Home Blog Page 33

operation sindoor / ऑपरेशन सिंदूर’च्या दिवशी जन्मलेल्या मुलीचे नाव सिंदुरी, कुटुंबाची देशभक्ती प्रेरणा

0

 

operation sindoor:भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केल्यानंतर, बिहारमध्ये एका दांपत्याने त्याच्या सन्मानार्थ आपल्या नवजात मुलीचे नाव ‘सिंदुरी’ ठेवले. ही कारवाई पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर घडवून आणली गेली,

ज्यामध्ये अनेक निरपराधी नागरिकांची हत्या झाली होती. त्यानंतरच्या कारवाईत भारतीय सैन्यदलाने क्षेपणास्त्र हल्ले केले आणि अनेक दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली.

LonarNews / वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज कीनगाव जटुटु शंभर टक्के निकालची परंपरा कायम

ऑपरेशन सिंदूरचे प्रेरणास्थान

पहलगामचा हल्ला हा एका दुर्दैवी घटनेचा भाग होता, ज्यामध्ये महिलांच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले आणि त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या गेल्या. याचा बदला घेण्यासाठी भारताने ही कारवाई केली.

त्याच कारणास्तव, बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील कुर्सेला येथील संतोष मंडल आणि राखी कुमारी यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव ‘सिंदुरी’ ठेवले आहे. ही मुलगी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दिवशी जन्मली होती.

देशभक्तीची प्रेरणा

संतोष मंडल आणि राखी कुमारी यांनी त्यांच्या मुलीला सैन्यातील अधिकारी बनवण्याचे स्वप्न सांगितले आहे.

operation sindoor: ही कारवाई भारताच्या सैन्य शक्तीचा पुरावा आहे आणि त्याच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘सिंदुरी’ ठेवले आहे. या दांपत्याला भारताच्या या कारवाईचा अभिमान आहे आणि त्यामुळे त्यांना देशसेवेसाठी प्रेरणा मिळाली आहे.

LonarNews / वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज कीनगाव जटुटु शंभर टक्के निकालची परंपरा कायम

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

LonarNews:वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज किनगाव जट्टू या महाविद्यालयाचे यावर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली त्यात प्रथमच यावर्षी मुलांनी सरशी झाल्याने विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी परीक्षा कॉपीमुक्त व सीसीटीव्हीच्या निग्रणीत पार पडल्या गेली सदर काळात परीक्षा शांततेत पार पडल्यामुळे या शाळेची शंभर टक्के उज्वल निकालाची परंपरा कायम राहिली यावर्षी एकूण 87 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात 06 प्राविण्यश्रेणीत व 60 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व इतर विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले.

Ajitpawar / शेतकरी मेळाव्यातून लाडकी बहीण आणि कर्जमाफीवर पवारांचा कट”

यावर्षी विज्ञान शाखेतून श्री उज्वल श्रीधर राठोड यांने 82.83% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला चैतन्य जायभाये यांने 78.67% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि हर्षल वानखेडे यांनी 78.33% गुण मिळवून

LonarNews:तृतीय क्रमांक पटकावला आहे त्यामुळे या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आडे सर, प्रा. नागरे सर, प्रा. सोनुणे सर, प्रा. राठोड सर, प्रा. पवार सर, प्रा. वाघमारे सर, प्रा. वैद्य सर यांच्यासह आई-वडिलांना देत आहेत यावर्षी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक गावकऱ्यांमध्ये होत आहे

Busnews / हिंगणघाट बस आगाराच्या ताफ्यात ५ नवीन बसेस दाखल

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Busnews:हिंगणघाट :- वर्धा परिवहन महामंडळाच्या हिंगणघाट आगाराच्या ताफ्यात आज नवीन ५ अशोक लेल्यांड कंपनीच्या अत्याधुनिक सुविधायुक्त बसेस दाखल झाला.

हिंगणघाट बस स्थानक येथे आज दिनांक ३ मे २०२५ ला सकाळी ११ वाजता हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते नवीन बसेसची फित कापून हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

Ajitpawar / शेतकरी मेळाव्यातून लाडकी बहीण आणि कर्जमाफीवर पवारांचा कट”

यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रवासी आणि वाहक-चालकांच्या समस्येवर तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून समस्या निकाली काढल्या जाईल. तसेच राष्ट्रीय संपत्ती असलेल्या या बसेसची योग्य ती देखभाल करण्याच्या सूचना स्थानिक आमदार समीर कुणावार यांनी आगार व्यवस्थापक यांना दिल्या.

