोन हॉस्पीटल,अकोला येथे संध्याकाळी भरती केले होते

.भरती केल्या नंतर मयत हे चालत असता खाली पडले व बेशुध्द झाले उपचारा दरम्यान संध्याकाळी दि.२१/११/२०२३ ला ७.१५ वा ते मरण पावले याप्रकरणी फिर्यादी – डॉ. सुभाषचंद्र कोरपे तर्फे, कक्षसेवक दत्तात्रय भाणुदास ठाकरे ओझोन हॉस्पीटल अकोला यांनी फिर्याद दिली असतात अकोला पो.स्टे.मध्ये ०/२३ कलम १७४ जाफौ नुसार मर्ग दाखल करून शेगांव शहर पो.स्टे.ला हस्तांतरित करण्यात आला .पुढील तपास नापोका रवि इंगळे हे करीत आहेत. Akolapolice

मेहकर येथील पोलीस कर्मचारी यांचे वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे- आशी मागणी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई

0

 

बुलढाणा- मेहकर येथील पोलीस कर्मचारी यांचे वसाहतीचे बांधकामाची अतिशय दुरावस्था झालेली आहे याकरिता मा.मेहकर तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मा.देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले की, मेहकर येथील पोलीस स्टेशन मागिल दिवानी कोर्ट लगतच्या जागेमध्ये शेकडो वर्षापुर्वीची इंग्रजकालीन पोलीस वसाहत आहे. सदरील वसाहतीत पुर्वीपासुन पोलीस कर्मचारी यांच्या कुटूंबियांना राहण्यासाठी वापरत आहे.

मात्र आज रोजी सदरील पोलीस वसाहतीचे बांधकामाची अतिशय दुरावस्था झालेली आहे स्थानिक नेते मंडळी त्या कामाकडे त्याचे दुर्लक्ष झाले आहे. सदरील बांधकाम पाडण्यात येऊन त्याठिकाणी तात्काळ कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांच्या कुटूंबियांना राहण्यासाठी नव्याने बांधकाम तात्काळ करून द्यावे त्या जागेचे काम केल्यास त्याचा मोठा फायदा पोलीस कुटूंबियांना होईल. आज रोजी पोलीसांना डयुटीचे ठिकाणापासुन इतरत्र भाडोत्री खोली घेऊन रहावे लागत आहे.

https://www.suryamarathinews.com/crimenews-5/

बाहेरून येण्या जाण्यामुळे त्यांच्या डिवटीवर परिणाम होत आहे तरी सदरील निवेदनांची दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचारी यांचा होत असलेला त्रास थांबविण्यात यावा व तात्काळ पोलीस वसाहतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे..

यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंकुश राठोड, गजानन सरकटे, गौतम नरवाडे, कुणाल माने, प्रकाश सुखधाने, अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, देवानंद अवसरमोल, विजय सरकटे, नितीन गवई, सिताराम गवई, नितीन बोरकर, युनुस शहा, विजय कंकाळ, अशोक इंगळे, रवी जोरावर आदी तथागत ग्रुप संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..buldhananews

Crimenews माहेर वरुन 4लाख रुपये आण असे म्हणून पत्नीचा छळ,पती विरोधात गुन्हा दाखल..

0

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि. प्र.

शेगांव: माहेर वरून 4 लाख रुपये आण असे म्हणून पत्नीचा मानसीक, शारीरिक छळ करणाऱ्या सद्गुरू नगर परिसरात राहणाऱ्या विष्णू गोविंदा काळे वय 40 वर्षं यांच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या बाबत शहर पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौ.आशा विष्णू काळेवय 33 यांनी शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीमधे म्हटले आहे की दि.15/08/2023 ते 14/11/2023 पर्यंत माझे पती विष्णू गोविंदा काळे यांनी माहेर वरून 4 लाख रुपये आण असे सांगून शारीरिक व मानसिक त्रास दीला..

https://www.suryamarathinews.com/shegaon-news/

अशा तक्रारी वरुन शेगांव शहर पोलीस स्टेशन ला विष्णू गोविंदा काळे रा. सद्गुरू नगर विरोधात अप.नं584/2023 कलम 498,(अ),323, 504 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पो.ना.का.रवी ईंगळे करीत आहेतcrimenews

Shegaon News धार्मिककार्तिक एकादशी. श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा,एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचेदर्शनविदर्भातील पंढरीतभाविकांची मांदियाळी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव दि. २३ प्रतिनिधी
जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय गजानन श्री गजाननचा गजर करत संत नगरी शेगाव येथे लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत आज २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी एक लाखाहून अधिक भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

कार्तिक एकादशी निमित्त आज श्रीच्या पालखीची मंदिर परिक्रमा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी श्रीच्या रजत मुखवट्याचे मनोभावे दर्शन घेतले. या उत्सवामुळे शेगावात पंढरीच अवतरल्याचे चित्र दिसत होते.

दरवर्षी कार्तिक एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपुरात जातात. परंतु काही कारणामुळे पंढरपूरला जावू न शकणारे भाविक या दिवशी विदर्भातील पंढरी असलेल्या शेगावात दाखल होवून श्री चरणी नतमस्तक होतात.

दरम्यान, आज सकाळ ४ वाजता पासूनच श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. कार्तिक एकादशी निमित्त आज ५ वाजता टाळ, मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात श्रीची पालखी मंदिर परिक्रमेसाठी मार्गस्थ झाली., टाळकरी, पताका धारी वारकऱ्यांचा सहभाग पालखी सोवत होता. तत्पूर्वी संस्थानच्यावतीने श्रींच्या रजत मुखवट्याचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पारंपारीक पध्दतीने पुजन केले.

