Home Blog Page 39

Policenews / हिंगणघाट पोलीसांची अवैध्द दारू विक्रीवर कारवाई

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणधाट :- दी. 18/08/25 रोजी नाईट पेट्रोलींग डयुटी करीत असतांना मिळालेल्या माहिती प्रमाणे दाभा गावाकडुन हिंगणघाट शहराकडे येणारे रोडवर नाकेबंदी करीत असतांना आरोपी सुनिल शरबत भोसले व त्याचे पत्नी मिना सुनिल भोसले हे त्यांचे मोपेड गाडी क्र. एम.एच. 32 ए.एयु. 6327 ने अवैध्द गावठी मोहा दारूची वाहतुक करीत असतांना पंचासमक्ष मिळुन आले.

आरेापीचे ताब्यातुन 8 प्लास्टीक पन्न्यांमध्ये एकुन 80 ली. गावठी मोहा दारू की. 12000/रू. व एक जुपीटर कंपनीची मोपेड गाडी एम.एच. 32 ए.एयु. 6327 जुनी वापरती की. 80,000/रू. असा. एकुन कि. 102,000/रू. चा माल जप्त करून आरोपीस पोलीस स्टेशन हिंगणघाट पोलीसांनी अटक केली असुन पुढील तपास सुरू आहे.

Sivshena / काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक अनुराग जैन , वर्धा , अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे , उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशिलकुमार नायक यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट ठाणेदार पोलीस निरिक्षक देवेन्द्र ठाकुर यांचे

Policenews/मार्गदर्शनामध्ये गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार. प्रविण बावणे, पोलीस नाईक निलेशसिंग सुर्यवंशी, नरेंद्र आरेकर, पोलीस शिपाई सागर सांगोले, संतोष गिते यांनी केली.

Sivshena / काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- दि. १८ ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे नगरपरिषद हिंगणघाट येथील मा. मुख्याधिकारी यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे,सतीश धोबे तसेच तालुकाप्रमुख मनीष देवडे व शहर प्रमुख चंद्रकांत भुते यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

सविस्तर अशे की, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ या दिवशी हिंगणघाट नगर परिषदेच्या नवीन इमारत बांधकाम तसेच अंतरिक साज-सजावट पूर्ण झाल्यामुळे त्याचा लोकार्पण सोहळा ठेवण्यात आला होता.

या सोहळा निमित्त कार्यक्रम पत्रिका विनीत म्हणून या नगरपरिषदचे मुख्य अधिकारी प्रशांत उरकुडे यांनी राज्य शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) मा. खासदार यांचे नाव महाराष्ट्र सरकारच्या राज्यमंत्री यांच्यानंतर पाहिजे होते . परंतु या पत्रिकेत मा. आमदार समीर कुणावार यांचें नाव राज्यमंत्री नामदार डॉ.पंकज भोयर यांचे नंतर टाकण्यात आले.

PwdNews /टूनकी ते वसाडी रोडवरील पुलाच्या भिंतीचे निकृष्ट आणि धोकादायक दर्जाचे काम? 

व मा. खासदार यांचे नाव विशेष उपस्थिती म्हणून अमर काळे यांना पत्रिकेत खाली दर्शविण्यात आले. तसेच बसविलेल्या कोणशीला वर प्रोटोकॉल वगळून नावे अधोरेखित करण्यात आले. महाविकासआघाडी चे घटक पक्ष म्हणून शिवसेना खासदार श्री. अमर काळे साहेब यांचा झालेला अपमान सहन कसा काय करणार ? त्यामुळे शिवसेना द्वारा मुख्याधिकारी यांना सात दिवसाच्या आत त्या कोणशीला बदलविण्या बाबत सूचना करण्यात आल्या.

अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने त्या इमारतीचा उद्घाटनाचा दगड फोडून त्या ठिकाणी दुसरा दगड बसविण्यात येईल असे सक्त ताकीद देण्यात आली.
तसेच हिंगणघाट शहरातील झाशी राणी चौक येथे डॉ. गमे हॉस्पिटल जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामपूर्ण करण्यासाठी जवळपास वीस दिवसापासून मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे.