तसेच भविष्यात हिंगणघाट आगाराला बसेसची कमतरता भासू नये व प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये याकरिता आणखी ज्यादा बसेसची मागणी परिवहन मंत्री यांच्याकडे केली असून काही महिन्यांच्या कालावधीत आणखी ५ बसेसची भर टाकण्याची ग्वाही सुद्धा स्थानिक आमदार समीर कुणावार यांनी दिली.

तसेच हिंगणघाट बस स्थानकाचा चेहरामोहरा बदलासाठी करोडो रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून १५ फलाट व देखणे बस स्थानक उभारण्याच्या कार्याचा सुद्धा लवकरच प्रारंभ करणार असे सुद्धा त्यांनी सांगितले.

Busnews:या कार्यक्रमाला प्रतापसिंह राठोड विभाग नियंत्रक, रा.प.वर्धा, भाजपचे नेते किशोर दिघे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, भूषण पिसे, सुभाष कुंटेवार, किरण वैद्य, निलेश ठोंबरे, धनंजय बकाणे, विनोद विटाळे, गजानन राऊत, हेमंत राऊत, शेषराव तुळणकर , रविंद्र लढी,कौसर अंजूम, नलिनी सयाम, धनश्री वरघणे, वैशाली सुरकार,वंदना कामडी रवी रोहणकर,रोशन डागा, अनुकूल कोचर, शरद कोनप्रतीवार, बाळासाहेब इंगोले, भरत राजपूत, मुन्ना त्रिवेदी, स्वप्नील सुरकार,बंटी वाघमारे, रवीला आखाडे , विक्की बारेकर, रोहित बक्षी तसेच हिंगणघाट आगारातील चालक-वाहक, तसेच प्रवासी बांधव उपस्थित होते.

Ajitpawar / शेतकरी मेळाव्यातून लाडकी बहीण आणि कर्जमाफीवर पवारांचा कट”

0

Ajitpawar / कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात शेतकरी मेळाव्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत स्पष्टता केली. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तानुसार हप्ता जमा प्रक्रिया सुरू असून, योजनेअंतर्गत विलंबाबाबत पवारांनी “वेळेवर लाभार्थींना रक्कम मिळेल” अशी धीरधाक सांगितली.

शेतकरी कर्जमाफी आणि पीकविम्यासारख्या इतर मुद्द्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया देताना महायुतीच्या नेतृत्वातील भूमिका पुन्हा उठवली.

Policenews / घरफोडीचा अट्टल गुन्हेगार अटकेत; ₹9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त – शेगाव शहर पोलिसांची यशस्वी कारवाई

हप्ता तारीख: एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहुर्ताचा उल्लेख, परंतु अद्याप बँक खात्यात रक्कम जमा नाही.

अजित पवारांचे स्पष्टीकरण: “योजनेबाबत नियोजन सुरू आहे. वेळेवर पैसे दिले जातील. शेतकरी मुद्दे कर्जमाफीवर “मी कोणतेही आश्वासन दिले नाही” असे पवारांनी प्रतिप्रश्न टाकले तर पीकविम्याबाबत कॅबिनेट चर्चेचा उल्लेख केला.

चंदगडमधील विधानसभा जागा गमावण्याची “खंत” व्यक्त करताना त्यांनी महायुतीच्या इतर विजयांवर भर दिला.

<span;>> लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही गडबड नाही. प्रक्रिया नियंत्रणात आहे.”अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

Ajitpawar :महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या या योजनेत सध्या १,५०० रुपये/महिना लाभ दिला जात असला तरी, निवडणूक प्रचारादरम्यान २,१०० रुपये देण्याचे आश्वासनही होते. अद्याप या वाढीव रकमेवर निर्णय बाकी आहे.

Policenews / घरफोडीचा अट्टल गुन्हेगार अटकेत; ₹9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त – शेगाव शहर पोलिसांची यशस्वी कारवाई

0

 

इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा

Policenews:शेगाव (जि. बुलढाणा), दि. 2 मे 2025:
शेगाव शहर पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणात अट्टल गुन्हेगाराला अटक करून सुमारे ₹9,86,250/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून टाटा टिगोर गाडी, घरफोडीचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दि. 28 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता शेगाव येथील रहिवासी कमलींग परीहार यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न केल्याची तक्रार शेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपी शेख अहेमद शेख समद (वय 36, रा. आरास ले-आऊट, बुलढाणा) व त्याच्या साथीदाराने दुसऱ्या शेजारी देवलाल ढगे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. चोरीनंतर आरोपींनी टाटा टिगोर (MH-48-BH-1205) गाडीने पळ काढला, परंतु गाडी झाडाला आदळल्याने एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

