संग्रामपूर ( अनिल सिंग चव्हाण )ः- प्रत्येक पुरुष महिलांच आयुष्य हे शतआयुषी व्हायाचे परंतु काळ बदलला. अन् शुद्ध पोष्टीक अन्न ,भाजीपाला मिळत नसल्याने सर्वांच आयुष्यमान नवीन पिढीत घटत ६० ते ६५ वर्षावर आले आले आहे.
परंतु संग्रामपूर शहरातील शिखल्लकार समाजातील एका आजीबाईचे वृद्धापकाळाने तब्बल १३० वर्षांनी गुजराथ मध्ये निधन झाले
“गुजराथ राज्यातील हिंमतनगर येथील शिख शिक्कलकर समाजाच्या १३० वय असलेल्या आजीबाई निवर्तल्या, त्यांच्या परलोकी जाण्याचे दुःख सर्व कुटुंबाला झाले.
परंतु नातू ,पंतू, पंतूचे मुलं,मुली पाहिलेली आजी पाहिली असल्याने सर्व आनंद उपभोगून इहलोकी जात असलेल्या या आजीबाईंचा इहलोकीची प्रवास म्हणजे राहत्या घरातून निघालेली अंतयात्रा ढोलताशांच्या गजरात आणि फटाके फोडून काढण्यात आली.
विशेषम्हणजे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणा-या आदिवासी भागातील तसेच संग्रामपूर शहरात जन्मा पासून गेल्या ३५ वर्षापासून रहिवासी असलेले ” दयालसिंग चव्हाण व व अनिलसिंग चव्हाण चौथी पिढी असलेले यांची आजीबाई ह्यांचे गुजराथ मधील हिम्मतनगर येथील कोयल कौर दादी सरदारसिंग टाक यांचे दि. ८ / जुन /२०२५ रोजी दुपारी वयाच्या १३० व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
कोयल दादी यांचं मोठं एकत्रित कुटूंब आहे.काही नातवंडे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आहेत, तर कोयलदादी ह्या आपल्या वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक मनमोकळे निर्भीड असे जीवन जगल्या होत्या. तर मृत्यू नंतरही आपल्या कुटुंब परिवाराने आनंदाने जगावे अशी शिकावं त्यांनी दिली होती.
त्यात १३० वर्षे जगलेल्या कोयलदादी यांनी आपल्या मुलांचे लग्न आणि नातवांची,पंतूंची व पंतूच्या मुला- मुलींची देखील शुभ मंगल व इतर कार्ये पाहिली आहेत. त्यामुळे नातू,पंतूना अंगा खांद्यावर खेळविलेल्या कोयलदादी ह्या आनंदाने जीवन जगले असल्याने त्यांची अंत्ययात्रा त्या गेल्याचे दुःख व्यक्त करून न काढता दुःख बाजूला सारून काढण्याचे ठरविले होते. त्यामुळे
त्यांचे निधन झाल्यानंतर हिम्मतनगर येथे त्यांच्या गावी सर्व नातेवाईक आले.
130 वर्षीय कोयलदादी यांची दुसऱ्या दिवशी ९ / जुन रोजी त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताश्यांच्या गजरात निघाली.
130 years :एखाद्या मृत व्यक्तीची अंत्ययात्रा अशा पध्यतीने काढली गेल्याने त्याची चर्चा गुजराथ आणि महाराष्ट्र राज्यात शिख शिक्कलकर समाजात चर्चेला येत आहे”..
अश्या शतआयुषी आजीबाईस भावपूर्ण श्रद्धांजली
कर्जमुक्ती व पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा शेगावातून एल्गार .!
तुपकरांची बैलगाडीतून शेगावात मिरवणूक..!शेतकऱ्यांनी केले जंगी स्वागत
Ravikanttupkar:सोयाबीन- कापसाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, उसाचाही प्रश्न बिकट आहे., नुकसान भरपाई नाही, पेरणी तोंडावरील परंतु पीककर्ज नाही, कर्जमाफी नाही आज राज्यातील शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारला आहे. सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळात मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संत नगरी शेगाव येथे बोलताना दिला. शेगाव येथील माहेश्वरी भवन येथे आयोजित एल्गार मेळाव्याला शेतकरी आणि तरुणांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला.Ravikanttupkar
संत नगरी शेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आज १० मे रोजी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. यावर्षी पाऊस वेळेवर वेळेवर येऊ द्या, पिके चांगली राहू दे आणि शेतकऱ्यांच्या घरात चांगले उत्पन्न येऊ दे, या सोबतच सोयाबीन आणि कापसाला चांगले दर देण्याची सद्बुद्धी व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची सद्बुद्धी या सरकारला दे अशी प्रार्थना रविकांत तुपकर यांनी संत गजानन महाराजांच्या चरणी केली.