त्या खड्ड्या मुळे वाहतुकीस व त्या परिसरातील राहणाऱ्या रहिवाशांना व डॉ. गमे यांच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना वहिवाट करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारे शहरातील इतर भागात सुद्धा खड्डे खोदून असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.त्यासाठी वरील सर्व शिवसेनेचे पदाधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत त्या ठिकाणी त्या खड्ड्यात झाडे लावून उन्हामध्ये बसून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात त्या परिसरातील सन्माननीय नागरिक तथा शिवसैनिक उपस्थित होते .सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तर्फे अभियंता व ठेकेदार यांचा प्रतिनिधी त्या आंदोलन स्थळी येऊन सदर काम पंधरा दिवसात पूर्ण करून देऊ असे लेखी स्वरूपाचे आश्वासन दिल्या गेले .त्या अधिकाऱ्यांना व ठेकेदार यांना शिवसेनेचे पदाधिकाऱ्यामार्फत सक्त ताकीद देण्यात आली की, जर पंधरा दिवसाच्या आत काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने यापुढे आंदोलन करण्यात येईल.

Sivshena / सदर सर्व बाबीस प्रशासन म्हणून आपण जबाबदार आहे. आंदोलनाकरिता शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने ,माजी नगरसेवक शंकर मोहमारे,भास्कर ठवरे, नंदू रेडलावर ,शंकर झाडे ,अनंता गलांडे ,नितीन वैद्य ,चंद्रशेखर भोयर, गजानन काटोले, शितल चौधरी ,शकील अहमद ,वसीम शेख ,पप्पू घवघवे, संजय पिंपळकर ,राहुल मोहितकर, रितिक मोघे, फिरोज पठाण, हिरामण आवारी, नरेंद्र गुलकरी,दिलीप चौधरी, दिनेश धोबे, सुभाष काटकर ,विलास चौधरी ,प्रशांत कांबळे,हेमंत भोयर, राजेश बोडे ,संजय अंभोरे संजय रहाटे,भजभुजेताई, किशोर इंगोले, प्रशांत सुपारे, भास्कर भिसे, प्रभाकर खडसे,प्रभाकर खडसे, हार्दिप काळे,प ,प्रभाकर खोडे ,विजय कोरडे, बलराज डेकाटे, गौरव गाडेकर,सांताराम मुरकुटे, प्रवीण राऊत ,पांडुरंग निखाडे, नारायण मोघे ,श्रावण मोरे, संजय मोरे,महादेव विताळे,निमेश भोयर, नरेश खाडे, अतुल रोहनकर, प्रशांत भोयर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

PwdNews /टूनकी ते वसाडी रोडवरील पुलाच्या भिंतीचे निकृष्ट आणि धोकादायक दर्जाचे काम? 

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

बुलढाणा:-सदर तक्रार अर्जा द्वारे मी शेखशे सईद आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की , टूनकी ते वसाडी या महत्त्वाच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामा मार्फत एक नवीन पुलाचे बांधकाम सध्या सुरूच आहे.

हा पूल शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी,मुस्मुलीम लोकांचा मदरसा, आलेवाडी येथील इस्तमा,आजारी रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.या मार्गावरून सतत वाहनांची व लोकांची ये-जा चालते.

revenuenews / कुविख्यात गुंड वाळूतस्कर भैय्या रोकडे याची येरवडा कारागृहात रवानगी

ते पावसाळ्यात या पुलामुळे गावाला व तालुक्याचे ठिकाणी योग्य संपर्क साधता येईल, म्हणूनच या कामा विषयी सर्व नागरिकांची अपेक्षा मोठीहोती .
परंतु अत्यंत खेदा ने नमूद करावे लागते की सदर पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.

कामाच्या सुरुवातीला अनियमितता स्पष्टपणे जाणवत आहे. बांधकामात आवश्यक त्या दर्जेदार साहित्याचा वापर न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. कंत्राटदारा कडून कामा तबेफिकीरी व निष्काळजी पणा दिसून येत आहे.

सदर कामात बांधण्या त आलेले रिटर्न वाल हि पुलाला सोडून बाहेरच्या दिशेने नेवल न झालेल्या आहेत.आज
रोजी हि भींत अश्या अवस्थेत आहे कालांतराने सदर भींती पासून भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो.