Murdernews/हिंगणघाट येथे दिवसाढवळ्या ६५ वर्षीय इसमाची हत्या

तपासादरम्यान अटक आरोपी शेख अहेमद याने त्याचा फरार साथीदार सैय्यद शकील सैय्यद युसुफ (रा. इकबाल चौक, बुलढाणा) याच्यासह शेगाव परिसरात सात गुन्ह्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

टाटा टिगोर कार (MH-20-EJ-7078)

डुप्लिकेट नंबर प्लेट्स

दोन लोखंडी रॉड

तुटलेली कुलुपे

रोख रक्कम ₹15,000/-

एकूण मुद्देमाल किंमत – ₹9,86,250/-

या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे, अपर अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल जाधव, पोलीस हवालदार गणेश वाकेकर, गजानन वाघमारे, संतोष गवई, निलेश गाडगे, आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Policenews:आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, त्याच्याकडून इतर गुन्ह्यांबाबत चौकशी सुरु आहे. आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Murdernews/हिंगणघाट येथे दिवसाढवळ्या ६५ वर्षीय इसमाची हत्या

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Murdernews:हिंगणघाट,दि.२ एप्रिल.संत तुकडोजी वार्ड उपजिल्हा रूग्णालयामागील परीसरात काल दि.१ मे रोजी एका ६५ वर्षीय इसमाचा चाकूचे वार करीत जागीच खून करण्यात आला.

सायंकाळी ५.३० वाजताचे दरम्यान दिवसाढवळ्या हे हत्याकांड घडले असून यात आरोपीने मृतकावरती जोरदार चाकूहल्ला करीत सपासप वार करून जागीच ठार केले.
वडिलांवर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळताच मृतकाचे मुलाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत पित्याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातून १७ पवित्र स्थळांची माती व जल गौरव रथात समाविष्ट! (Ajitpawar )

परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मृतकाची ओळख संघरक्षित उंदरुजी पाटील (६५) अशी असून मृतक संत तुकडोजी वार्ड येथील तथागतनगर येथील रहिवासी आहे तर आरोपीसुद्धा याच परिसरातील रहिवासी असून त्याची ओळख वितय अशोक कांबळे (३५) अशी आहे.

आरोपी वितय अशोक कांबळे यांनी मृतक संघर्षित पाटील यांच्यावर चाकूने सपासप वार करून जागीच ठार मारले व आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

मृतक व आरोपी हे दोघे एकमेकांच्या घराशेजारीच रहात असून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यात ४- ५ वर्षापुर्वी नालीचे सांडपाण्यावरून वाद झाला होता. परंतु आरोपीने आता मृतकावरती हा हल्ला का केला याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

Murdernews :आता आरोपीच्या अटकेनंतरच हत्येचे कारण स्पष्ट होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप ताराम करीत आहेत.

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातून १७ पवित्र स्थळांची माती व जल गौरव रथात समाविष्ट! (Ajitpawar )

0

 

Ajitpawar:बुलढाणा, दि. ३० एप्रिल २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांमधून माती व जल संकलन करून गौरव रथात समाविष्ट करण्यात आले.

हा महोत्सव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा. प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि प्रांताध्यक्ष मा.खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून साकार झाला.

Waqf Research Bill/वक्फ संशोधन बील काळा कायद्या विरोधात मुसलीम समाज बांधवांचे आज रात्री बत्ती गुल आंदोलन

जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काझी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या गौरव रथ यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावची माती, बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्य पदस्पर्श असलेले परतूडाचे जल व माती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी गुणवंतीबाईंच्या जन्मस्थळ करवंड येथील माती, तसेच संत चोखामेळा, ताराबाई शिंदे, चक्रधर स्वामी यांच्यासह अनेक संतमहात्म्यांच्या स्थळांतील पवित्र माती व जलाचा समावेश या रथात करण्यात आला.

या पवित्र स्थळांमध्ये शेगाव, पातुडा जळगाव मैलगड, करवंड, अमडापूर, बुलढाणा, सैलानीबाबा दर्गा, जाळीचा देव, मढ, चिखली, मेहूणाराजा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार व सिंदखेडराजा येथील माती व जलाचा समावेश होता.