पुढे बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले की,
मी गेल्या 22 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहे, त्याचेच फळ म्हणून या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांनी मला लोकसभेत अडीच लाख मते दिली. एका अपक्ष उमेदवाराने अडीच लाख मते घ्यावी ही बुलढाण्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
घाटाखालील मतदारांनी मला साथ दिली असती तर आज चित्र वेगळे असते. परंतु या भागातील लोकांना निकालानंतर पश्चाताप झाला. शेतकरी हीच माझी जात आहे आणि शेतकरी हाच माझा धर्म आहे. मी अजून केवळ शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठीच लढत आलो आणि यापुढेही शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठीच लढत राहील, याची ग्वाही गजाननाच्या साक्षीनं देतो असेही रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.Ravikanttupkar
ज्यांना निवडून दिलं त्यांनी आजपर्यंत जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही. आरोग्य मंत्री आहेत परंतु जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. केस गळती, नख गळतीबाबत अजूनही संशोधन झालं नाही. ते केंद्रीय मंत्रीचं काय पंतप्रधान जरी झाले तरी या जिल्ह्याचा जे काही भलं करू शकत नाही असा टोला देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी लगावला. ते म्हणतात मी मोदींच्या जवळ आहे जर ते मोदींच्या एवढे जवळ आहेत तर मग पिकविमा बद्दल, सोयाबीन कापूस भावाबद्दल शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल एक शब्द इथे का बोलत नाही असा सवालही यावेळी रविकांत तुपकर यांनी केला.
पिकविम्याचा प्रश्न सुरुवातीपासूनच आपण लावून धरला. विविध आंदोलन केली त्यामुळेच 2023 चा पाचशे कोटीचा आणि 2024 चा साडेसहाशे कोटींचा पिक विमा आपल्या जिल्ह्याला मंजूर झाला. राज्यात सर्वाधिक पिक विमा आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यालाच मिळाला हे आपल्या आंदोलनाचे यश आहे हे देखील त्यांनी ठणकावून सांगितले.
कर्जमाफी, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी मी गेल्या महिन्याभरापासून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. नाशिक, निफाड, सिन्नर, संगमनेर, अहिल्यानगर, शिक्रापूर, शिरूर,कर्जत, जामखेड, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड, नागपूर, अमरावती, आदि जिल्ह्यांमध्ये 27 मे रोजी सिंदखेडराजा येथे एल्गार मेळावा घेतला आणि त्यानंतर आज संत नगरीत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे असे देखील यावेळी तुपकर म्हणाले.
निवडणुकीपूर्वी सरकारने कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. मात्र आता सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झाले आहेत दुसरीकडे बँकांनी वसुली साठी तगादा लावला आहे. बँका नव्याने कर्ज देत नाहीत. वास्तविक कर्जमुक्ती करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले पाहिजे. ज्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा मिळाला पाहिजे, सोयाबीनला कापसाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरक दिला पाहिजे,जंगली जानवरांमुळे पिकांचे 50% नुकसान होते त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे, शेतमजुरांना विमा संरक्षण दिले पाहिजे, जिगाव प्रकल्पग्रस्तांना वाढीव दराने मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आपण आता लढा तीव्र करायचा आहे. ही वेळ सरकारची आरती करायची वेळ नसून हातात रूम्हणे घ्यायची वेळ आहे.
राज्यभरातील शेतकरी आता एकत्रित येत असून आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सरकारने वेळेच आपल्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळात मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा ईशारा देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी या सरकारला कर्जमाफीची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
जो कर्जमाफी की बात करेगा.. वही स्थानिक स्वराज्य संस्था मे राज करेगा, असा नारा आता गावोगावी देण्याची वेळ आली आहे. आपल्या न्याय हक्कासाठी मोठा संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन देखील यावे रविकांत तुपकर यांनी केले. यापूर्वी कार्यकर्त्यांनी रविकांत तूपकरांची सजवलेल्या बैलगाड्यातून जंगी मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले. या मेळावाला शेतकऱ्यांची गर्दी पहावयास मिळाली.
