Home Blog Page 21

Sameerkunavar/विसर्जन मार्गावरील अडथळ्यांना पूर्णविराम – आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नातून विद्युत तारा रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शहरातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर मिरवणुकींच्या विसर्जन मार्गांवर अनेक वर्षांपासून विद्युत तारा अडथळा ठरत होते. रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर हे तारा थेट विसर्जन मार्गाला लागत असल्यामुळे वेळोवेळी नागरिकांना काठीच्या सहाय्याने किंवा इतर उपाय करून मार्ग मोकळा करावा लागत होता. या धोकादायक परिस्थितीमुळे अपघात व जीवितहानीची शक्यता कायम होती.

या गंभीर समस्येची दखल घेऊन आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे वारंवार पत्रव्यवहार करून आवश्यक निधीची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, पालकमंत्री मा. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने तातडीने 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

निधी मंजूर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली असून, या कामामुळे यंदाचा गणेशोत्सव व नवरात्रोत्सवातील विसर्जन सोहळा निर्विघ्न व सुरक्षित पार पडणार आहे. त्यामुळे हिंगणघाटातील गणेशोत्सव मंडळे व नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडत पालकमंत्री पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावार यांचे आभार मानले आहेत.

Sameerkunavar/काम सुरू असताना काही काळाकरिता वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने संबंधित प्रभागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केले आहे.

Breakingnews /लादेन रोहिंग्या भिक्षुकांने घेतला रेल्वे प्रवाशाच्या हाताला चावा.

0

 

गावातील युवकांनी त्या भिक्षुकाला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन.

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

सिंदी (रेल्वे):-नागपूर मुंबई मार्गावरील सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे स्टेशन लगतच्या वनविभागाच्या जागेवर
शेकडोंच्या संख्येने बांगलादेशी,रोहिंग्या समुदायाची वस्ती आहे. भीक मागणे, चोऱ्या, लूटमार करणे हा या समुदायाचा व्यवसाय. दिवसभर सिंदी( रेल्वे) स्टेशन वर या लोकांचा ठिय्या असतो.

येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी गाड्यांमध्ये अवैधपणे प्रवास करणे, रेल्वेत भीक मागणे, चोऱ्या करणे, हा यांचा नित्य व्यवसाय झाला असून भीक न देणाऱ्या प्रवाशांना शिवीगाळ करणे अर्वाच्य भाषेत बोलणे, मारायला जाणे, धमकी देणे हा यांचा नित्य क्रम झाला आहे.

या रोहिंग्या समुदायामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाला याआधी देखील ही बाब अवगत करून देण्यात आली होती परंतु रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले.

२७ ऑगस्ट रोजी प्रीतम कलोडे रा. सिंदी (रेल्वे), येथील प्रवाशांवर रोहिंग्या भिकाऱ्यांच्या टोळक्याने इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये जीवघेणा हमला केला. प्रीतम कलोडे इंटरसिटीने नागपूरला जात असताना लादेन रोहिंग्याचं टोळकं रेल्वेत घुसलं. त्यातील एका भिकाऱ्याने प्रीतम कलोडे यांना भीक मागितली.

त्यांनी भीक देण्यास नकार दिला. तेव्हा त्या रोहिंग्या भिकाऱ्याने त्यांच्या हाताला जोरात जावा घेतला त्यामुळे प्रीतम कलोडे रक्तबंबाळ झाला . त्यांच्या हातातून रक्त वाहू लागले. एवढेच नव्हे तर त्या रोहिंग्या भिकाऱ्याने त्यांना मारण्याची धमकी सुद्धा दिली. या घटनेची तक्रार लोहमार्ग रेल्वे पोलिस नागपूर येथे नोंदविण्यात आली.
सदर रोहिंग्या गावाचा बाजार असल्याने हा बाजारात फिरताना आढळून आला असता गावातील युवकांनी पकडून सिंदी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