Ajitpawar:गौरव रथाचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत झाले आणि या यात्रेने जिल्ह्याच्या संस्कृती, इतिहास व श्रद्धास्थानांचे महत्व अधोरेखित केले. “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” हा उपक्रम आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

Waqf Research Bill/वक्फ संशोधन बील काळा कायद्या विरोधात मुसलीम समाज बांधवांचे आज रात्री बत्ती गुल आंदोलन

0

 

Waqf Research Bill:संग्रामपुर [ प्रतिनिधी ] संपुर्ण भारत भर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड यांच्या आव्हाला प्रतिसाद देते वक्त संशोधन अधिनियम २०२५ च्या विरुद्ध बतती गुल आंदोलन या शांती पुर्ण विरोध आंदोलनात सहभाग घेण्याचा निर्णण घेतला

असुन त्यांचाच एक भाग म्हणुन मुसलीम पर्सनल लॉ बोर्डचे विदर्भ सचिव मौलवी महेमुद बेग यांच्या अध्यक्षतेखाली तर मौलवी सैय्यद अफसर , मौलवी शेख अनिस मौलवी शेख अफसर , मौलवी शेख ईरफान , मुफ्ती अ रहेमान, मदर्सा , जामा मस्जिद चे सचिव ईरफानोद्दीन काझी आदि मान्यवरांच्या उपस्थितीत जियाउल उलुमच्या सभागृहात बतती गुल आंदोलन संदर्भात नियोजीत बैठक संपन्न झाली.

यावेळी मुसलीम समुदायातील सर्व विविध धार्मिक संघटना तसेच सामाजीक संघटनानी केंन्द्र शासन प्रशासन सत्ताधारी यांचे लक्ष वेधण्यासाठी संपुर्ण तालुक्यात आज दि ३० एप्रिल रोजी रात्री ९ ते ९ :१५ फक्त १५ मिनीट बतती गुल आंदोलनात सहभागी होऊन आपले प्रतिष्ठाने दुकान घर येथील लाईट बंद करुन बतती गुल आंदोलन करणार आहेत बतती गुल आंदोलन दरम्यान वक्फ विधेयक रद्द करा अश्या गगणभेदी घोषणा देत काळा कायद्या रद्दची मागणी केली जाणार.

Bhendwal Ghatmandni / भेंडवळच्या घटमांडणीने लक्ष वेधले: युद्ध, पाऊस आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज.

यावेळी मौलवी महेमुद बेग यांनी वक्फ संशोधन काळ्या कायद्या मार्गदर्शन करतांना सांगितले कि भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देते प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म पाळण्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे हा हक्क सार्वजनिक सुव्यवस्था नितिमत्ता व आरोग्य अधिन आहे वक्फ संशोधन विधेयकात ईतर धर्मिय सदस्यांचा समावेश केल्यामुळे मुसलीम समुदायाच्या धार्मिक स्वायत्तेवर परिणाम होऊ शकतो,

तसेच धार्मिक संस्थांना त्यांच्या धार्मिक बाबीचे व्यवस्थापन करण्याचा संपत्तीचा नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देते वक्फ बोर्ड हे मुसलीम धार्मिक संपत्तीचे व्यवस्थापन करतात इतर धार्मिक सदस्यांचा समावेशामुळे या अधिकारात क्षस्तक्षेप हे विधेयक मुसलीम समुदायांच्या धार्मिक स्वायत्ततेवर अंकुश ठेवण्याचा प्रकार तसेच संविधान कलम २९ सांस्कृतिक शैक्षणीक हक्काचे संरक्षण अल्पसंख्याकांना त्यांची संस्कृती जपण्याचा अधिकार देतो वक्फ संपत्ती हि मुसलीम समुदायांच्या सांस्कृतीक व धार्मिक ओळखीचा भाग या मधील बदल काहिना या हक्कावर परिणाम करणारे आहे.

शैक्षणीक संस्था स्थापना व व्यवस्थापन करण्याचा अधिकार देते शैक्षणीक संस्था वक्फ आहेत त्यांच्यावर वक्फ संशोधन काळ्या कायद्यामुळे दुरगामी परिणाम होऊ शकतात उदा . हिंदु मंदिर ट्रस्ट मध्ये गैर सदस्यांना समाविष्ट करण्याची सक्ती नाही मंग वक्फ बोर्डावरच असे का धार्मिक स्वायत्ततेवर परिणाम होतो सदर काळा कायदा संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न असुन केन्द्र शासनाने शेतकरी विरुद्ध काळा कायदा वापस घेऊन त्याच प्रमाणे वक्फ संशोधन विधेयक वापस घ्यावे जो पर्यत केन्द्र शासन सदर विधेयक परत घेत नाही.

