Home Blog Page 3

Yavalnews /यावल येथील शेतकी संघात पत्रकार दिन साजरा, रक्तदान शिबिर संपन्न.

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल : येथील तालुका शेतकी संघात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तर पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला.

येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मंगळवारी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे, शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील, नगरसेवक हेमराज फेगडे, नगरसेवक योगेश चौधरी, चेतन अढळकर,रितेश बारी सह मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शेखर पटेल,सुधीर चौधरी, सुनील गावडे,तेजस यावलकर,प्रमोद वाणी, भरत कोळी,विक्की वानखेडे, गोकुळ तायडे, मिलिंद जंजाळे, फिरोज तडवी, दीपक नेवे, राजू पिंजारी या पत्रकारांचा पुष्प, पेन देऊन शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील यांनी पत्रकार दिनानिमित्त सन्मानित केले.

Yavalnews /त्याचप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले. गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल व रक्तपेढीच्या डॉ.श्रद्धा उबाळे, डॉ. कृणाल ढोबळे, डॉ.लक्ष्मण पाटील, डॉ. दिनेश भोळे, डॉ.रुपेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील पार पडले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेखर पटेल यांनी केले तर आभार तेजस यावलकर यांनी मानले.-

Sarpanchnews /पळशी झाशी येथील सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित.

0

 

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित आदर्श सरपंच सन्मान सोहळा 2025 यामध्ये ग्रामपंचायत पळशी झाशी येथील सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,

गावात काम करत असताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न तसेच गावात मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास कामांची दखल म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला,

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना श्री महंत डॉ. श्रीकांत धुमाळ उज्जैन, माननीय डॉक्टर शंकर अंदानी, माननीय रुचिता देसाई सिने अभिनेत्री, भाऊसाहेब पावसे, माननीय बाबासाहेब पावसे, यांच्या हस्ते देण्यात आला.त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मारोडे उपस्थित होते.

गावात केलेल्या विकास कामांच्या भरोशावर ग्रामपंचायत पळशी झाशी व सरपंच सौ. प्रियंका मेटांगे यांनी यापूर्वी सुद्धा नाशिक येथे गुरुमाऊली तसेच न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हस्ते आदर्श महिला पुरस्कार, बुलढाणा येथे जिल्हास्तरीय लोकमत सरपंच अवार्ड, लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषद तर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच, संभाजीनगर येथे पहाट फाउंडेशन तर्फे आदर्श महिला सरपंच, तसेच पंचायत समिती मार्फत, तसेच गावात व तालुक्यात ठिकठिकाणी जवळपास 50-60 ठिकाणी गावात केलेल्या विकास कामांबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,

तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सुद्धा ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबवले आहेत, व गावातील विकास सुरू आहे.

Sarpanchnews /पुरस्कार मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे यांनी आयोजकांचे आभार मानले, तसेच मिळालेला पुरस्कार नेहमी सहकार्य करणारे सचिव माननीय श्री हेमंत बापू देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बचत गट महिला, तसेच गावातील नागरिकांचे वेळोवेळी मिळणारे सहकार्य यामुळेच हा पुरस्कार आम्हाला मिळाला..
यामध्ये गावकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे,

Crimenews /उमरगा येथे अनैतिक संबंधातून प्रियकराने केला एकाचा खून

0

 

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा : रविवारी उमरगा शहर बायपास जवळच्या कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका ३५ वर्षीय युवकाचा डोळ्यात मिरची पावडर टाकून दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी अवघ्या १२ तासात उमरगा पोलिसांनी खून करणा-या दोन आरोपींचा शोध लावला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत शाहूराज महादू सूर्यवंशी वय ३५ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रविवारी सकाळी कोरेगाववाडी रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आल्याने, नागरिकांनी पोलिसांना कळविले.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुज्जरवाड, पोलिस कर्मचारी हजर झाले. पण मृतदेहचा चेहरा विद्रुप केल्याने ओळख पटत नव्हती. उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार व पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी आपले कौशल्य पणाला लावत मयताची ओळख पटविण्यासाठी अनुभव पणास लावला.