त्या वरून कामाचा दर्जा आपल्या समोर स्पष्ट होते.ते
पावसाळ्यात पाण्याचा जोर वाढल्यास पुल कोसळण्याचा गंभीर धोका संभवतो.अपघात होऊन जनतेचे या जीविताला धोका निर्माण होईल.
सार्वजनिक निधी वाया जाऊन सरकारच्या तिजोरीला मोठा तोटा होईल.

PwdNews/शेतकऱ्यांना,विद्यार्थ्यांना व रुग्णवाहिकांना वाहतुकीतुकीत अडथळे निर्माण होतील.अशा भविष्यात अनेक निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

revenuenews / कुविख्यात गुंड वाळूतस्कर भैय्या रोकडे याची येरवडा कारागृहात रवानगी

 

revenuenews / कुविख्यात गुंड वाळूतस्कर भैय्या रोकडे याची येरवडा कारागृहात रवानगी

एमपीडीए कायद्यांतर्गत पंढरपूर तालुका पोलिसांनी केले स्थानबद्ध

अँकर : मंगळवेढा तालुक्यातील मूढवी
येथील कुविख्यात वाळू तस्कर आणि गुंड भैय्या उर्फ आकाश रोकडे, यास पंढरपूर तालुका पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक स्थानबद्ध केले. त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. गुरुवारी पंढरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला स्थानबद्ध केले , आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

Policenews/ आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का?

भैय्या उर्फ आकाश रोकडे( वय 26) हा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात वाळू तस्करी करत होता. चोरी आणि दहशत पसरवणे अशा प्रकारचे गंभीर सहा गुन्हे त्याच्यावर होते.

हा कुठल्याही प्रकारचा वैध व्यवसाय करत नव्हता. पंढरपूर तालुका हद्दीतील ओझेवाडी, पंढरपूर आणि मंगळवेढा शहर आणि आसपासच्या परिसरात भीमा नदी आणि मान नदीपत्रातून वाळू चोरी करून त्याची विक्री तो करत होता.

यातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर परिसरातील सर्वसामान्य जनतेत भेटीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या कृत्यामुळे पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहराच्या आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणे, भीतीचे वातावरण तयार करणे यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचे वागणे त्रासदायक झाले होते.revenuenews

पंढरपूर शहर आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे कृत्य करून त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा वाळूतस्कर म्हणून स्वतःला सिद्ध केले होते त्याच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, मंगळवेढा पोलीस ठाणे येथे येथे वाळू तस्करीचे पाच आणि
सरकारी कामात अडथळा आणणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल होते.

 

भैय्या रोकडे त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.

revenuenews/जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार ,भैय्या रोकडे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केला आहे. आरोपीस ताब्यात घेऊन या कायद्याअंतर्गत कारवाई करून
त्यास अखेर पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन ,त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.

Policenews/ आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का?

 

जालना : आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का?

Policenews:जालना येथे स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या घटनेमुळे जिल्हा तसेच राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

ताब्यात घेतलेल्या आंदोलकास पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अनंत कुलकर्णी यांनी धावत येत पाठीमागून कमरेत लाथ घातल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या घटनेवर प्रशासनाच्या भूमिकेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गोपाल चौधरी नावाचा आंदोलक कौटुंबिक वादात न्याय मिळावा म्हणून मागील अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होता. स्वातंत्र्य दिनी त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

त्या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता उपअधीक्षक कुलकर्णी यांनी लाथ मारल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.

या व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला आंदोलकाने न्याय न मिळाल्याने आत्मदहनाचा मार्ग पत्करल्याची खंत आहे, तर दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे प्रशासनाची प्रतिमा डागाळली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रशासन व गृहमंत्रालय मात्र अद्यापही मौन बाळगून आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की –गृहमंत्री कारवाई करतील का?
जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) साहेब या घटनेची दखल घेणार का?

आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यावरही कारवाई होणार का
व्हायरल व्हिडिओमुळे हा विषय जनतेमध्ये चर्चेचा ठरला असून “सामान्य माणसाने न्यायासाठी आंदोलन केल्यास त्याला अशा प्रकारे लाथा घालून वागवले जाते का?”

