Pahalgam:हिंगणघाट – दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरण व्हॅली येथे झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा हिंगणघाट मुस्लिम समाजाकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे. समाजाचे प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यामार्फत भारत सरकारला निवेदन पाठवून ही घटना अमानवी आणि भ्याड असल्याचे स्पष्ट केले.
हिंगणघाट मुस्लिम समाजाने या घटनेचा तीव्र निषेध करताना म्हटले आहे की, देशाच्या ऐक्य, शांतता आणि सौहार्दाच्या विरोधात घडवून आणलेली ही क्रूर घटना संपूर्ण मानवतेला लज्जास्पद आहे. या हल्ल्यात अतिरेक्यांनी धर्म विचारून लोकांची हत्या केल्याचे समोर आले असून, अशा प्रकारच्या हिंसेला इस्लाम धर्म कधीच मान्यता देत नाही. इस्लाम आणि हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिकवणीनुसार मानवतेचे रक्षण करणे, दया, करुणा आणि शांततेचा प्रचार करणे हाच खरा धर्म आहे.
कुरआनमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, “ज्याने एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला, त्याने संपूर्ण मानवजातीचा जीव घेतला, आणि ज्याने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला, त्याने संपूर्ण मानवजातीचा जीव वाचवला.” त्यामुळे अशा हिंसक कृत्यांना इस्लामशी जोडणे हे पूर्णतः चुकीचे आहे.
हिंगणघाट मुस्लिम समाजाने सरकारकडे मागणी केली आहे की, या हल्ल्याची उच्चस्तरीय व पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाहीत. अतिरेकी संघटनांच्या मुळावर घाव घालून देशातील नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली जावी, अशी देखील मागणी करण्यात आली.
Pahalgam:या अमानवी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना समाजाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्यांच्या परिवारांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली आहे. जखमींच्या त्वरित बरे होण्याची प्रार्थना करण्यात आली आहे. हिंसा कोणत्याही धर्माचा भाग नाही. हिंगणघाट मुस्लिम समाज नेहमी शांतता, ऐक्य आणि मानवतेच्या बाजूने उभा राहणार आहे.
समुद्रपूर :- दि. २४ एप्रिल २०२५ रोज गुरुवारला शिव सेना( उध्दव बा ठाकरे) पक्षाच्या वतीने उप जिल्हा प्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत वन विभाग कार्यालय समुद्रपूर येथील अधिकारी धनविज यांना निवेदना द्ववारा समुद्रपूर जोन मध्ये येत असल्या गोविंदपूर च्या लागून असलेले भानापूर येथील वन विभागाच्या जागेवर काही लोकांनी बळजबरीने कब्जा करून शेत तयार करून पेरणीसाठी तयारी केली आहे.
काही लोकांनी तर वन विभागाची जमीन स्वतःच्या ताब्यात घेऊन मकत्यांने दिले असल्याचे दिसून आले. वन विभाग असल्या लोकांवर कार्यवाही करत नसल्याने त्यांची हिम्मत वाढली आहे. त्या भागातील शेतकरी अतिशय त्रासून आहे.
जर वन विभागाने हे जमीन आपल्या ताब्यात घेतले नाही तर भविष्यात अतिक्रमण करणार व पुढे मालकी हक्क मिळवून घेण्याचे प्रयत्न करतील. वन विभागाच्या वन परीक्षेत्र अधिकारी गावंडे तसेच सहायक वनसंरक्षक अधिकारी पवार यांच्याशी फोन वर चर्चा केल्यावर अधिकाऱ्यांनी वरील विषयावर तातडीने कार्यवाई करू म्हणून आश्वासन दिले. जर वन विभागाने या ठिकाणी सत्ताधारी लोकांच्या दबावात येऊन कार्यवाही करण्यास दिरंगाई केली तर गावातील लोकांना घेऊन शिव सेना आंदोलन करण्याचा इशारा दिला.