तुपकर झाले धुरकरी… बैलगाडीतून शेतकऱ्यांनी काढली मिरवणूक
एल्गार मेळाव्यासाठी शेगावात दाखल झालेल्या रविकांत तुपकरांची परिसरातील शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणुक कढत जंगी स्वागत केले. यावेळी शेगाव शहरातील अनेक व्यापारी स्वागतासाठी रस्त्यावर होते. रविकांत तुपकरांनी स्वतः बैलगाडी चालवत, धुरकरी होत बैलगाडीच्या रथाचे सारथ्य केले व बैलगाडी चालवतच ते सभाथळी पोहचले.
Ravikanttupkar :यावेळी ज्येष्ठ नेते वासूदेव उन्हाळे, आर. बी. देशमुख, राजू शेळके, संतोष खेर्डे, विलासराव पाटील, भवगन मोरे, गजानन देशमुख, सदाशिव जाधव, ज्ञानदेव कराळे, अमोल राऊत, अनंता मानकर, अक्षय पाटील, वैभव जाणे, मासूम शहा, आनंदा आटोळे, उमेशसिंग राजपुत, नाना खटके, प्रकाश पाटील, युनूस भाई, कु. वैष्णवी भारंबे, दीपक देशमुख, सचिन शिंगोटे, भागवत धोरण, अनंता शेळके, निलेश गवळी, वैभव माळी, सेख अस्लम, सुनील अस्वार, श्रीकृष्ण मसुरकर, भास्कर तांदळे, अवी बोरसे, नंदू गावंडे , सोपान खंडारे यांच्या सह हजारो शेतकरी उपस्थित होते.
sarpanchnews:जळगाव जामोद येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज लोकनिकत्तआदर्श सरपंच सौ सुवर्णाताई गणेश टापरे यांनी स्मरणपत्र दिले.
या निमित्ताने, पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईन तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी नेटाने अमलात आणली नसल्यास, गावातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल, याचा इशारा सौ सुवर्णाताई यांनी दिला आहे.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आणि महिला मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईनाची गरज स्पष्ट करण्यासाठी सुवर्णाताई गणेश टापरे यांनी अनेक निवेदने दिली आहेत.
या पाईपलाईनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टी टेकड आणि नाल्यावरील मोरया निर्मितीसाठी आणि टेकड आणि पिप्री काथरगाव येथे वाढीव इलेक्ट्रिकल पोल मिळण्यासाठीही स्मरणपत्र देण्यात आले आहे.
sarpanchnews:या कामाची अंमलबजावणी शुक्रवारपर्यंत न झाल्यास महावितरण कंपनीवरही आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगणघाट;- आधार फाउंडेशनच्या महिला मंचा द्वारे स्थानिक उदय गृहनिर्माण सोसायटीतील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये वटसावित्रीच्या पूजनाची पारंपरिक पद्धत जोपासत वटसावित्री चे पूजन म्हणजे वटवृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून खऱ्या अर्थाने वटसावित्री चा सण साजरा केला.
पर्यावरणाच्या दृष्ठीने अतिशय महत्त्वाचा सदापर्णी बहुवार्षिक वृक्ष म्हणजे वटवृक्ष होय. परंपरा आणि पर्यावरण याची योग्य सांगड घालून वटवृक्ष रोपण व त्याचे संवर्धनाचे कार्य आधार फाउंडेशनच्या महिलांनी हाती घेतला गेल्या नऊ वर्षापासुन हिंगणघाट शहर व परिसरात आधार फाऊंडेशन द्वारे विविध समाजपयोगी व मानवी कल्याणकारी उपक्रमाचे आयोजन केल्या जाते.