त्यानंतर श्री विठ्ठलाच्या तैल चित्राचे पूजन करण्यात आले. व भाविकांनी दर्शन घेतले. पालखी सायंकाळी मंदिरात दाखल झाली. यानंतर श्रींच्या पालखीची आरती करण्यात आली. श्रींच्या समाधी मंदिर दर्शनासाठी ३ तास लागत होते तर श्रींच्या मुख्यदर्शनासाठी ३० मिनिटे लागत होते. श्रींचे दर्शन झाल्यावर राज्यातील भाविकांनी महाप्रसाद घेऊन धन्य झाले.

https://www.suryamarathinews.com/crimenews-4/
भाविकांना फराळाचे वाटप.स्वंयसेवी संस्थांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप शहरातील काही स्वंयसेवी संस्थांच्या वतीने बाहेर गावावरून येणाऱ्या भक्तांना फराळ, चहा, केळी व पाण्याचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यामुळे शहरात सर्वत्र भाविकांची मांदियाळी दिसून येत होती

श्रींच्या मंदिरात ६० हजाराच्या वर भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ९ वाजेदरम्यान एकादशीनिमित्त भक्तांना साबुदाणा उसळ, आमटी, भगर, केळी, नायलॉन चिवडा वाटप करण्यात आला. यावेळी जवळपास ६० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. ShegaonNews

खासदार रामदास तडस याच्या हस्ते कबड्डी मॅट चे उदघाटन

0

 

स्थानिक खासदार निधीतून दिली कबड्डी मॅट

सिंदी(रेल्वे)- स्थानिक कबड्डी खेळाडूची मागणी लक्षात घेता व आधुनिक कबड्डी खेळण्याकरिता आपल्या स्थानिक खासदार निधीतून दिलेल्या कबड्डी मॅट चे उदघाटन रामदास तडस याच्या हस्ते आज पार पडले.

याप्रसंगी खासदार तडस यांनी बोलताना सांगितले की सिंदी करिता अनेक विकास कामे या मागील दहा वर्षात करण्यात आली आहेत या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल मंजुरी असो किंवा लॉजीस्टिक पार्क असो त्याच प्रमाणे सिंदी सेलडोह कांढळी हा राष्ट्रीय मार्ग असो या व्यतिरिक्त सिंदी च्या विकासासाठी सात हायमास्क, एक ओपन जिम आणि आता कबड्डी मॅट आदी विकास कामे केलेली आहे.

सध्या देशात कबड्डी ही मॅट वर खेळल्या जात असल्याने व सिंदी हे कबड्डीचे माहेर घर असल्यामुळे येथील कबड्डी खेळाडूची मागणी लक्षात घेत कबड्डी मॅट देऊन विदर्भस्तरीय मॅट वरील कबड्डी सामने आयोजित केल्यास त्या करिता संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन तडस यांनी यावेळी दिले या सर्व विकासाचा पाठ पूरावा अमोल सोनटके यानी केले.

उदघाटन कार्यक्रमा प्रसंगी नवयुवक क्लब चे अध्यक्ष अशोकबाबू कलोडे सचिव सुधाकर खेडकर, साई स्पोर्टींग क्लब चे अध्यक्ष गंगाधर कलोडे, आशिष देवतळे ,सुधाकर घवघवे ,विद्या निकेतन संस्थाचे सचिव संजय भन्साली, स्नेहल कलोडे दत्ता कोपरकर प्रवीण सिरसिकर आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे संचालन अमोल सोनटक्के तर आभार प्रदर्शन राहुल कलोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी गौरव कलोडे, रामेश्वर घंगारे, रामभाऊ सोनटक्के, मोहम्मद इमरान, धनराज झिलपे, धर्मेंद्र झाडे, सागर अंभोरे गुल्लू भन्साली चंदन चव्हाण आदीनी प्रयत्न केले

मंडळाच मंडप उभारताला लोखंडी रॉडचा विजेच्या तारांवर पडल्याने दोन कामागारांचा मृत्यू

0

 

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या धामणगाव जवळील पान्हेरा येथे बेलदार समाजाच्या कानू सती माता यात्रेला सुरूवात झाली. या यात्रोत जळगाव (खान्देश) येथील आनंद लोकनाट्य तमाशा मंडळचे पथक मनोरंजनासाठी दाखल झाले होते.

या मंडळाच मंडप उभारताला लोखंडी रॉडचा विजेच्या तारांवर पडल्याने दोन कामागारांचा मृत्यू झाल तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे.

पान्हेरा गावातील कानू सती मातेच्या दर्शनावेळी तमाशा आनंद लोकनाट्य मंडळाच्या मनोरंजनासाठी पिंडल उभारताना लोखंडी पाईपच्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने नाट्य मंडळात काम करणाऱ्या दोन मजुरांना आपला जीव गमवावा लागला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे.

यात अंकुश वायाळ रा. नारायणगाव ता. सिन्नर जि. पुणे आणि विशाल गणेश भोसले, रा.जेजूर गणपती ता. भोकरदन यांचा यांचा जागवेरच मृत्यू झाला. तर राहुल शंकर जाधव, रा.मुंबई हा गंभीर जखमी झाला.

https://www.suryamarathinews.com/crimenews-3/

घटनेनंतर तिघांनाही धामणगाव बधे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले तर एकाची प्रकृती चिंताजनक होती.