शेजारील शेतकरी, नागरिक यांच्याशी संपर्क साधून तसेच मयताने परिधान केलेल्या शर्टाच्या टॅग वरून, तब्बल चार तासांनी अखेर मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान खून करणा-यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले तर फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी उपस्थित झाली. वरिष्ठ पोलिस अधिकारी मेघना नागराज यांनी घटनास्थळाला भेट दिली.

यानंतर पोलिसांनी तांत्रिक घटनाचे विश्लेषण करून, सिसिटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड आदींचा अभ्यास करून आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे वय ३२ यास रात्री उशीरा शेतातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. तर पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी वय ३४ हीला ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपीने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की मयताची पत्नी गौरी व आरोपी शिवाजी यांचे अनैतिक संबंध होते. यामुळे शाहूराज व गौरी यांच्यात सतत भांडण व्हायचे. यामुळे शाहूराजचा कायमचा काटा काढण्यासाठी आरोपी शिवाजी व गौरी यांनी रविवारी पहाटे आरोपी शिवाजी याने मयत शाहूराज याला दारू पाजविली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बायपास जवळच्या कोरेगाववाडी येथील रस्त्यावर नेऊन डोळ्यात मिरची पावडर घालून रस्त्यावर पाडले.

Crimenews /नंतर संधी साधून आरोपी शिवाजी याने मयत शाहूराज याच्या डोक्यात हंटर व दगडाने जबर मारहाण केली. यात शाहूराज सूर्यवंशी याचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी दिली.

Umrganews /महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा-प्रा.सुरेश बिराजदार

0

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा: ग्रामीण भागातील सामान्य जनतेने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी कलदेव निंबाळा येथील मोफत आरोग्य शिबिरामध्ये केले. शनिवारी (दि.४) रोजी शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उमरगा आणि ग्रामपंचायत कलदेव निंबाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.dharashivnews

सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून प्रा.बिराजदार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
प्रस्ताविकात डॉ.आर.डी. शेंडगे यांनी उपस्थितांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सविस्तर माहिती देत आरोग्य विषयक माहिती देवून मार्गदर्शन केले.

Umrganews /या शिबिरात १४५ रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.यातील ३५ रुग्णांना पुढील मोठ्या उपचारासाठी उमरगा येथील शेंडगे हाॅस्पीटलमधे नेण्यात येणार आहे. डॉ.आर. डी शेंडगे, डॉ. सोमनाथ कवठे, डॉ. विशाल पवार ,डॉ. विशाल पवार ,डॉ. मेघा पाटील, आरोग्य अधिकारी,आनंद चव्हाण ,नर्स पुनम मते आदींनी तपासणी केली. यावेळी प्राध्यापक सुरेशदाजी बिराजदार यांना धाराशिव आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

Dharashivnews /तसेच गावामधील नव्यानेच नोकरीसाठी निवड झालेल्या शिवराज नंदगावे, लक्ष्मण भंडे, प्रल्हाद जाधव या युवकांचा प्रा.सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते देविदास पावशेरे यांनी केले.

Umrganews /यावेळी सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच सुनीता पावशेरे, चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्ती अध्यक्ष मल्लिनाथ कारभारी,माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील,मधुकर पाटील यांच्यासह नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Buldhanaurban /बुलडाणा अर्बन बँकेच्या काही शाखेत ठेवीच्या रकमा काढण्यासाठी एकच गर्दी !

0

 

[बँकेतील ठेवी काढून घ्या.नाहीतर बँक बंद होणार!सोशल मिडीयावर व्हिडीओ.वृत्त व्हायरल.]

बुलडाणाः- महाराष्ट्रासह इतर राज्यात अग्रेसर व लोकहितास्तव काम करणाऱ्या व भरभक्कम कोट्यावधी ठेवी असलेल्या बुलडाणा अर्बन बँक मध्ये घोटाळा,नियमबाह्य कर्ज वाटप.

Kiritsomya /बुलढाणा अर्बन बँकेतील अनियमिततेवरून आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांचा आवाज शांत का ?