Policenews:असा सवाल आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे.या घटनेत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांना दुसरी कडे स्थायी पट्टे दया वॉर्डातील नागरिकांची मागणी(Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट: संत तुकडोजी वॉर्डातील कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांना दुसरी कडे स्थायी पट्टे द्या या प्रमुख मागणीसाठी संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

संत तुकडोजी वॉर्ड येथील कलोडे सभागृह समोरील शासकीय जागेवरील अतिक्रमण हे संत तुकडोजी वॉर्डातील रहिवाश्यांना अतिशय त्रासदायक ठरत आहे. येथील काही दुकानांमध्ये व झोपडपट्टीमध्ये दारू व इतर नशिले पदार्थ विकण्यात येते. तसेच या रस्त्यावर मुली व महिलांची नेहमीच छेड काढल्या जाते.

Atulvandile /अतुल वांदिले यांच्या निवेदनानंतर ना गडकरी यांच्या दणक्याने उड्डाणं पुलाच्या दुरुस्तीला वेग

अतिशय खराब शब्दात बोलल्या जाते. तसेच कुठल्याही सामूहिक सणाला येथे दारू पिवून शिवीगाळ व भांडणे होता. तसेच झोपडपट्टीमध्ये कुठलीही परवानगी न घेता रात्री १२ वाजेपर्यंत डिजे वाजविला जातो. त्याशिवाय या परिसरात अस्वच्छता राहत असल्यामुळे संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारख्या रोगाचा सामना करावा लागतो. तसेच घरातील व दुकानातील घाण पाणी रहिवाशांच्या घरासमोर आणून टाकतात.

याबाबत हटकल्यास अंगावर मारायला धावून येतात. हा त्रास नेहमीचाच झाला असून, येथील झोपडपट्टीला दुसरीकडे जागा वा घरे देऊन स्थलांतरीत करा या मागणीसाठी संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली.परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून
आठ दिवसात अतिक्रमन न काढल्यास आक्रमक आंदोलन करू असे निवेदन संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

Hingnghat /यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शिवसेना (उबाठा) जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोबे, दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक राजू भाईमारे, नितीन भुते, हुकेश ढोकपांडे, दिलीप बालपांडे,राम मेंढे,शरद ढोकपांडे,नितीन कोल्हे,लक्ष्मण राऊत, राहुल झाडे,रमेश राऊत,शीतल राऊत, प्रभा घिये,मेंढे, दम्यंती घुळघाणे, शीतल चेले,उमा भोयर, प्रज्ञा राऊत यांच्यासह संत तुकडोजी वॉर्डातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई येथे आझाद मैदानावर १४ जुलै २०२५ रोजी राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थ्यांचा भव्य छत्री मोर्चा घेण्याचा निर्धार (morchanews)

 

विकी वानखेडे

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना जळगाव जिल्ह्यातर्फे मा. आपले प्रशिक्षणाचे आधारस्तंभ तुकाराम बाबा यांनी सर्व युवा प्रशिक्षणातील संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या १४ जुलै २०२५ च्या मुंबई येथील मोर्चाच्या नियोजनासाठी सुरु केलेल्या सवांद दौऱ्याची सुरवात जळगाव येथून करण्यात आली.

दि. १२जुलै २०२५ रोजी जळगाव येथे युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे मा. जिल्हाध्यक्ष साबिरा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक मा. तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीला सुरवात झाली.

याप्रसंगी श्री तुकाराम बाबा यांचा भव्य सत्कार जळगाव
जिल्ह्याच्या वतीने युवा प्रशिक्षणार्थ्यांकडून करण्यात आला. बैठकीला प्रमुख विषय म्हणजे येणाऱ्या आगामी काळात प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रोजगार कसा मिळवून द्यावा हा सर्वात मोठा विषय यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

मा. सरिता ताई यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षणार्थी यांना विषेश संदेश या ठिकाणी दिला ते असे कि, जळगाव जिल्ह्यांनी सर्वात अगोदर प्रशिक्षणार्थीच्या हितासाठी झटणारे पहिले एकमेव संघटन म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना. तरी आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी जळगाव चे नाव सदैव स्मरणात राहील, तसेच उंचशिखरा पर्यंत

पोहोचेल यासाठी प्रशिक्षणार्थीनी रोजगाराच्या मागणीसाठी व न्याय हक्कासाठी मुंबई येथे तत्पर उपस्थिती दर्शवावी. तसेच १४ जुलै ला होणाऱ्या महामोर्चासाठी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. येणाऱ्या १४ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या मुंबई विधानभवनावर एकदिवशीय छत्री आंदोलणासाठी मोठ्या संख्येने एकजुटीने हजर राहावे असे संबोधन केले.