Hingnghat :भविष्यात होणाऱ्या परिणामाला वन विभाग दोषी राहील असे निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले. निवेदन देतांना उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगर सेवक मनीष देवडे, उप शहर प्रमुख अनंता गलांडे, युवा सेनेचे चे तालुका संघटक पंकज लाटकर, शेतकरी सेल चे प्रमुख शितल चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
Shegaonnews:दिनांक 25 एप्रिल रोजी स्थानिक तहसील कार्यालय येथे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हिंदू पर्यटकांच्या हत्या व त्याला पाठबळ असणाऱ्या पाकिस्तान याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल शेगाव शहर यांच्या नेतृत्वात निदर्शने व मृत पावलेल्यांना निरपराध हिंदू बांधवांना श्रद्धांजली व तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले,
आणि कट्टर इस्लामिक मानसिकता असणाऱ्या जिहादी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना यांच्यावर कठोर कारवाई करून केंद्र सरकारने न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली ,आज त्या घटनेवर संपूर्ण देशामध्ये रोष आहे व हा हल्ला देशाच्या एकात्मता आणि अखंडतेवर हल्ला आहे.
या घटनेचा सर्वांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन निषेध केला पाहिजे ,व सरकारने आपली जबाबदारी समजून यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी नगर संघ चालक श्याम सुंदर तेल्हारकर ,विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष मनीष नारनोलिया, प्रखंड उपाध्यक्ष सुनील जंजाळ प्रखंड मंत्री सोमेश कांबळे, नगर संयोजक अतुल ठोंबरे, नगर सहसंयोजक अभिषेक कनोजे, नगर मंत्री अक्षय जोशी , सुरज हिवराळे, हरिओम तिव्हाने , सिद्धेश्वर डिवरे, माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल ,भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन ढमाळ,
Shegaonnews:राजेश अग्रवाल ,जयेश गाडोदिया सतीश मुरारका, पवन धनुका, विजय राठी, सुनील भरतीया, पवन महाराज शर्मा, मुकिंदा खेडकर, दीपक शर्मा, आशिष पांडे , अशोक चांडक ,राजेंद्र ढोले, प्रकाश गोयंका ,शुभम भुसारी, डॉक्टर मोहन बानोले, अरुण चांडक, नंदू पाटील, दीपक ढमाळ, प्रकाश रावलानी, भरत पालडीवाल, अंजली जोशी ,प्रीती तिवारी, किरण शर्मा ,चेतना खेते ,संगीता आखरे, यासह असंख्य हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते उपस्थित होते..
Brekingnews:आर्णी :- यवतमाळ जिल्हातील आर्णी तहसील कार्यालयात संदीप हा शेती सबंधित कागदपत्रे काडासाठी गेला होता त्याने अर्ज अभिलेखागार विभागात दिला. तेथील अधिकारी याने आजच प्रमाणित प्रत पाहिजे असल्यास 1000 रुपयाची मागणी केली. संदीपने 1975 चा 7/12,फेरफार पंजी पाहिजे 3 दिवसानी पाहिजे असल्यास किती रुपये लागतील ?
कर्मचारी याने प्रती वर्ष 10 रुपये या प्रमाणे सांगितले आम्ही 3 दिवसांनी सांगू इतकेच नाहीतर तुम्ही आले आणी साहेबांची सही झाली नाही तर पुन्हा परत जा लागेल शेवटी विचार करून संदिपने एक हजार रुपये अधिकारी याला दिले त्यांनी दोन तासांनी बोलावले मला प्रमाणित प्रत दिली मी पावती मागितली तर अगोदर देण्यासाठी नकार दिला परंतु न्यायालयीन कामासाठी आवश्यक आहे.त्यामुळे 150 रुपयाची पावती दिली.
संदिपने तहसीलदार यांना अधिकारी विरोधात लेखी तक्रार अर्ज दिला आज पर्यन्त तहसीलदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही तर याच विभागात माहिती अधिकारातून दी. 3/12/2024 ते 31/12/2024 पर्यंत कार्यालयीन आवक जावक अर्ज नोंद असलेल्या रजिस्टर बुकाची प्रत मागितली असता फक्त जावक नोंदी असलेली नोंदीची प्रत दिली आवक नोदी असलेली माहिती देण्यात आली नसल्याने तहसीलदार यांना प्रथम अपील अर्ज केला असता सुनावणी तहसीलदार यांच्या समोर दी. 23 /04/2025 ला घेण्यात आली उपस्थित सबंधित विभाग अधिकारी याने आवक नोदी नाही.