Breakingnews/लादेन रोहिंग्याचे सिंदी गावात दहशतीचे वातावरण आहे. रात्री बे रात्री रोहिंगे भिकारी चोरी करण्याच्या निमित्ताने गावात शिरतात. गावकऱ्यांनी अनेकदा पोलिस स्टेशन ,आमदार व खासदारांना या बाबत निवेदन दिले. मात्र रोहिंग्या विरुद्ध अजून पर्यंत कारवाई झालेली नाही

bjpnews/भाजप पदाधिकारी सनी ओमप्रकाश बासनवार यांनी दिला राजीनामा…

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- भारतीय जनता युवा मोर्चाचे हिंगणघाट विधानसभा प्रमुख सनी ओमप्रकाश बासनवार यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांचा कडे सुपुर्द केला पक्षाने नवीन आलेल्या कार्यकर्त्यावर जास्त लक्ष केंद्रित करत मुळ भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ते डावलण्याचं काम पक्षातील काही पदाधिकारी करत आहे…

भाजप पक्ष सध्या पैशाची बाजु असणार्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जातं आहे वैचारिक विचारधारेचा कार्यकर्ता कुठं तरी फेकुन दिल्याची बाब यावेळी सनी ओमप्रकाश बासनवार यांनी व्यक्त केली.

bjpnews/तन मन लावून काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी सावध राहुन आमदार व त्यांचा पदाधिकारीच्या सावध रहावे असे आवाहन सुद्धा केले.

Sharadpawar/प्रहार विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख अंकित दांडेकर यांच्यासह बुलंद आवाज ग्रुपचे अध्यक्ष पंकज विहिरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:- प्रहार विद्यार्थी संघटचे माजी जिल्हाप्रमुख अंकित दांडेकर यांच्यासह, बुलंद आवाज ग्रुप मांडगावचे अध्यक्ष पंकज विहिरकर यांचा सह इतर युवकांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश म्हणजे बदलाची नांदी आहे. जोमाने काम करीत नवनिर्माण घडवायचे असून सर्वसामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविला.

यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख अंकित दांडेकर, बुलंद आवाज ग्रुपचे अध्यक्ष पंकज विहिरकर, सदस्य विक्रम पिसे, मंगेश खापरे, नितीन तडस, राहुल घुसे, रोशन तडस, उल्हास पादाडे,गौरव डांगरी, नितेश सुरजूसे, प्रणय कुंभलकर, अनिकेत ढवळे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला.सर्वाना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेला घालून पक्षात स्वागत केले.

Sharadpawar/व पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, राजू मुडे उपस्थित होते.

ApghatNews/दोन दुचाकीची समोरासमोर धडक,दोन ठार चार गंभीर जखमी

0

 

मावशीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या पुतण्यावर काळाचा घाला

या अपघातामध्ये एक दुचाकी पाळोदी येथील तर दुसरी दुचाकी बावनबीर येथील आहे.ApghatNews

 

संग्रामपूर – दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गणेश हरिदास ढोले वय ३२ वर्ष राहणार पाळोदी तालुका बाळापूर जिल्हा अकोला तर बावनबीर येथील अजय सुनील लहासे वय २२ वर्ष हे दोन युवक जागीच ठार झाले.

हिंगणघाट शहरातील डागा मिल (गिरणी) सुरू करा.अतुल वांदिले (Atulvandile )

Breaking तसेच अपघातातील जखमींना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

ही गंभीर घटना आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळ ६ वाजताच्या दरम्यान एकलारा ते वरवट बकाल या रोडवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील टुनकी येथील पुरुषोत्तम झांबरे यांची पत्नी सौ.सत्यभामा यांचे आज निधन झाले. मावशीचे निधन झाल्याने गणेश ढोले हे अंत्यसंस्कारासाठी आले होते,अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपून घराकडे दुचाकीने परत जात असताना हा अपघात घडला.