त्यात काहींनी कर्ज न भरल्यामुळे बँक तोट्यात येवून बंद होणार!ठेवी बुडणार,अश्या चर्चांना उधान आल्याने काही शाखांमध्ये ठेवी परत मिळाव्यात ह्यासाठी गर्दी!अश्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.kiritsomya

बँक प्रशासनाकडून विविध माध्यमातून बँकेची परिस्थिती नियंत्रित असून अफवा असल्याचे सांगितले जात आहे.

असे असले तरी झालेला घोटाळा,नियमबाह्य कर्ज वाटप,काहीं कर्मचाऱ्यांचे निलंबन,राजीनामे,काहींच्या इतर ठिकाणी बदली.आदी कारणामुळे खातेदार ठेवीदारांमध्ये संभ्रम होत आहे.

काहीतरी तथ्थ असावे म्हणूनच बुलडाणा अर्बनच्या काही शांखामध्ये ठेवीदा खातेदारांनी ठेवी परत मिळाव्यात ह्यासाठी गर्दी केली.buldhanaurbanbank

असून सकाळपासून शांखासमोर बँक खातेदारांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले.काही ठिकाणी रोख रकमेची उपलब्धता मर्यादित असल्याने ठेवीदारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे.

[jainbording/अखेर सुर्या मराठी न्युजचा परिणाम!] [ जैन बोर्डींग प्रकरणी बुलडाणा अर्बनच्या तीन विभागीय व्यवस्थापकांचा राजीनामा तर काहींना पूणे शाखेत पाठवले.]

जेष्ठ नागरिक व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने रकमा काढण्यासाठी जात आहेत.

Buldhanaurban /ठेवीदारांचा विश्वास डळमळीत झाला असून त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन व नियामक संस्थांनी तातडीने स्पष्ट भुमिका मांडून ठेवीदारांचा विश्वास पुर्नस्थापित करावा,अशी बँक ग्राहक खातेदारांकडून मागणी होत आहे.

Umrganews /स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी मातंग समाजाचा ग्रामपंचायती समोर ठिय्या ; आश्वासनानंतर अंत्यविधी

0

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा: उमरगा तालुक्यातील एकोंडी येथील जेष्ठ नागरिक नागोराव दुनगे यांचे १ जानेवारी रात्री ८:३० वाजता निधन झाले. परंतु २ जानेवारी रोजी मयत नागोराव दुनगे यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मातंग समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायत समोर ठिय्या मांडला.

Dharashivnews /मातंग समाजातील नागरिकाच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहे. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मातंग समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायती समोर ठिय्या आंदोलन मांडत रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली. वारंवार मागणी करुनही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.

यामुळे मातंग समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायती समोर ठिय्या मांडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संभाव्य वाद होऊ नये म्हणून गावातील काही सुज्ञ नागरिक, तसेच तहसीलदार, सरपंच, गटविकास अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांनी वेळीच चर्चा करुन स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता लवकर करण्यात येईल असे तोंडी आश्वासन मध्यस्थी लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष विजयभाऊ तोरडकर व मराठवाडा उपाध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांना देण्यात आले.

Umrganews /या दिलेल्या तोंडी आश्वासनानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला आणि एकोंडी गावातून गेलेल्या पळसगाव रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार केले.मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Kiritsomya /बुलढाणा अर्बन बँकेतील अनियमिततेवरून आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांचा आवाज शांत का ?

0

 

संपादक अनिलसिंग चव्हाण

4 वर्ष उलटून सुद्धा या घोटाळ्यावर किरीट सोमय्या यांचे मौन का ?

Buldhanaurban /आयकर विभागाने बुलढाणा अर्बन सहकारी बँकेतील एकूण 53.72 कोटी रुपयांच्या ठेवी जप्त केल्या होत्या.. Kiritsomya

या ठेवी नक्की कुणाचे आहेत? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी 7 नोव्हेंबर 2021 रोजी उपस्थित केला होता..