फक्त जावक नोंदी आहे सांगितले तसेच तहसीलदार यांना दिलेली जावक माहिती सुद्धा ही कार्यालयीन बुकातील नाही दाखवली तहसीलदार यांनी तुम्ही आयुक्त कडे अपील करू शकता असे सांगितले आज अधिकारी यांना तक्रार करून पुरावे देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही अधिकारी करत नाही तर लक्ष्मी दर्शन दिल्यावरच या विभागात काम होते आज अधिकारी यांना मोठया प्रमाणात पगार मिळत असुन सुद्धा भ्रष्टाचार करून अधिकारी / कर्मचारी महिन्याला लाखों रुपये गैर मार्गाने भ्रष्टाचार करून कमाई करतात इतकेच नाहीतर मोठया प्रमाणात सरकारी महसूल हिशोबात सुद्धा गडबड करण्यात आले आहे.
Brekingnews :या विभागाचे वार्षिक व्यवहार ( ऑडिट )करणाऱ्या अधिकारी याच्यावर प्रश्न निर्माण होतो चौकशी झाल्यास महाराष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार दिसेल यावरून संपूर्ण तहसील मध्ये भ्रष्टाचार किती असेल? तक्रार करून सुद्धा याची दखल घेण्यात येत नाही उलट सहमती असल्यामुळे तक्रारी, पुरावे असुन सुद्धा अधिकारी करतात दुर्लक्ष
Policenews:शेगाव – दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान शेगाव शहरातील डम्पिंग ग्राउंड येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत पाच आरोपींना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोउपनि. कुणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत खालील आरोपींना अटक करण्यात आली:1. पंकज सुभाषराव पाटील (वय 42, रा. जळका भडंग, ता. खामगाव)2. आकाश सुभाष भारसाकळे (वय 31, रा. एकलारा बानोदा,
Policenews:21,000 रु.), तसेच दोन मोटारसायकली (किंमत अंदाजे 1,40,000 रु.) असा एकूण 1,71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदर प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 230/2025, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेका. संतोष गवई यांच्याकडे देण्यात आला आहे.
Pahalgam Terror Attack /:हिंगणघाट :- दि.२३/४/२०२५ला कारंजा चौक हिंगणघाट येथे मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख राज दिक्षित तसेच निरीक्षक संदिप बर्डे व
जिल्हाप्रमुख गणेश ईखार,शुभांगी ठमेकर यांच्या सहमतीने राजु हिंगमिरे जिल्हासंघटक यांच्या नेतृत्वात जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देत निषेध करण्यात आला.
या हल्ल्यामधील निष्पाप मृत आत्म्यास शांती मिळावी म्हणून मेणबत्त्या लावून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली… त्याप्रसंगी शिवसेना पक्षाचे श्री.राजू हिंगमिरे जिल्हासंघटक, अमित गावंडे तालुकाप्रमुख हिंगणघाट, सुनिता तांबोळी शहरप्रमुख महिलाआघाडी, गोस्वामी शहर समन्वयक महिला आघाडी,अमित काळे शहरसंघटक, दिनेश काटकर
Pahalgam Terror Attack:उपजिल्हाप्रमुख युवासेना, प्रविण वैरागडे तालुका प्रमुख वाहतूकसेना, राहुल फुलझेले उपशहरप्रमुख,सतिश तांबोळी विभागप्रमुख,घुंगरुड,कुलभूषण वासनिक,अमोल देशपांडे,कार्तिक दाते,ओम बावणे,विक्की धात्रक,गुगलानी,डोकेजी,चैतन्य नारायणे,अनिकेत लायसटवार व समस्त शिवसैनिक व शहरांतील नागरीक उपस्थित होते.
Pahalgam Terror Attack:काश्मीरमधील पर्यटकांच्या आवडत्या पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्याच्या सायंकाळी, बुलढाणा जिल्ह्यातील एका कुटुंबाला जीवदान मिळाले.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये सुरू झालेल्या गोळीबारात अनेकांच्या प्राणांचा बळी गेला, पण बुलढाण्यातील पाच जण एका हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे वाचले. या घटनेत तीन पुरुष आणि दोन महिला असलेले जैन कुटुंब सुरक्षित राहत हॉटेलमध्ये आश्रय घेतले.
हॉटेलमालकाने त्यांना गोळीबार सुरू असताना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे त्यांचे प्राणी वाचले.
२८ लोकांच्या मृत्यूने झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात, बुलढाण्याचा हा जैन कुटुंबाचा जीव वाचल्याची माहिती आली आहे.
हे कुटुंब १८ एप्रिल रोजी मुंबईहून जम्मू काश्मीर भेटीस गेले होते.
सोमवारचा दिवस (२२ एप्रिल) सकाळी हॉटेलमालकाने अचानक फायरिंग सुरू झाल्याच्या धोक्याबाबत कुटुंबाला सावध केले.