दुचाकीची टक्कर झाल्यानंतर बावनबीर येथील दीपक ढोले पाटील आणि जहीर खान,गजानन नागंळे तसेच टुणकी रवींद्र कोकाटे यांच्या मदतीने त्वरित वरवट बकाल येथे रुग्णालयात उपचारार्थ करिता शासकीय ॲम्बुलन्स व खाजगी वाहनाची व्यवस्था केली.

Breakingnews/काही वेळातच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून गणेश ढोले आणि अजय लहासे या दोघांना मृत घोषित केले. हा अपघात घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी तामगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.

हिंगणघाट शहरातील डागा मिल (गिरणी) सुरू करा.अतुल वांदिले (Atulvandile )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- हिंगणघाट शहरातील केंद्र सरकार पुरस्कृत रावबहादुर बन्सीलाल अभिरचंद, डागा मिल (गिरणी) सुरू करा. यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री मा. ना. पंकज भोयर यांनी विशेष लक्ष घालावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचे आहे.Atulvandile

हिंगणघाट शहर हे वर्धा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर आहे. व ते कामगारांचे शहर म्हणून त्यांची ओळख आहे.

Ajitpawar/घरपट्टेसाठी सामाजिक कार्यकर्ता विक्की वाघमारे यांचे उपमुख्यमंत्र्याकडे साकडे

येथील केंद्र सरकार पुरस्कृत रावबहादुर बन्सीलाल अभिरचंद डागा मिल्स स्पिनिंग अँड वीविंग मिल 1881 मध्ये सुरू झाली असून सदर गिरणीचे सन 1992-93 दरम्यान उत्पादन बंद करण्यात आले. व या गिरणीत उर्वरित 450 ते 500 कामगार काम करीत होते. या कामगारांना (स्वेच्छा निवृत्ती योजने अंतर्गत) VRS देऊन घरी पाठवण्यात आले.

ही गिरणी जवळ – जवळ 140 वर्ष जुनी असून या गिरणी मधून असंख्य कामगारांना रोजगार मिळत होता. परंतु या गिरणीचे उत्पादन पूर्णतः बंद झाल्यामुळे बाजारपेठेतील कापड व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.

त्यामुळे हजारो लोकांवर बेरोजगारीचे संकट आले असून त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. तसेच हिंगणघाट शहरासह ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून युवक तरुण, तरुणी रोजगारापासून वंचित आहे.

सदर गिरणी जर पूर्वरत सुरू केली तर हिंगणघाट शहरातील व ग्रामीण भागातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो.

त्यामुळे पालकमंत्री मा.ना. पंकज भोयर यांनी जातीने लक्ष घालून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून ही गिरणी तात्काळ सुरू करावी व हिंगणघाट शहर व तालुक्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची आहे.

Ajitpawar/घरपट्टेसाठी सामाजिक कार्यकर्ता विक्की वाघमारे यांचे उपमुख्यमंत्र्याकडे साकडे

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- नगरपरिषद अंतर्गत यशवंत नगर(मास्टर कॉलनी),रामनगर वॉर्ड येथील नागरिकांनी अनेक वर्षापासून सुरू असलेला कायमस्वरूपी घरपट्टे संबंधित संघर्ष आता सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवीला आहे.

गेल्या ४० ते ५० वर्षांपासून या भागात मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या नागरिकांना अद्याप कायमस्वरूपी घरपट्टे मिळालेले नाहीत.
वारंवार अर्ज,कागदपत्र विविध स्तरावर निवेदने दिली मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडे मागणी करून अजूनही स्थायी पट्टे देण्यात आलेली नाही व कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

Hingnghatnews/संत तुकडोजी वॉर्डातील समस्या निकाली काढा.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता विक्की वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंगणघाटला आले असता हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.सुधीर कोठारी यांच्या उपस्थितीत घरपट्टेच्या संघर्ष व सद्यस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली,त्यांचा संघर्ष ऐकल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे

Ajitpawar/उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला निर्देश देऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून घरपट्टे बाबत प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले व यशवंत नगर(मास्टर कॉलनी),राम नगर वॉर्ड येथील रहिवाशांचा ४० ते ५० वर्षांचा घरपट्टे साठी संघर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर निवेदनातून मांडण्यात आली

Hingnghatnews/संत तुकडोजी वॉर्डातील समस्या निकाली काढा.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील संत तुकडोजी वॉर्डातील समस्या निकाली काढण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महिला पदाधिकारी यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

शहरातील संत तुकडोजी वार्ड, येथील आदर्श नगर परिसरात रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. येथील नगरिकांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा चालू असल्याने खड्डा चुकवताना मोठा अपघात होऊ शकतो.

