Home Blog Page 380

थरारक दुहेरी हत्याकांडाने “गाव” हादरल, बापाचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला “राक्षस”

0

 

SURYA MARATHI NEWS

 

सांगली (Sangli) जिल्ह्याच्या कडेगाव या तालुक्यातील विहापूर येथे शुक्रवारी दुहेरी हत्याकांडाची (Double murder) ही घटना घडली आहे. व बापाला झालेल्या मारहाणीचा कसा बदला घेण्यासाठी एका तरुणाने आपल्या एका मित्राच्या मदतीने चार जणांना पहिले तर बेदम मारहाण (son beat 4 people with the help of friend) केली आहे.
व त्या नंतर आरोपींनी लाथा बुक्क्या, काठी, ऊस अशा मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण करत चार युवकांना अक्षरश: रक्तबंबाळ केलं आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की, यामध्ये एकाचा तर जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. या दुहेरी हत्याकांडाच्या या थरारक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

व या घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुख्य संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथीदार विशाल तानाजी चव्हाण हा आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहापूर येथील रहिवासी असणारे गणेश कोळी, गोरख कावरे आणि विजय माने यांनी गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास किरकोळ कारणावरुन या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. आपल्या वडिलांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुख्य आरोपी मधुकर मोरे याला संताप अनावर झाला.

आधी सुसाइड नोट लिहून घेतली मग दिला भंयकर मृत्यू; महिलेच्या हत्येनं मुंबई हादरली! नेमकं काय घडलं? बापाला मारहाण झाल्याने संतापलेल्या मधुकर मोरे याने आपल्या विशाल चव्हाण नावाच्या मित्राला सोबत घेत चारही आरोपींना मारण्याचा प्लॅन बनवला. शुक्रवारी रात्री आरोपींनी गणेश कोळी, गोरख कावरे आणि विजय माने या तिघांना काठी, दांडके, ऊस अशा मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी संबंधित तिघांचा मित्र असणाऱ्या संदीप चव्हाण नावाच्या तरुणाला घराबाहेर बोलवून त्यालाही अमानुष मारहाण केली आहे.

या भयंकर मारहाणी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने संदीप चव्हाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. झोपेतच पत्नीला संपवलं;काही तासात भयावह अवस्थेत आढळला पती, जळगावातील खळबळजनक घटना तर विजय माने हा गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना माने याचा देखील मृत्यू झाला आहे. दुहेरी हत्याकांडाची घटना घडताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

व जागेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी मधुकर मोरे याला ताबड़तोड़ अटक केली आहे. तर त्याचा साथीदार आरोपी विशाल चव्हाण हा मात्र फरार झाला आहे. व या आरोपी विशाल चव्हाणच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. व या घटनेचा पुढील तपास कडेगाव पोलीस करत आहेत.

Surya mararhi news

प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यात २७ कोटि रु भरपाई मंजूर

0

 

विकी वानखेड़े जळगाव जिल्हा प्रतिनिधि

Surya marathi news

जळगाव : प्रधानमंत्री पीकविमा योजना (Pradhan Mantri Pikavima Yojana) अंतर्गत २०२१- २२ खरीप हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी (Crop) योजना व राबविण्यात आली होती.व याअंतर्गत विमा कंपनीकडून २७ कोटी सात लाख २९ हजारांची भरपाई मंजूर (Fund) झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. आहे व
या योजनेंतर्गत अमळनेर, पारोळा व चोपडा तालुक्यांतील उडीद, मूग आणि अमळनेर तालुक्यासाठी बाजरी-कापूस या पिकांसाठी खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पिकांची अधिसूचना काढून विमा कंपनीला २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेशित केले होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आयसीआयसीआय लोबार्ड (भारती एक्सा) विमा कंपनीकडून एकूण २७०७.२९ लाख रक्कम मंजूर झाले आहेत.