हा महाकाय वटवृक्ष शांत, थंड व सर्वाधिक प्राणवायू देणारा असून त्याची साल, मुळे व फळे अतिशय गुणकारी समजल्या जात असल्यामुळे शहरांमध्ये विविध ठिकाणी रोपणासाठी वटवृक्षाचे वृक्षारोपण समुद्रपुर नगरपंचायतिचे मुख्य कार्यकारी अधिकारी पौर्णिमा गावित,लोकमान्य हायस्कूल दारोडा शाळेच्या मुख्याध्यापिका उषा घोडमारे,आधार फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्षा माधुरी विहिरकर,स्वाती अतुल वांदिले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा गावित यांनी वृक्षारोपण हि काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती धार्मिक यांनी केले तर आभार प्रदर्शन शिल्पा हिंगणे यांनी केले.
pwdnews:वकाना गावाच्या रस्त्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, विजय भाई वानखेडे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रभाव केवळ गावापुरता नाही तर सर्व उपेक्षित गावांसाठी आहे.
हे आंदोलन गावातील शेतकरी, मजूर आणि नागरिकांना रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी प्रेरित करत आहे.
वर्षानुवर्षे विलंबाने जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडीला या रस्त्यासाठी मागणी केली गेली आहे, परंतु त्याला मंजुरी नाही. विजय भाईंनी झाडावर बसून, उपोषणाच्या माध्यमातून गावातील प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी एक लक्षवेधी मार्ग निवडला आहे.
हे आंदोलन केवळ रस्त्यासाठीच नाही तर गावाच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आहे.
pwdnews:विजय भाईंनी ऑल इंडिया पँथर सेना मार्फत गावकऱ्यांच्या व्यथा जगासमोर मांडल्या आहेत. या संघटनेची भूमिका आता केवळ दलित अत्याचारांविरुद्ध न लढता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत विस्तारलेली आहे. हे प्रयत्न गावाच्या विकासाचा पाया घातला आहे.
हिंगणघाट :-आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कार्यक्षम लॉजिस्टिक्स आणि साठवणुकीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी NFSA अंतर्गत ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल दिनांक ३१ मे, २०२५ रोजी पर्यंत व वाटप दि. ३० जून, २०२५ रोजीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानूसार कार्यवाही करण्याबाबत शासनाचे संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.२. NFSA अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल व वाटप यासंदर्भात आढावा घेण्यासाठी शासनाकडून तसेच भारतीय अन्न महामंडळाकडून कार्यालयांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, यासंदर्भात शासनामार्फत दि. ०९.०५.२०२५ व दि. १४.०५.२०२५ रोजी व भारतीय अन्न महामंडळाकडून दि. २१ मे, २०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे बैठक आयोजित करुन आढावा घेण्यात आला.
तथापि, जिल्ह्यांकडून करण्यात येणारी अन्नधान्याची उचल ही अत्यंत धिम्या गतीने होत असल्याने आजमितीस केलेली उचल ही अत्यल्प आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, माहे ऑगस्ट पर्यंतचे नियतन दि. ३१ मे, २०२५ रोजी पर्यंत उचल करणे आवश्यक आहे. मात्र, अन्नधान्याची उचल विहीत कालावधीत न झाल्यास पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
rainupadate:उपरोक्त प्रयोजनाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.३. त्यामुळे आपणास सूचित करण्यात येत आहे की, NFSA अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, पात्र लाभार्थ्यांनी सदर अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानामधुन करावी,
हिगणघाट :- पोलीस स्टेशन हद्दी मध्ये सतत 5 महीन्यापासुन दुकान फोडुन चोरी होत आहे पण चोराबददल कोणताही सुगावा लागत नव्हता, चोर हा टिनाचे दुकान असेल त्याच दुकानावर चडुन टीनाला कसुन असलेले नट-बोल्ट पाणा पेन्चीस नी काढुन व टीना वाकवुन दुकानात प्रवेश करीत असे अश्या चोराची पद्धत लक्षात घेता त्याच प्रकारचे चो-या यवतमाळ जिल्हात पोलीस स्टेशन बाभुळगाव राळेगाव, कळंब, अमरावती जील्हयात, अकोला जिल्हयात चोराचा शोध घेत असता दरम्यान आढळुन आल्या व त्याचे दुकानातील व्हिडीओ अस्पष्ट फुटेज बारकाईने बघीतले असता हा चोरटा तोच असल्याचे निष्पन्न झाले पण काहीही केल्याने चोरटा पोलीसाच्या हाती येत नव्हता, चोरीची पद्धत बघीतली असता वांरवार ईतर जिल्हयात अश्याच प्रकारच्या चो-या झाल्याची माहीती मिळाली.