कुटुंबातील सदस्य हे हॉटेलच्या आतच सुरक्षित होते, ज्यामुळे ते बचावले.
या कुटुंबात जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचा भाऊ, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचा समावेश आहे.
हल्ल्याच्या वेळेस त्यांचा जीव वाचवण्याकरिता हॉटेलमालकाचा मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचा ठरला.
पाहलगाममधील हल्ल्याचा संक्षिप्त आढावा:
काश्मीरच्या पहलगाम येथील हा दहशतवादी हल्ला मंगळवारी दुपारी झाला, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा देखील समावेश आहे.
सुरक्षा दलांनी त्वरित परिस्थिती हाताळली असून, भारतीय सैन्य, CRPF व स्थानिक पोलिसांनी मोठा मोर्चा काढला आहे. या हल्ल्यामुळे जागतिक नेत्यांनीही भारतासोबत एकजुटीची भावना व्यक्त केली आहे.
बुलढाण्यातील जैन कुटुंबाचे तपशील:
नावे: निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ. श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन
कुटुंब मुंबईहून काश्मीरला गेले होते, आणि जम्मू काश्मीरमधील विविध ठिकाणी फिरून २१ तारखेला पहलगाममध्ये आले.
२२ एप्रिल सकाळी हॉटेलमधून बाहेर पडण्याचा विचार असताना, हॉटेलमालकाने गोळीबार चालू असल्याचे सांगून बाहेर न जाण्याचा सल्ला दिला.
Pahalgam Terror Attack:या प्रकारातील मदतीने दहशतवादी हल्ल्यातून अनेकांचे प्राण वाचवले जात आहेत, तर इतर ठिकाणी सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
बुलढाणा: जिल्ह्यातील बोंडगाव व इतर काही गावांमध्ये वाढत असलेल्या केस व नख गळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने आज शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे भेट दिली.
त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आवश्यक नमुने संकलित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते उपस्थित होते.
या पथकात ICMR, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे त्वचारोग तज्ज्ञ, FSSAI, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र (हरियाणा), प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ यांचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव व नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले असून, गावोगावी जाऊन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेत आहे.
Nail loss Case:ही कारवाई आजाराच्या स्रोताचा शोध घेऊन योग्य उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्चित करण्यात महत्त्वाची ठरणार आहे.
Wardhanews:वर्धा :- दि. 22 :भारतीय हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यात दि. 23 व 24 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट व दि.15 एप्रिल पासुन तापमानामध्ये बरीच वाढ होऊन तापमान 40 अंश सेल्सअस पेक्षा जास्त नोंदविल्या गेले आहे. उष्मालाटेमुळे संवेदनशीलगट यामध्ये कामगार, शेतकरी, रस्त्यावरील विक्रेते, वयोवृध्द, बालके, स्त्रिया इत्यादीवर प्रतिकुल परिणाम होऊन त्यांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात नागरिकांनी व संबंधीत यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
काय करावे सर्वांसाठी अत्यावश्यकः- तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या, अपस्मार, हृदयरोग, मुत्रपिंड, यकृतविषयक आजारामुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो. त्यांनी डॉक्टराच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे, ओआरएस (ORS) म्हणजेच तोंडाने घ्यावयाचे शरीरातील पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक. नारळाचे पाणी घ्या.
हलक्या रंगाचे वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा, घराबाहेर असाल तर डोके झाका एखादे कापड वापरा, टोपी घाला, दुपट्टा किंवा छत्री वापरा डोळ्याच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीन वापरा. अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तीची विशेष काळजी घ्या. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपाचा वापर करावा.
उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही किंवा माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती शक्यतो पांढरे कपडे वापरावेत नोकरदार व कामगारांसाठी :- कामाच्या जागी पिण्याचे थंड पाणी पुरवा. सर्व कामगारांसाठी विश्रांतीसाठी सावलीची जागा, स्वच्छ पाणी, ताक, प्रथमोपचार पेटी, आईस पंक आणि ओआरएसही ठेवा. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात यायचे टाळावे. कामाची आखणी अशी करा की, ताणाच्या श्रमाच्या कामांसाठी दिवसातला तुलनेने कमी वेळ निवडला जाईल. उघड्यावर काम करणाऱ्यांना विश्रांतीच्या वेळा अधिक ठेवा आणि कालावधीही वाढवा अतिउष्णतेच्या क्षेत्रात नव्याने काम करत असलेल्या कामगारांना हलके काम द्या.