Also Read: चोवीस लाखांचे वीजबिल भरून १३ शेतकरी थकबाकीमुक्त
ही नुकसानभरपाई अमळनेर, पारोळा, चोपडा तालुक्यांतील २० मंडळांमध्ये मूग पिकांसाठी ४४ लाख, तर उडीद पिकाकरिता सहा लाख रुपये, अमळनेर तालुक्यातील आठ मंडळांमध्ये बाजरी पिकासाठी व तीन लाख, तर कापूस पिकाकरिता २७०६.७६ लाख रक्कम मंजूर झाली आहे. व ही रक्कम विमा कंपनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करणार आहे .
Surya marathi news

टीम इंडियाची चिंता वाढली, डोकेदुखी वाढवणारी बातमी आली “समोर”

0

 

SURYA MARATHI NEWS

भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या शर्यतीत ति कायम राहण्यासाठी रविवारी होणारी न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. असे असताना
न्यूझीलंडसाठीही हा सामना कर्रोवा मरो असाच असल्यानं तेही संपूर्ण ताकदीनं मैदानावर उतरतील, व यात काहीच शंकाच नाही. व या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे. व ग्रुप २ मधून पाकिस्ताननं सलग तीन विजय मिळवून उपांत्य फेरीत एक पाऊल पुढे टाकलंच आहे आणि आता केवळ औपचारिकता बाकी आहे. पण, या गटातून दुसऱ्या संघासाठीचा निर्णय हा रविवारच्या लढतीतच होईल. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे.
न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट ( Trent Boult) यानं रविवारच्या लढतीपूर्वी टीम इंडियाला इशारा दिला. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी यानं जो करिष्मा केला, त्यासारखीच कामगिरी करण्याची तयारी बोल्टनं दर्शवली आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. ”आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाविरुद्धची लढत ही रोमांचक होते. भारताविरुद्ध खेळताना आम्ही नेहमी सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असतो आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आम्ही अनेक वर्षांपासून त्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे पुन्हा पराभूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत,”असे बोल्ट म्हणाला.
India vs New Zealand in ICC tournaments

२००३ वन डे वर्ल्ड कप – न्यूझीलंडचा भारतावर ७ विकेट्स राखून विजय

२००७ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप – न्यूझीलंडचा भारतावर १० धावांनी विजय

२०१६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप – न्यूझीलंडचा भारतावर ४७ धावांनी विजय

२०१९ वन डे वर्ल्ड कप उपांत्य फेरी – न्यूझीलंडचा भारतावर १८ धावांनी विजय

२०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल – न्यूझीलंडनं ८ विकेट्सनी टीम इंडियाला नमवले

न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्तील याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. परंतु आज त्यामुळे त्याचे टीम इंडियाविरुद्ध खेळणे निश्चित केले नव्हते. व आज पण, या गुप्तील पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो उद्याच्या लढतीत नक्की खेळेल, असे बोल्टनं यांनी सांगितले आहे.

Surya marathi news

डांभुर्णी येथे स्वयंदिप प्रतिष्ठानच्या ई -श्रम कार्ड नोंदणीची सुरुवात आ .सौ लताताई सोनवणे यांच्या हस्ते उद्धघाटन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील डांभुर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठान आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप तसेच स्वयंदीप प्रतिष्ठान संचालित- सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन मा.आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व उपस्थीत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले..

आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गावातील मुख्य चौकात प्रातिनिधिक स्वरूपात १० लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या ई-श्रम कार्ड नोंदणी साठी शिबीर (कॅम्प) चेही मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करून सेवेचा प्रारंभ डांभुर्णी गावापासून करण्यात आला तसेच पुढे हे शिबिर उंटावद,चिंचोली, डोणगाव ,कोळन्हवी आडगाव -कासारखेडा ह्या पंचकृषितील गावामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाची प्रस्तावना स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव-संदीप पाटील (सोनवणे) यांनी केले व ई-श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच मजूर यांच्यासाठी कसे उपयुक्त आहे याचे उद्दिष्ट काय याबाबतीत स्पष्टीकरण देऊन ग्रामीण भागात असंघटित क्षेत्रात येणाऱ्या मजुरांची विशेषतः ह्या गटात मोडणाऱ्या महिलांची संख्या मोठया प्रमाणात आहे म्हणून ग्रामीण भागात असा उपक्रम जास्त संयुक्तिक ठरतो असे प्रतिपादन केले ..
ह्या कार्यक्रमात नानासाहेब आर.जी पाटील ,कासारखेडा सरपंच भागवत पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राम पवार ,स्वराज्य ग्रुपचे आण्णासाहेब शंभू सोनवणे आणि रामचंद्र चौधरी यांनी मनोगते व्यक्त करून ह्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेछ्या दिल्या व शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच कार्यक्रमात उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे आभार ग्रामपंचयात सदस्य शुभम विसवे यांनी मानले व सूत्र संचालन स्वयंदीप चे संचालक शैलेश शिरसाठ व स्वयंदीप शासकीय योजना माहिती व सहकार्य समितीचे सदस्य देवानंद कोळी यांनी केले .

दरम्यान आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे तसेच नानासाहेब आर.जी पाटील आणि शिवश्री रामदादा पवार यांच्या हस्ते स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव संदीप पाटील (सोनवणे) यांचा देखील सत्कार महिला शक्ती केंद्र (जिल्हा स्तरीय महिला समिती)वर नियुक्ती झाल्याबाबद्दल करण्यात आला..
कार्यक्रम आटोपल्यावर सर्व मान्यवरांनी स्वयंदीप प्रतिष्ठान संचलित अभ्यासिका व ग्रंथालयास भेटी दिल्या व स्वयंदीप ने आज पर्यंत घेतलेल्या विविध सामाजिक व शैक्षणिक प्रकल्पांची माहिती जाणून घेतली..
ह्या कार्यक्रमास शशिकांत पाटील,अनिल साठे,गावच्या सरपंच सौ.कल्पना बाविस्कर, सौ.प्रतिभा बाविस्कर,नानासाहेब विजय पाटील,विकास (गोटू) सोळुंखे, धनंजय कीर्तने,विलास भंगाळे,किरण पाटील ह्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच गावातील ग्रामस्थ ,तलाठी बारेला आप्पा, ग्रामविकास अधिकारी गोसावीभाऊ साहेब ,पत्रकार मनोज नेवे, गिरिश विसवे यांचीही उपस्थीत लाभली ..
ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वयंदीप शासकीय योजना माहिती समितीचे सहकार्य लाभले तसेच कुंदन पुंडलिक कोळी,देवानंद कोळी,उमाकांत पाटील ,प्रदीप कोळी ,व प्रेमचंद भगवान सोनवणे यांची नियोजनात अत्यंत महत्वाची भूमिका होती.

भुसावळ विभागातुन कोरोनाकाळात बंद पडलेल्या पॅसेंजर रेल्वे गाडया पुर्वरत सुरू करण्यात याव्यात: मनसेची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