अशीच चोरी दि. 20/05/2025 चे रात्र दरम्यान झाली असता, घटनास्थळाची निटसर पाहणी केली असता दुकानाचे वरील टिनाचे नट काढुन व टिन वाकवुन दुकानात प्रवेश केला ही चोरी याच चोरटयानी केली आहे हा पोलीसाचा पुर्ण विश्वास झाला असता हिंगणघाट मधील कार्यरत असलेले मा. देवेन्द्र ठाकुर, पोलीस निरीक्षक, यांनी गुन्हे प्रगटीकरण पथक पो. हवा यशवंत गोल्हर यांचे टिमला प्राचारण करून सदर चोरी बाबत विशेष मार्गदर्शन देवुन चोरांचा शोध करण्यास सांगण्यात आले, हिंगणघाट मधील दुकान फोडी बाबत व बाहेर जिल्हयातुन याच प्रकारचे चोरी होत आहे व हा चोर हाच आहे हा चोराचे चोरी दरम्यान काही विशेष लक्ष करण्यासारखे चुका केल्या व तो चोर यातच पोलीसाचे जाळयात लटकला. एक गोष्ट पोलीसांना नेहमीच तपासा दरम्यान हटकत होती ती म्हणजे चोरी केल्यावर भारी भक्कम बॅग उचलुन तो कशावर तरी नेत असेल ते वाहन कोणते ? चोरी करण्याची दिशा कोणती ? नेहमी चोर कोणती चोरी केल्यावर कोठे जायचा? हे बारीक बारीक मुद्दे आरोपी शोध घेतांना लक्षात करण्यात आले होते यात सायबर कक्ष, वर्धा यांचा मोलाचा वाटा त्यांची वेळोवेळी मदत मिळत असे व सायबर सेल नेहमी आम्हचा तपास चोरटयाचे दिशेने जात आहे हे लक्षात आणुन पण दिले.
चोरटे हा वेळोवेळी मोबाईल बदलवीत असे पण त्या मुळे तपासात फार काही अडचण होत नव्हती कारण ते चोरटे पोलीसाचे काही अतंरावरच होते, आम्ही बुलडाणा, मलकापुर, शेगाव अमरावती या जिल्हयात 15 दिवसापासुन पाठलाग करणे सुरू केले त्यात असे लक्षात आले की हे आता हिंगणघाट येथे येणार, कारण की त्यानी केलेली चोरीचा माल हे ते हिंगणघाट येथील पानटपरीवरच विकायचे यातुन चोरटयानी आपले चांगले ग्राहक पण तयार केले होते पण दुकानदाराना हा चोरीचा माल असल्याचा काहीच सशंय नव्हता यावरून आम्ही हिंगणघाट परीसरात जास्त पेट्रोलीग करणे सुरू केले.
व पेटेालींग दरम्यान एल.आय.सी कार्यालय, हिंगणघाट येथे एका दुचाकीवर दोन युवक सशंयितरित्या फिरतांना पोलीसाना दिसले असता त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता 1) उमेश उर्फ गरीबा श्रवण तुंबवाड, वय 37 वर्ष, रा.पळसा,ता. माहुर, जि. नांदेड 2) शुभम अनिल कांबळे, वय 28 वर्ष, रा. अशोक नगर, वर्धा यांची सखोल विचारपुस करून त्यांचे ताब्यातील बॅग व थैलीची पाहणी केली असता त्यामध्ये साड्या, पॅन्ट, मोबाईल, व दुकानफोडीचे पाणा-पेन्चींस मिळुन आल्याने त्याची पोलीस स्टेशन येथे सखोल चौकशी केल्यावरून पोलीस स्टेशन येथे नोंद असलेला अप.क 571/25 मधील चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत झाल्याने त्यांना विचारपुस केली असता हिंगणघाट हद्दीत चो-या केल्याचे कबुल केले असता सदर गुन्हयात अटक करून मा. न्यायदंडाधिकारी यांचे समोर उभे करून पोलीस कस्टडी रिमांड घेतला असता तपास सुरू केला असता यवतमाळ जिल्हयात, बाभुळगाव, कळंब, यवतमाळ तसेच अमरावती, अकोला, बुलडाणा, व वर्धा जिल्हयात चो-या केल्याची कबुली दिली. आतापावेतो एकुण 13 चो-या उघड करण्यात आल्या असुन या चोरट्यानी भरपुर प्रमाणात चो-या केल्याचे मान्य केले आहे त्यावरून बाहेर जिल्हयातील पोलीस स्टेशन ठाणेदाराशी संपर्क साधने सुरू आहे.