Waqf Research Bill:अथवा रद्द करून वक्फ बोर्डचे अधिकार पुर्वरत बहाल करित नाही तो पर्यत शासन विरुध्द ऑल इंडिया मुसलीम पर्सनल लॉ बोर्डचे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी घोषणा वजा ईशारा मुसलीम पर्सनल लॉ बोर्डचे विदर्भ सचिव मौलवी महेमुद बेग यांनी शासनाला दिला यावेळी मौलवी शेख अनिस , शेख अफसर , ईरफानोद्दीन काझी यांचे मार्गदर्शपर समायोचित भाषणे झालीत यावेळी छोटे खानी कार्यक्रमाचे संचालन मुफ्ती शोहेब यांनी केले तर आभार मदर्सा जियाउल उलुम अध्यक्ष मौलवी सैय्यद अफसर यांनी केले

Bhendwal Ghatmandni / भेंडवळच्या घटमांडणीने लक्ष वेधले: युद्ध, पाऊस आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज.

0

 

Bhendwal Ghatmandni / बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीजवळ वसलेल्या भेंडवळ या गावात ३७० वर्षांहून अधिक जुनी घटमांडणीची परंपरा चालते. या परंपरेने आजही त्याचे संस्कृतिक महत्व टिकवून ठेवले आहे.

अक्षय्य तृतीया च्या दिवशी होणारी ही घटमांडणी देशाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती आणि पीक-पाण्याच्या अंदाजांबाबत भाकीत वर्तवित असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याकडे मोठे लक्ष लागले आहे.(bhendwalbhavishyvani )

Brekingnews/ शेगावमध्ये घरफोडीचा प्रयत्न; एक आरोपी ओळख पटलेला, दुसरा अद्याप फरार

भेंडवळच्या या प्राचीन परंपरेच्या पलीकडे देशातील राजकीय तणावाचे वातावरण आणि जगभरातील बदलांचे परिणाम शेतकऱ्यांच्या मनातील उत्सुकतेला आणखी वाढ देत आहेत.

भेंडवळचे भाकीत हे पारंपारिक पद्धतीने घडते आणि त्यात कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी, या परंपरेच्या पलीकडे शेतकऱ्यांचा विश्वास टिकून आहे.Buldhana bhendwal ghatmandani

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अशी भाकिते निव्वळ ठोकताळे असल्याचे म्हणते, तरीही भेंडवळ घटमांडणीला शेतकऱ्यांचा दृढ विश्वास आहे.

Buldhana bhendwal ghatmandani:या वर्षी ही मांडणी अक्षय्य तृतीया च्या दिवशी होणार असून, भविष्यातील युद्धाच्या शक्यतेच्या अंदाजावरही सर्वांचे डोळे ठाकलेले आहेत. सायंकाळी 5:30 वाजता ही घट मांडणी होणार असून, उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी त्याचे भाकीत जाहीर केले जाणार आहे.

भेंडवळची परंपरा: ३७० वर्षांहून अधिक जुनी.
भविष्यवाणी: पीक-पाण्याची स्थिती, राजकीय, आर्थिक परिस्थितीचा अंदाज प्रेक्षकांचा उत्सव देशभरातील शेतकऱ्यांचे, राजकीय नेत्यांचे लक्ष.

आजची घटमांडणी: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडणार.

 

Buldhana bhendwal ghatmandani:या पारंपरिक घटमांडणीच्या पलीकडे तिच्या भविष्यवाणींबाबत वादावादी चालत असला तरी, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परंपरा आजही महत्वाची आहे. ३५० वर्षांहून अधिक काळापासून चंद्रभान महाराजांच्या वारसाने ही परंपरा टिकवली आहे

Yavalnews / परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कोरपावली येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाटप…

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

Yavalnews:तालुक्यातील कोरपावली येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे अवचित्य साधून कोरपावली सरपंच विलास नारायण अडकमोल व गोविंद बहुउद्देशीय संस्था, कोरपावली चे अध्यक्ष श्री. नारायण हिरामण अडकमोल यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांना स्पर्धा परीक्षा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी पुस्तके वाटप करण्यात आली.

सर्वात आधी पुलवामा मध्ये शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

Brekingnews/ शेगावमध्ये घरफोडीचा प्रयत्न; एक आरोपी ओळख पटलेला, दुसरा अद्याप फरार

यावेळी खानदेश आयकॉन पुरस्कृत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश भाऊ फेगडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष देविदास तायडे, उपाध्यक्ष दीपक अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य आरिफ तडवी, जुम्मा तडवी सत्तार तडवी ,अमोल नेहेते ,अफरोज पटेल ,दीपक नेहेते, भीमराव इंधाटे ,

बादल अडकमोल, मनोज अडकमोल, समाधान अडकमोल, विनोद अडकमोल, प्रवीण अडकमोल, भरत चौधरी, दीपक तायडे, सागर तायडे, सचिन भालेराव आदी समाज बांधव तसेच सर्व महिलावर्ग सहभागी होता.

Yavalnews:तरी त्यांच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक वाटप च्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.