कामाचे तास कमी ठेवा. गरोदर महिला आणि आजार असलेल्या व्यक्तीकडे अधिक लक्ष द्या.इमारत अथवा घरे थंड ठेवण्यासाठी :- सूर्यप्रकाश परावर्तित करणारा पांढरा रंग वापरा, छत थंड ठेवणारं तंत्रज्ञान, हवेशीर, हलके, थर्माकोलचे आवरण वापर ज्याद्वारे कमी किमतीत थंडपणा राखता येईल. उष्णता बाहेरून आत येण्याऐवजी ती बाहेरच फेकली जावी, यासाठी तात्पुरते अल्युमिनियम आच्छादित पट्ट्यांसारखे परावर्तक खिडक्यांवर बसवा अथवा ग्रीन नेट चा वापर करा. घर थंड ठेवा, गडद रंगाचे पडदे वापरा रात्री काळ्या काचा, उन्हापासून बचावाची सोय असलेली छते, खुल्या खिडक्या असू द्या शक्यतो सर्वात खालच्या मजल्यावरच राहा. हरित छप्पर, हरित भिती, घरांतर्गत वनस्पती इमारत नैसर्गिकरीत्या थंड बनवून उष्णता कमी करतात.
वातानुकूलन यंत्राचे तापमान २४ सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा. यातून विजेचे बिलही कमी येईल आणि आरोग्यही चांगले राहील.पशुधनासाठी :-पशुधन सावलीच्या छताखाली ठेवा आणि त्यांना भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या. त्यांच्याकडून सकाळी 11 ते दुपारी 4 काम करून घेऊ नका.
प्राण्याच्या आस-याच्या ठिकाणी छतावर स्ट्रॉच्या नळ्यांनी आच्छादन करा, त्याला पांढरा रंग द्या किंवा शेणाच्या प्लास्टरद्वारे तापमान कमी करा. पशुधनाच्या शेडमध्ये पखे, पाण्याचे फवारे करणारे यंत्र वापरा. अतिउष्णतेच्या वेळी पाण्याचे फवारे मारा आणि प्राण्यांना जवळच्या पाण्याच्या स्रोतावर थंड करण्यासाठी घेऊन जा. त्यांना हिरवे गवत, प्रोटीन फॅटला फाटा देणारा पूरक आहार द्या, मिनरल्सचे मिश्रण आणि मीठ द्या. तुलनेने थंड हवेत त्याना चरू द्या.
काय टाळावे:-उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी 12 ते 03 मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळा.
दारे खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील हे बघा. अल्कोहोल म्हणजे दारू, चहा, कॉफी, शीतपेये टाळा त्यातून शरीरातले पाणी कमी होते. उच्च प्रथिनयुक्त मिठाचं प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका.
शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. चमकणारे दिवे किंवा बल्ब्ज वापरू नका, त्यातून अनावश्यक उष्णता निर्माण होते. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
Wardhanews / आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची काळजी घ्यावी व प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव श्रीपती मोरे यांनी केले आहे.
Policenews:शेगाव येथील एका रेडीमेड कापड दुकान चालवणाऱ्या तरुणावर तीन जणांनी हॉटेलमध्ये जेवण करत असताना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहित चंद्रकांत पातुरकर (वय 26, रा. शंकर राजेश्वर कॉलनी, शेगाव) हे ‘आयकॉनिक रेडिमेड’ नावाचे कपड्यांचे दुकान चालवतात. दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी आरोपी हरीश पारखेडे यांनी त्यांच्या दुकानात येऊन एक पँट बदलण्याची मागणी केली होती. मात्र, पँट फाटलेली असल्याने फिर्यादीने परत घेण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने संताप व्यक्त केला.
दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजता, फिर्यादी रोहित पातुरकर हे गौरव झाडोकार व ओम नांदोवार यांच्यासोबत आठवण हॉटेलमध्ये जेवत असताना, आरोपी हरीश पारखेडे, राम चव्हाण, निखिल पारखेडे व एक अनोळखी इसम हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली.
Policenews:घटनेनंतर फिर्यादी यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तोंडी रिपोर्ट दिला. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी भारतीय नवीन फौजदारी संहिता (BNS) कलम 118(1), 296, 3(5), 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचा तपास पो. कॉ. करुटले यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.