हे दोन्ही आरोपी अट्टल चोर असुन हे गंभीर गुन्हयातील उमेश उर्फ गरीब्या श्रावण तुंबवाड हा खुन सारख्या गुन्हयात आरोपी असुन शुभम अनिल काबंळे हा पोक्सो 376 मधील गुन्हयात यांचे विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. या दोन्ही चोरटयाना ज्या-त्या ठिकाणी माल विकला तेथुन माल हस्तगत केला. आतापावेतो आरोपी कडुन एक नवीन हिरो होन्डा कंपनीची प्लेन्डर प्लस मोटर सायकल सह वेग-वेगळ्या गुन्हयातील मोबाईल, साडया, पॅन्ट, काजु, बदाम, वेगवेगळ्या कंपनीचे सिगरेटचे पॉकेट, कच्ची सुपारी, निसर्ग पॉकेट, 43 नंबरचे बिडीचे बंडले असा भरपुर प्रमाणात माल व काही नगदी रोकड असा एकुण 1,97,923 /- रूपयाचा माल हस्तगत करण्यात पोलीसाना यश मिळाले.
Crimenews :गुन्हयासंबधीत सदरची कार्यवाही मा. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा मा. सागर कवडे, अप्पर पोलीस अधिक्षक, मा.रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात पो.नि. देवेन्द्र ठाकुर, ठाणेदार, पो.स्टे हिंगणघाट, यांचे निर्देशनात गुन्हे प्रगटीकरण पथक पो.हवा यशवंत गोल्हर, ना.पो.कॉ विकास अवचट, नरेन्द्र आरेकर, राकेश आष्टनकर, पो.शि दिपक हाके तसेच सायबर सेल, वर्धा मधील पो.हवा दिनेश बोथकर, अक्षय राउत, ना.पो.कॉ गोंविद मुडें यांनी कार्यवाही केली, पुढील तपास पो.हवा यशवंत गोल्हर हे करीत आहे.
Hingnghat :हिंगणघाट तालुक्यातील डंकीन परिसरात वणा नदीच्या पात्रातून औरंगाबाद येथील पियुष इन्फ्रा कंपनीने बंधाऱ्याच्या बांधकामादरम्यान कोणतीही प्रशाशकिय वैध परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
या प्रकरणी वणा नदी संवर्धन समितीने या परिसरात जावुन रेती साठ्याचे फोटो व व्हिडिओ काढली होती. मोक्का चौकशी नायब तहसीलदार कांबळे व तलाटी,पटवारी सय्यद अहमद शेख यांनी १००ब्रास रेती असल्याचे सागितंले होते.
दुसऱ्या दिवशी नायबतहसिलदार सागर कांबळे यांना निवेदन देवुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.यानंतर प्रशासनला वेळोवेळी अवगत करुन चौकशीची मागणी कोणताही दबाव न टाकता महसूल मित्र या नात्याने आम्ही प्रशासनाला सहकार्य करत होतो.
तहसीलदार योगेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रेती मोजनीचे आदे्श दिले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोजनी मध्ये ६३.१० ब्रास रेती असल्याचे निषपन्न झाले.व तो अहवाल तहसीलदार शिंदे यांना देवुन उपविभागीय अधिकारी याच्या कडे वर्ग केला. उपविभागीय अधिकारी याच्या आदेशानुसार तहसीलदार यांनी कंपनीवर 14,57,610 रुपयांचा दंड ठोठावला हेच सिध्द झाले कि कंपनी कडून अवै रेती उचलून झालीआहे.
मात्र, या दंडाच्या रकमेवर वणा नदी संवर्धन समितीने तीव्र असमाधान व्यक्त केले आहे. दंडाची रक्कम चौपट करावी कारण इतक्या मोठ्या प्रमाणात रेती साठा काढण्यात मशीनरीचा वापर निश्चित झाला आहे.परंतु गैरकायदेशीर खनिज चोरीचा गुन्हा दाखल केला नाही.या प्रकरणात अवैध रेती उपसण्यासाठी वापरलेली संसाधने आणि वाहतूक साधने जप्त करण्यात आली नाही.