Sivshenanews / स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद हिंगणघाटच्या सार्वत्रिक निवडणूकी बद्दल शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची आडावा बैठक

तसेच आदर्श नगर परिसरातील विद्युत खांबावरील लाईट अनेक दिवसापासून बंद स्थितीत आहे. रात्रीच्या वेळेला संपूर्ण परिसर अंधारमय असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस परीसरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.

तसेच अन्नपूर्णा बेकरी समोरील मुख्य रस्त्यावर मोठा जिवघेणा खड्डा पडला आहे. परिसरातील नागरिकांना वाहन चालवताना नाहक त्रास होतो आहे. पावसाळा चालू असल्याने व त्या खड्ड्यात पाणी साचून असल्याने खड्डा चुकवताना मोठा अपघात होऊ शकतो.

करिता त्यावर तात्काळ उपोययोजना करण्यात यावी, तसंच या परिसरात गुरे (गाय) मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बसून असल्यामुळे वाहन चालकांना तसेच पायी जाताना नागरिकांना नाहक त्रास होतो आहे. वरील विषयाला गांभीर्याने घेऊन संत तुकडोजी वार्ड, येथील आदर्श नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या खडे तात्काळ बुजवावे तसेच परिसरात विद्युत खांबावरील लाईट तात्काळ सुरू करावे.

अन्नपूर्णा बेकरी समोरील मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजविण्याबाबत यावे तसेच संत तुकडोजी भवन मागील परिसरात गरे, (गाय) मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बसून असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याबाबत यावी. असे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानी मुख्याधिकारी यांना देण्यात आहे.

Hingnghatnews:यावेळी महिला शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष मिना सोनटक्के, शहर उपाध्याय दिपाली रंगारी, शहर सरचिटणीस सविता गिरी, आचल वकील आदी उपस्थित होते.

Sivshenanews / स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद हिंगणघाटच्या सार्वत्रिक निवडणूकी बद्दल शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची आडावा बैठक

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- दिनांक :-२५ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला सायंकाळी ठीक :०७:०० वाजता अशोक शिंदे(माजी आमदार ) यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची व शिवसैनिकांची होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात आढावा बैठक अशोक शिंदे (माजी उद्योग राज्यमंत्री तथा माजी आमदार) तथा जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तसेच उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद हिंगणघाटच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून आढावा बैठक घेण्यात आली. सदर आढावा बैठकीत अशोक शिंदे(माजी आमदार ) यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना देशभर मतदान चोरीबाबत यात्रा तसेच निदर्शने सुरू आहे.

याचे गांभीर्य लक्षात घेता आपल्यालाही या निवडणुकीत या मतदान चोरीचा फटका बसू नये म्हणून, शहरातील विविध प्रभागात वार्डा – वार्डात जाऊन निवडणूक आयोगाद्वारे मतदान यादी तील ज्यांची नावे मतदान असून डिलीट करण्यात आली, कुणी मय्यत नसून त्याला मय्यत दाखविण्यात आले.

तसेच काही लोकांकडे मतदार कार्ड असून सुध्दा यादीत नाव कापण्यात आले अश्यां सर्वांचे नाव घेऊन निवळनुक अधिकाऱ्यांना शिव सेनेकडून जाब विचारायचे आहे.