भुसावळ रेल्वे विभागातुन सुटणाऱ्या ग्रामीण प्रवाशांची लाईफलाईन म्हणुन ओळख असलेली पॅसेंजर रेल्वेगाडया पुनश्च सुरू करण्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भुसावळ विभागाचे प्रबंधक एस एस केडीया यांच्याकडे लिखित निवेदनाव्दारे केली आहे . दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक एस एस केडिया यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,मागील एक वर्षापासुन संपुर्ण देशात कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारी संकटाच्या पार्श्वभुमीवर आपल्या विभागातुन यावेळीस सद्य परिस्थितीला प्रवासांसाठी केवळ विशेष रेल्वेगाडया चालविण्यात येत आहे .आपल्या विभागातुन ग्रामीण जनतेच्या दळण वळणाचे साधन पॅसेंजर रेल्वेगाडया बंद असल्याने कारणाने मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे . पॅसेंजर रेल्वेगाडया बंद असल्याकारणाने चाकरमाने आता एसटीचा आधार घेत असे मात्र आता एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ केली असल्याने ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना रेल्वे शिवाय पर्याय नाही तरी मनमाड , चाळीसगाव , पाचोरा , रावेर , यावल , जामनेर व भुसावळ येथुन जळगावास येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही मोठया प्रमाणावर असुन , कोरोना काळातील बंद केलेली रेल्वे सेवा अनलॉक नंतर हळुवार रेल्वेची सेवा ही पुर्वपदावर येत असुन , रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या कोवीड१९च्या नियमांचे पालन करीत काही विशेष रेल्वेगाडया सुरू करण्यात आले आहेत. मात्र त्याचा फायदा म्हणावा तसा फायदा जिल्हावासीयांना होत नसल्याचे दिसुन येत आहे . यावेळी दिल्ली , बेंगरूळ , कोलकाता , हैदराबादहुन येणाऱ्या सर्व रेल्वेगाडयांचे आरक्षण फुल येत असल्याने जळगावसह जिल्ह्यातील प्रवासांचे तिकीट वेटींगवर असल्याचे दिसुन येत असते , आता देशातील कोरोनाची परिस्थितीत आत सुधारणा झाली असुन , जळगाव जिल्ह्यातील प्रवासांच्या हक्काची नाशिक भुसावळ शटल , पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस , मुंबई भुसावळ पॅसेंजर , भुसावळ सुरत या पॅसेंजर रेल्वेगाडया अद्याप ही बंद असुन, दरम्यान दिवाळीचे सन तोंडावर आले असुन , एसटी वाढलेले भाडेवाढ व अवैद्य प्रवासी वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहनधारकांकडुन प्रवासांची संधी साधुन होणारी आर्थिक लुट सर्वसामान्य व गोरगरीब नागरीकांना न परवडणारी आहे . तरी आपल्या विभागातुन सोडण्यात येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्या त्वरीत सुरू कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली असुन , तात्काळ ही सेवा सुरू न केल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा ही देण्यात आला आहे . या निवेदनावर मनसेचे जिल्हा अध्यक्ष अॅड जमील देशपांडे , जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, मनसे भुसावळ शहराध्यक्ष विनोद पाठक , यावल शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , यावल तालुका उपाध्यक्ष शाम पवार ,आबीद कच्छी , भुसावळ शहर उपाध्यक्ष प्रतिक भंगाळे,नेहल कुरकुरे , सौ . उर्वशी गोसावी , अनिल सपकाळे,सतोष जावरे, शुभम गायकवाड , ज्ञानेश पाटील , नुकुल महाजन , योगेश जवरे, गौरव कोळी आदी पदधिकारी यावेळी उपस्थित होते .

विविध विकास कामांचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते

0

 

विकी वानखेड़े यावल प्रतिनिधि

यावल तालुक्यातील विविध विकास कामांचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येत असून भूमिपूजन रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. तरी
उद्या रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून सुमारे १ कोटी १o लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांना प्रारंभ होत आहे. यात मनुदेव देवस्थान येथे भक्त निवास बांधकाम, मनुदेव देवस्थान येथे सिमेंट नाला बांध क्र. १ बांधणे, मनुदेव देवस्थान येथे सिमेंट नाला बांध क्र. २ बांधणे, वाघझिरा सिमेंट नाला बांध क्र.३ बांधणे, चुंचाळे येथे सिमेंट नाला बांध क्र. ३, क्र.४ व क्र. ५ बांधणे या कामांचा समावेश आहे. या कामांचे भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमांना तालुक्यातील शिवसेनेच्या पदधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व कृउबाचे सभापती तुषार पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी केले आहे. तरी यावल तालुक्यातील विविध कामाच्या भूमिपूजन या उपस्तिति आहे .