पंचनामा होवुन सुधा कंपनीडुन रेतीची विलेवाट लावण्यात आले कारण १००ब्रास रेती ही महसूल विभागाच्या पाहणीत होती मग ३७ ब्रास रेतीचे काय झाले हा मोठा प्रश्न आहे. वणा नदी संवर्धन समितीच्या वेळोवेळी हा विषय प्रशासनाच्या लक्षात आणुन दिला नसता तर भविष्यात पियुष इंटस्टक्चर कंपनीकडून एक ते सव्वा कोटी रुपयांची रेतीचा शाशनाचा खनिज महसूल बुडवला असता. तसेच, बंधारा खोदकाम दरम्यान आढळलेल्या *मानवी अवशेषांची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी पियुष इन्फ्रा कंपनी आणि पाटबंधारे विभागावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने समितीने नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत पोलिस प्रशासनाने तातडीने कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी समितीने केली होती.प्रशासनाच्या ढिसाळ कारवाईमुळे आणि प्रकरणाच्या गंभीरतेवर योग्य पावले न उचलल्याने वणा नदी संवर्धन समितीने न्यायासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे सदर कंपनी यात नदीवर काम करीत असताना पर्यावरणाचा विचार सुरक्षेच्या दुष्टीकोनातुन कोणत्याही उपयोजना केले नाही आहेत याबाबत अधिकार्यांनी सक्त समज द्यावी जेणेकरून कोणतीही घटना घडु नये.
Crimenews:वणा नदी संवर्धन समिती ही सार्वजनिक कामात अग्रण्य असते विचार भविष्यात पण राहील. यांनी संपूर्ण कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, नदीच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर कायदेशीर लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे.
Hingnghat:हिंगणघाट: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे इंडियन आर्मीसाठी घेण्यात आलेली (CDSE ) या परीक्षेचा निकाल नुकताच लागला या परीक्षेत स्थानिक रिठे कॉलनी येथील वेदांत प्रभाकर कोळसे या विद्यार्थ्यांने देशात ३६६ वा क्रमांक मिळवून त्यांची लेफ्टनंट पदी निवड झाली आहे.
त्याने हिंगणघाट शहरासह वर्धा जिल्ह्याचे नाव प्रकाश झोतात आणले आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्याच्या निवासस्थानी जाऊन आधार फाऊंडेशन वतीने रोपटे, शाल व स्मृतिचिन्ह आणि मिठाई देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले त्याला त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी वेदांत कोळसे याने आपल्या यशाचा प्रवास कथन केला.यावेळी वेदांत कोळसे, वडील प्रभाकर कोळसे, आई प्रतिभा कोळसे यांच्यासह सत्कार करण्यात आला.
हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कन्या पाखी वांदिले हिच्या वाढदिवसाच्या निमित्य श्री.साई मंदिर समोरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण आणि मानवी जीवन यांच्यातील नातेसंबंधांबद्दल बोलायचे तर ते एक अतूट नाते आहे, ज्यात निसर्गाने मानवाला सर्व काही दिले आहे. मात्र, निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीच्या नावाखाली ना त्याचे नीट संरक्षण केले आणि ना भविष्याची चिंता.
त्याचाच परिणाम म्हणून आज जग प्रदूषित पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्तींच्या कोपाखाली गाडले जात आहे. गत काही वर्षांत पर्यावरणाची गंभीरपणे बिघडत चाललेले आहे. म्हणूनच उष्माघाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे,
आपल्याला पर्यावरणाला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या शुभमंगल प्रसंगी प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक वृक्ष लावण्याची गरज आहे असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.
atulvandile:या कार्यक्रमाला श्री.साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर महाराज, अतुल वांदिले, नामदेव वांदिले, विनोद कुबडे, दशरथ ठाकरे, बालु वानखेडे, माजी नगरसेवक दादा देशकरी, अमोल बोरकर,स्वाती वांदिले, अमिता जुमडे,माधुरी कावरे, राणी सोमवंशी, वैशाली हेडाऊ,जयश्री कुबडे, प्रवीण कावरे, आनंद जुमडे, नितीन भुते, बच्चू कलोडे,सुनिल भुते, प्रवीण भुते,राजू सिंन्हा,सुशील घोडे, राहुल जाधव, राजू मुडे, कुणाल घोल्हर,प्रशांत कुटे,सतिश झीलपे, दिनेश राऊत आदी उपस्थित होते.