[jainbording/अखेर सुर्या मराठी न्युजचा परिणाम!] [ जैन बोर्डींग प्रकरणी बुलडाणा अर्बनच्या तीन विभागीय व्यवस्थापकांचा राजीनामा तर काहींना पूणे शाखेत पाठवले.]

Buldhanaurban /तसेच हे पैसे नक्की कुणाचे आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याचेही सोमय्या यांनी त्यावेळी स्पष्ट केले..

सप्टेंबर 2021 मध्ये बुलढाणा येथील बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या.

कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार, काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग आयकर विभागाला सापडले होते.

Buldhanaurban/ तेंव्हा पर्यंत 1200 हून अधिक खाती बेनामी असल्याचे सिद्ध होत खात्यांद्वारा 53.72 कोटी मनी लाँड्रिंग करण्यात आल्याचे उघड देखील झाले होते..

आयकर विभागाने 53.72 कोटी रुपये असलेली 1200 बँक खाती स्थगित केले आहेत आणि पैसे जप्त केले आहेत,

Kiritsomya /असे किरीट सोमय्या यांनी बुलढाणा येथे येऊन सांगितले होते..घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्ली येथे जात आहे..

दिल्लीत सहकार मंत्रालय, ईडी, आयकर विभाग अशा विभिन्न अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन माहिती घेणार असल्याचे देखील सोमय्या यांनी त्यावेळी सांगितले होते..

Buldhananews /बुलढाणा येथून सुरू झालेल्या एका पतसंस्थेत मोठा भूकंप…!

याच घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या बुलढाणा येथे सुद्धा येऊन गेले होते..

Kiritsomya /मात्र जवळपास 4 वर्ष होत आहे अद्याप या घोटाळ्यावर किरीट सोमय्या मौन का बाळगले आहे.असा सवाल सामान्य जनता विचारत आहेत..

Crimenews /वर्ध्यात अट्टल घरफोडी टोळी जेरबंद ; वर्धा–वरोरा–बुटीबोरीतील ६ गुन्हे उघड, १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा : स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी अट्टल घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करत वर्धा, वरोरा व बुटीबोरी परिसरातील एकूण सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.wardhanews

दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सावंगी मेघे येथील विजय लॉन्स परिसरात राहणारे रोहित विलासराव चंदनखेडे (वय २५) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी पत्नी व मुलासह दुपारी घराचे बांधकाम पाहण्यासाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने बंद घरात प्रवेश करून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (किंमत २४ हजार रुपये) व रोख ४५ हजार रुपये असा एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी सावंगी मेघे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.hingnghatnews

गुन्हा अज्ञात आरोपीने केल्याने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे विशाल राम गायकवाड (रा. कैकाडी नगर, नागपूर) व त्याचे साथीदार घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. नागपूर येथील बर्डी मार्केट परिसरातून दोन वाहनांसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींची नावे विशाल उर्फ बबलू राम गायकवाड (वय २२), आदित्य राम गायकवाड (वय २०) अशी असून, दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. चौकशीत आरोपींनी देवळी, वर्धा शहर, सेवाग्राम, वरोरा (जि. चंद्रपूर) व बुटीबोरी (जि. नागपूर) येथील घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

आरोपींकडून एकूण सहा घरफोडीचे गुन्हे उघड करून १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल दोन पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपींना सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Wardhanews /ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Umrganews /भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

0

 

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे

उमरगा : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या मुख्य कार्यालयात उमरगा येथे सन २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ . प्रवीण स्वामी ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे ,चेअरमन सुरेश दाजी बिराजदार ,संचालक डॉ .शरणाप्पा मलंग , प्रा .सतीश इंगळे ,व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे यांच्यासह प्रमुख उपस्थितीत दि . ३१ रोजी संपन्न झाले .

भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उमरगा येथे मुख्य कार्यालयात करण्यात आले . बँकेचे हितचिंतक व्यापारी नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .dharashivnews

बँकेच्या २९ वर्षाच्या कार्यकाळात आठ शाखांचा विस्तार झाला असून येत्या काही महिन्यात लातूर येथे या बँकेची शाखा सुरू करणार असल्याची माहिती . यावेळी सुरेश दाजी बिराजदार यांनी दिली .