टायरच्या दुकानाला भीषण “आग”

0

 

SURYA MARATHI NEWS

कोणत्याही जीवित हानि नाही

ठाणे – घोडबंदर रोडवरील या कासारवडवली नाक्यावर असलेल्या माजोज टायर या शॉपला आज शनिवारी सकाळी आग लागली. व हे दुकान तळ अधिक सात मजली कृष्णा ग्रीनलँड पार्कच्या तळ मजल्यावर आहे. व या दुकानाला
सकाळीच दुकान उघडण्यापुर्वीच आतून धूर येण्यास सुरुवात झाली व अचानक आगीने भीषण रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली होती. व यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.व
मनोज गिरी यांच्या मालकीचे CEAT माजोज नामक टायरचे दुकान असून सकाळीच दुकान उघडण्यापुर्वीच दुकानातून धूर येण्यास सुरुवात झाली होती हळूहळू धूर वाढून अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल,महानगर गॅसचे अधिकारी आणि कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी, एक फायर इंजिन, एक-रेस्क्यू वाहन, एक-जम्बो वॉटर टँकर आणि एक-जेसीबी पाचारण केले होते. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात असून दुकानात सकाळीच धूर येत असताना अचानक आगीने भीषण रूप धारण केले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. या आगीत फक्त टायर एकाच दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.
Surya marathi news

स्टेट बँकेवर दरोडा, तिजोरी फोडून 20 लाख पळविले, पोलीस तपास सुरू..

0

 

केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेवर दरोडा टाकल्याची घटना आज सकाळी समोर आली असून दरोडेखोरांनी बँकेच्या तिजोरीतून 20 लाखांची रोकड लंपास केलीये… बँकेचा शिपाई ने बँक उघडल्याव हा प्रकार समोर आला आणि पोलिसांना याची तात्काळ माहिती दिलीय.. यामुळें मात्र बुलडाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय..
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेच्‍या शाखेवर मध्यरात्रीतून दरोडा पडल्याची घटना घडली असून सकाळी शिपाई बँकेत आल्यानंतर बँकेत दरोडा पडल्याची माहिती समोर आलीय… जवळपास २० लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लुटून नेल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.. दरोड्याची माहिती मिळताच बुलडाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले असून, श्वानपथकाद्वारे दरोडेखोरांचा शोध घेन्हात येत आहे… बँकेच्या इमारतीचे खिडकीचे गज वाकवून दरोडेखोर बँकेत शिरले आणि बँकेतील तिजोरी गॅस कटरने कापून रोकड पळविली.. जेव्हा सकाळी शिपाई बँकेत आला तेव्‍हा खिडकीचे गज वाकवले गेल्याचे पाहून त्‍याला चोरीचा संशय आला आणि त्‍याने बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवले… अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आलीय.. तर श्वानाने बँकेच्‍या बाजूच्‍या शेतापर्यंत माग जाऊन तिथे दरोडेखोरांचे हँडग्‍लोज आणि बॅटरी मिळून आली असून सीसीटीव्‍हीत दोन दरोडेखोर कैद झाल्याची शक्‍यता आहे .. तर या घटनेमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय ..

“त्या” हत्याकांडातील “मास्टरमाइंड” आरोपी पोलिसांच्या जाळ्यात,

0

 