जनतेत अशी चर्चा मोठया प्रमाणावर आहे कि निवडणूक आयोगाने विशेषतः मुस्लिम आणि बोध धर्माच्या लोकांच्या नावाचे असे या चुका जानबुजून करण्यात आले हे सुध्दा लक्षात घ्या आणि अशा बऱ्याचशा चुका या देशाची स्वायत्त संस्था म्हणून काम करणाऱ्या निवडणूक आयोग हा केंद्र शासनाच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचे जनता बोलत आहे आणि भाजप निवडणूक जिंकण्याकरिता कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो .

हे आपण या देशात चाललेल्या आंदोलन व निदर्शनातून तसेच बरेचश्या राज्यात या भाजपवाल्यांनी कसल्या प्रकारे यांनी निवडणूक जिंकली आहे त्याचा विचार करून आपल्याला सतर्क होऊन या निवडणूक पूर्वी आपल्याला हे काम पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.

शहरातील जनतेला या माध्यमातून आव्हान करण्यात येते कि संपूर्ण शहरात मतदार यादी पडताळणी मोहीम शिव सेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने हाती घेतले आहे तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या भागात मतदार यादीत काही त्रुटी निर्देशनास आल्यास उप जिल्हा:-प्रमुख सतीश धोबे-9764400610,तालुका प्रमुख:-मनीष देवढे-8459778673 याच्याशी संपर्क साधावा

.तसेच बैठकित पक्ष संघटन बाबत प्रभागात जाऊन घर तिथे शिवसैनिक तसेच प्रत्येक वार्डात शाखा निर्माण करण्याचे काम करण्यात यावे. याप्रकारे सर्वांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले.

Sivshenanews/सदर आढावा बैठकीत तालुका प्रमुख मनीष देवडे ,शहर प्रमुख चंद्रकांत भुते, श्रीधर कोटकर,भास्कर ठवरे ,शंकर मोहम्मारे, अविनाश धोटे, गजानन काटोले, शितल चौधरी, अनंता गलांडे, सुनील आष्टीकर,शंकर झाडे, नंदू रेडलावार,दिलीप वैद्य, नितीन वैद्य, शकील अहमद, फिरोज पठाण , प्रसिद्धी प्रमुख आशिष वाघ,संजय पिंपळकर, लक्ष्मण बकाने ,नरेंद्र गुळकरी, प्रशांत कांबळे , पप्पू घवघवे, दिलीप चौधरी,भास्कर मानकर, भास्कर भिसे, दिनेश धोबे, गौरव गाडेकर,हिरामण आवारी, गणेश वडूले इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Ajitpawar /घरपट्टेसाठी सामाजिक कार्यकर्ता विक्की वाघमारे यांचे उपमुख्यमंत्र्याकडे साकडे

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- नगरपरिषद अंतर्गत यशवंत नगर(मास्टर कॉलनी),रामनगर वॉर्ड येथील नागरिकांनी अनेक वर्षापासून सुरू असलेला कायमस्वरूपी घरपट्टे संबंधित संघर्ष आता सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवीला आहे.

गेल्या ४० ते ५० वर्षांपासून या भागात मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या नागरिकांना अद्याप कायमस्वरूपी घरपट्टे मिळालेले नाहीत.
वारंवार अर्ज,कागदपत्र विविध स्तरावर निवेदने दिली मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडे मागणी करून अजूनही स्थायी पट्टे देण्यात आलेली नाही व कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

Hingnghatnews /ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाटच्या मुलांनी गाजविले कुस्तीचे मैदान जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेत विजयप्रवास.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता विक्की वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंगणघाटला आले असता हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.सुधीर कोठारी यांच्या उपस्थितीत घरपट्टेच्या संघर्ष व सद्यस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली,त्यांचा संघर्ष ऐकल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला निर्देश देऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून घरपट्टे बाबत प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले व यशवंत नगर(मास्टर कॉलनी),राम नगर वॉर्ड येथील रहिवाशांचा ४० ते ५० वर्षांचा घरपट्टे साठी संघर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर निवेदनातून मांडण्यात आली