पुढिल मनोगत व्यक्त करताना उपाध्यक्ष हर्षाली साळुंखे यांनी म्हटले की, जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थीना मुंबई येथे विधानभवनावर आणण्याचे नियोजन व भविष्यात येणाऱ्या रोजगार विषयी व्यथा मांडल्या व पुढील कामे कसे चिकाटीने करता येईल त्यावर मनोगत व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मा. तुकाराम बाबा यांनी बैठकीला नवीन प्रारूप निर्माण केले, बैठकी दरम्यान प्रशिक्षणार्थी यांनी रोजगारासंबंधी

कश्या पद्धतीचे कामे जिल्ह्याच्या नेतृत्वानी केले पाहिजे हे त्यांनी सांगितले, प्रत्येक तालुक्यात जाऊन पदाधिकारी यांनी प्रशिक्षणार्थी पर्यंत पोहचण्याचे काम केले पाहिजे, आंदोलनासंबंधी वर्तमानपत्रात जाहिराती, प्रत्येक तालुक्यात दोन बॅनर, आणि जिल्ह्याच्या स्थानिक स्तरावर जाऊन बैठकी घेण्याचे आणि आंदोलनासंदर्भात जनजागृती करावी. येणाऱ्या १४ जुलै २०२५ रोजी मुंबई मध्ये होणाऱ्या एकदिवशीय छत्री मोर्चा मध्ये जळगाव चे प्रशिक्षणार्थी एकजूट झाले पाहिजे, किमान निम्मे प्रशिक्षणार्थीची साथ असली पाहिजे अशी ग्वाही प्रशिक्षणार्थी कडून करून घेतली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी पाटील, मोहिते यांनी केले. याप्रसंगी मयूर पाटील, भरत चौधरी विकी वानखेडे हेमंत पाटील, समीर तडवी, गौरव जोशी, देवयानी जगताप, हर्षाली कोळी, सुधीर पाटील,संदीप साळुंखे, आकाश सोनार, तुषार शिंदे ,महेंद्र सर ,संतोष पाटील, विनोद चौधरी ,निकिता तायडे ,योगिता साळुंखे ,शेखर पाटील

चे तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी, महिला-भगिनी उपस्थित

आंजती ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार(brekingnews)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

brekingnews/हिंगणघाट :- मौजा आंजती हद्दीत येत असलेला हिंगणघाट परीसरातील काहीभाग, तसेच रीमडोह, चिचघाट (राठी) कोल्ही (बोरगाव )जुनोना MIDC हा परीसर येतो. या परीसरात मोठ्या प्रमाणात औधोगिक व्यवसाय आहे.आजच्या तारखेला हिंगणघाट पंचायत समिती मध्ये सर्वात जास्त महसूल कर आंजती ग्रामपंचायत त्या नंतर नांदगाव ग्रामपंचायत आहे.

आंजती ग्रामपंचायतचा हिशोब घेतला असता सर्वात जास्त भ्रष्टाचार सुद्धा याच ठिकाणी सुरु आहे. आंजती ग्रामपंचायतला औद्योगिक व्यवसाय कर आकारणीतुन जास्त उत्पन्न मिळते आज या ठिकाणी औद्योगिक व्यवसाय कर आकारणी करतांना ग्रामपंचायत सचिव, स्थानिक सरपंच /सदस्य यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे आंजती ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले औद्योगिक व्यवसाय बांधकाम परवानगी नसतानाही कारवाई करण्याची हिम्मत करत नाही,

यामध्ये वरिष्ठ अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येते त्यामुळे या ठिकाणी चौकशी केल्यास अनेक औद्योगिक व्यवसाय कर तसेच अनेक व्यवसाय कागदोपत्री असल्याचे समोर येऊ शकते आज एकीकडे शासन अनाधिकृत

brekingnews/बांधकामावर बुलडोजर चालवत असतांना दुसरीकडे अशा विनापरवानगीच्या बांधकामाला अभय मिळत असल्याने यामध्ये वरीष्ठ अधिकारी यांचे आर्थिक हितसबंध गुंतले असण्याची शक्यता सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त केल्या जात आहे.

ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट येथील मुलींचा फुटबॉल संघ पोहोचला विभागीय स्तरावर(Hingnghatnews)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghatnews/हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने दि. 11 जुलै 2025 शुक्रवार, रोजी वर्धा येथे घेण्यात आलेल्या सुब्रोतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतन येथील 17 वर्ष गटातील मुलींच्या फुटबॉल चमूने 1-0 ने स्पर्धक खेळाडूंचा पराभव करून घवघवीत यश संपादन केले. तसेच नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तराकरिता आपले स्थान निश्चित केले.

फुटबॉल संघात कनक जामुनकर,तिलाष्का राठोड, श्रावणी बोरकर, श्रावणी वाणे, लीना घिये, पल्लवी मुडे, धनश्री मोहाड, दिशा पाटील, तनुजा डफ, ज्ञानाई खारपाते, अनन्या चौधरी, आरती शिरजोरकर, नंदिनी डेहणे या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षणासोबत क्रीडेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

म्हणूनच शाळेचे संस्थापक गिरधर राठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करतात. क्रीडा शिक्षक योग्य तालीम देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता सक्षम करतात. ही खास उल्लेखनीय बाब.

विद्यार्थ्यांच्या विक्रमा बद्दल गिरधर राठी (संस्थापक- हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था, हिंगणघाट द्वारा संचालित ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट व वाघोली), अर्पणा राठी ( अध्यक्षा), रशेष राठी (सचिव ), प्रवीण धोबे

Hingnghatnews/(कोषाध्यक्ष), अभिनव जयस्वाल (मुख्याध्यापक- ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट), रोहन हुमाड ( क्रीडा शिक्षक), पायल तळवटकर (क्रीडा शिक्षिका) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी फुटबॉल खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा क्षेत्रात उच्चांक गाठण्याचा संकल्प केला.

Atulvandile /अतुल वांदिले यांच्या निवेदनानंतर ना गडकरी यांच्या दणक्याने उड्डाणं पुलाच्या दुरुस्तीला वेग

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Atulvandile/हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातील उड्डाणं पुलावर एका वर्षात दोनवेळा पडलेल्या जीवघेण्या खड्ड्या बाबत पुराव्या सहित माहिती केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना भेटून दिल्यानंतर ना. गडकरी यांनी त्वरित राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यां ह्या उड्डाण पुलाबाबत माहिती देऊन सदर काम करणाऱ्या ठेकेदाराला ताबोडतोब ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश दिले.

ना. गडकरी यांचा आदेश येण्याच्या आधी ज्या पद्धतीने थातूर मातुर काम सुरु होते ते बंद करून वरिष्ठ महामार्ग अधिकारी हें स्वतः आपल्या तांत्रिक अधिकारी वा कर्मचाऱ्यांसह स्वतः घटनास्थळी येवून या पुलाची स्थायी स्वरूपात दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.

SarpanchNews/संग्रामपूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.

यांच बरोबर उपजिल्हा रुग्णालयाजवळील व कलोडे चौक येथे सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाकडेही या राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष दिसत आहे. दि. 7 जुलैला ना. नितीन गडकरी यांना राका नेते अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष भेटीत निवेदन दिल्यावर व ना. गडकरी यांनी त्वरित दखल घेतल्याने हिंगणघाटचे सर्वसाधारण नागरिक या दोघांनाही धन्यवाद देत आहे. यावेळी मनसेचे राज्य चिटणीस हेमंत गडकरी हें उपस्थित होते.

Nitingadkariयेथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालया जवळील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानांतरीत करण्याच्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याने करूनही पक्ष भेद विसरून या दोन्ही मागणीची त्वरित दखल ना गडकरी यांनी घेतली हें विशेष! यावेळी राकाचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील राऊत, दशरथ ठाकरे उपस्थित होते.