Umrganews /या कार्यक्रमासाठी सुधाकर पाटील ,शरणू स्वामी ,मनीष सोनी , संतराम मुरजानी ,सुशील दळगडे,शंतनु सगर , पोपट गायकवाड ,रवी बिराजदार , या सह बँकेचे कर्मचारी दयानंद बिराजदार, संदीप जाधव ,विजय चव्हाण,ब्रिजेश बिराजदार ,विनोद जाधव ,मेगा बिराजदार,वर्षा बिराजदार, भावना बिराजदार , संतोष शिरगुरे , राहुल गुरव, चारूदत्त कांबळे , राजु राठोड , बळी चव्हाण आदींची उपस्थिती होती .

[jainbording/अखेर सुर्या मराठी न्युजचा परिणाम!] [ जैन बोर्डींग प्रकरणी बुलडाणा अर्बनच्या तीन विभागीय व्यवस्थापकांचा राजीनामा तर काहींना पूणे शाखेत पाठवले.]

0

 

( संपादक अनिलसिंग चव्हाण )

बुलडाणाः- जिल्ह्यासह महाराष्ट्रात व व इतर प्रदेशात प्रसिध्द असलेल्या बुलडाणा अर्बन बँक घोटाळा, नियमबाह्य कर्ज वाटप, जैन बोर्डींग प्रकरण सह सर्व उघडकीस येणार? चौकशी होवून कारवाई व्हावी. काही बँक सोडून जाणार!

Buldhananews /बुलढाणा येथून सुरू झालेल्या एका पतसंस्थेत मोठा भूकंप…!

अश्या प्रकारचे वृत्त सुर्या मराठी न्युजवर प्रसिध्द व्हायरल झाल्याने बँकेचे पदाधिकारी,अधिकारी ,कर्मचारी म्हणून ह्या प्रकरणात गुंतणार.व कारवाई होणार. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले व भितीने जैन बोर्डींग प्रकरणी पूणे अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक शिरीष देशपांडे, योगिनी पोफळे, उदय पाचपांडे ह्यांनी राजीनामा दिला.तर काहींना बुलडाणा येथून पूणे शाखेत पाठविल्याचे समजते.

ह्यावरुन हे सिद्ध होते की मोठा गाजावाजा करुन अनेक विविध उपक्रम राबवून लाखो रुपये खर्च केल्या गेले व केल्या जात आहे. त्यापाठीमागे दडलयं वेगळच तर काय? ह्या बुलडाणा अर्बन बँकेत कोट्यावधीचा घोटाळा झाला असून अधिकारी ,पदाधिकारी,कर्मचारी ह्यांनी काही व्यापारी व ठेकेदारास नियमबाह्य कर्ज वाटप करुन जनतेच्या ठेवी असलेल्या रकमेवरच डल्ला मारला अन् मोठेपणा करुन घेतला.

अधिक खोलात गेल्यास व खरोखरच संबंधित अधिकारी ह्यांनी प्रामाणिकपणे व निपक्षपणे चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर निघू शकते.एवढे मात्र खरे.आणि ह्या प्रकरणात पदाधिकारी,अधिकारी ,कर्मचारी हे गुंतणार असून त्यांचेवर टांगती तलवार आहे.

पाहु या ही तलवार कोणा-कोणाचा घात करते.व वार करते….एवढच नव्हे तर महाराष्ट्रात ब-याच जिल्ह्यात फिरुन भ्रष्टाचार झाल्याच्या वल्गना करुन भ्रष्टाचार उघडकीस आणू आसे म्हणणारा मुंबईतील एक बडा राजकीय पदाधिका-याने ह्या बुलडाणा अर्बन बँकेत येवून भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा वाव केला.

पण तो कुठं दडला ?कुठं माशी शिंकली.देव जाणे व तोच जाणे.तुर्तास एवढेच….

[ पुढील एपीसोड मध्ये वाचा….
बुलडाणा अर्बन बँक प्रकरणात किरीट सोमय्या नामक व्यक्ती आला.अन् चुप्पी साधून गेला.]