SURYA MARATHI NEWS

ऊरूळी कांचन ( ता. हवेली ) येथे झालेल्या संतोष जगताप यांच हत्याकांडातील मुख्य सुत्रधारास पिर फाटा ( ता.शिरूर ) येथे लोणी काळभोर येथील आरोपी पोलीसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. व या आरोपिला न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.व याप्रकरणी उमेश सोपान सोनवणे (रा. राहु, ता. दौंड ) याला अटक करण्यात आली आहे. व यापूर्वी पवन गोरख मिसाळ ( वय २९ ) व महादेव बाळासाहेब आदलिंगे ( वय २६, दोघे रा. उरूळी कांचन ता. हवेली ) यांना अटक करण्यात आली असल्याने याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारांस उरूळी कांचन येथे हॉटेल सोनाईसमोर संतोष संपतराव जगताप ( रा. राहु ता. दौंड ) याचेवर तीन अनोळखी इसमांकडून हल्ला करण्यात आलेल्या गोळीबारात फायरींगमध्ये जगताप हे जागीच मयत झाले होते. व त्यांचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग हे गंभीर जखमी झाले होते. व मग यावेळी जगताप याचे अंगरक्षकाकडून केलेल्या फायरींगमध्ये मारेक-यामधील स्वागत बाप्पू खैरे ( वय २५, रा. दत्तवाडी, ऊरूळी कांचन, ता. हवेली ) हा जागीच ठार झाला होता. व
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पवन मिसाळ व महादेव आदलिंगे यांचेकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्यांनी सदरचा हा गुन्हा आरोपी उमेश सोनवणे याचे सांगणेवरून कट रचून केल्याचे पुर्ण निष्पन्न झाले होते. परंतू सोनवणे हा गुन्हा घडल्यापासूनच फरार होता. व वारंवार आरोपी सोनवणे त्याचा शोध घेणेसाठी वरीष्ठ पोलीस निरीक्ष राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकास आदेश दिले होते.व त्याअनुषंगाने तपास पथक सोनवणे याचा शोध घेत असताना तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना सोनवणे हा गुरुवार २८ ऑक्टोबर रोजी रात्री कानिफनाथ हॉटेल, पिर फाटा, ता. शिरूर येथे येणार असलेबाबत गुप्त माहीती मिळाली. व
त्यानुसार महानोर यांनी मोकाशी यांना कळवून त्यांचे आदेशाप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांचेसमवेत सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. व काही वेळाने थांबले असताना बातमीप्रमाणे उमेश सोनवणे हा हॉटेल नजीक आलेचे निदर्शनास येताच तपास पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.व त्याला गुन्हयात अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी त्याला १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ नम्रता पाटील, हडपसर विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

प्रसिद्ध विधीज्ञ उज्जवल निकम यांची डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट

0

 

हिंगणघाट
सुप्रसिद्ध विधीज्ञ उज्जवल निकम हे एका बहुचर्चीत खटल्यासाठी हिंगणघाट येथे आले असतांना त्यांनी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन शाळा ,कनिष्ठ महाविद्यालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. शालेय उपक्रमांशिवाय पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण , विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम करणे , समाजातील गरीबांना,कष्टकऱ्यांना,शेतमजूरांना मदत करणे इत्यादी शाळा ,कनिष्ठ महाविद्यालय चालवित असलेल्या उपक्रमाबद्दलची माहिती प्राचार्य एस.एम.राऊत यांनी दिली.माहिती जाणून घेतल्यावर अॕड. उज्जवल निकम यांनी समाधान व्यक्त करून ही शैक्षणिक संस्था उत्तरोत्तर प्रगती करेल असा अभिप्राय व्यक्त केला.सोबतच देशात अनेक राष्ट्रीय ,सामाजिक महत्वाचे प्रश्न असतांना आणि युवकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतांना शासन आणि प्रसार माध्यमे मात्र निराधार गोष्टींवर चर्चा करीत असल्याची चिंता व्यक्त केली. अॕड.उज्जवल निकम शाळा कनिष्ठ महाविद्यालयात सदिच्छा भेटीला आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे स्वागत संस्थेचे सचिव अनिल जवादे आणि प्राचार्य राऊत यांनी केले.याप्रसंगी उपप्राचार्य गुडदे ,पर्यवेक्षक दिनेश वाघ व इतर प्रशासकीय मंडळीची उपस्थिती होती.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा