Home Blog Page 390

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात “25 कोटिची” मागणी, व्हिडिओ आला समोर,

0

 

SURYA MARATHI NEWS

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील धक्कादायक वीडियो समोर आला आहे व एक साक्षीदार किरण गोसावीच्या सहकाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.की
या प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप प्रभाकर साईल यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांमध्ये डील केल्याचा आरोप केला आहे.

आर्यन खान aryan khan आणि नवाब मलिक navab malik दोन वेगळे विषय – गृहमंत्री

प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत असल्याचे सांगतात. ते म्हणतात, ”क्रूझवर झालेल्या छापेमारीवेळी ते किरण गोसावीसोबत होते. त्याने सॅम आणि गोसावी नावाच्या व्यक्तीला एनसीबी NCB कार्यालयाजवळ भेटताना पाहिलं. हे प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटी रुपयांमध्ये डील झाली होती. त्यापैकी 8 कोटि समीर वानखेडे सरांना द्यायचे आहे आणि उरलेले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असे किरण गोसावी यांनी फोनवर बोलत होते. त्यानंतर एका ठिकाणाहून मला ५० लाख रुपये घ्यायला पाठविले होते. ते पैसे मी त्यांना आणून दिले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक पिशवी देऊन ती सॅमला द्यायला सांगितली होती. किरण गोसावी (kiran gosavi)स्वतः पत्नीसोबत बाहेर गेले होते.” असे खळबळजनक आरोप या व्हिडिओमधून केला आहे. मात्र, सूर्या मराठी न्यूज़ या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
surya marathi newe

दिवाळीच्या पुर्वी शेतकऱ्यांना  मिळणार सहा हजार एवजी बारा हजार गिफ्ट

0

 

SURYA MARATHI NEWS

सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करू शकते.

जर हा प्रस्ताव मान्य झाला तर शेतकऱ्यांना वार्षिक चक्क 6000 ऐवजी 12000 रुपये मिळतील दिवाळी गिफ्ट .(Diwali gift for farmers)
जर किसान योजनेची रक्कम दुप्पट झाली तर शेतकऱ्यांना हप्ता (पीएम किसान हप्ता) 2000 रुपयांवरून 4000 रुपयांपर्यंत वाढेल. 2021 च्या दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकार याची घोषणा करू शकते.
शेतकऱ्यांना गिफ्ट मिळणार !
खरं तर, अलीकडेच, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांना सांगितले की पीएम किसान सन्मान निधी (पीएम किसान) ची रक्कम दुप्पट होणार आहे. तेव्हापासून पीएम किसानची रक्कम दुप्पट करण्याची शक्यता वाढत आहे की सरकारने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
भारत सरकारच्या पीएम किसानसाठी मोबाइल अॅप(Mobile app)
तुम्ही त्याचे तपशील पीएम किसानच्या ऑनलाइन पोर्टल www.pmkisan.gov.in किंवा मोबाइल अॅपद्वारे तपासू शकता. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी, NIC (National Informatics Center) ने एक मोबाईल अॅप ( mobile App) विकसित केले आहे.
तुम्ही अशा प्रकारे नोंदणी करू शकता
तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या CSC काउंटरला भेट देऊन नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही किसान पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलला भेट देऊन तुमचे नावही नोंदवू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही PM Kisan GOI मोबाईल अॅपद्वारे देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.
यासाठी तुम्ही ‘Google Play Store’ वर जाऊन ते डाउनलोड करा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की त्याची भाषा आपल्या स्थानिक भाषेत अनुवादित केली जाऊ शकते.
भारत सरकारच्या पीएम किसानसाठी मोबाइल अॅप
तुम्ही पीएम किसानच्या ऑनलाइन पोर्टल www.pmkisan.gov.in किंवा मोबाईल अॅपद्वारे त्याचे तपशील तपासू शकता. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) ने एक मोबाईल अॅप विकसित केले आहे.

SURYA MARATHI NEWS

ARYAN KHAN: आर्यन खानला जामिन न मिळण्याच कारण काय?

0

 

SURYA MARATHI NEWS

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख( shahrukh khan खानचा मुलगा आर्यनला aryan एका क्रूजवर झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकानं (NCB) तीन ऑक्टोबरला अटक केली होती.

जवळपास तीन आठवड्यांनंतरही हे प्रकरणं चर्चेत आहे. त्यामागचं मोठं कारण म्हणजे आर्यन खानला अद्याप जामीन मिळालेला नाही.
मुंबईच्या एका विशेष न्यायालयानं 20 ऑक्टोबरला आर्यन खान आणि इतर दोन आरोपींना जामीन देण्यास नकार दिला.
आर्यन खानकडे कोणतंही ड्रग्ज आढळलेलं नाही. तरीही त्याचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे बंदी असलेले अंमली पदार्थ असल्याची माहिती त्याला होती. तसंच ते दोघं सोबतच होते, त्यामुळं या प्रकाराला ‘कॉन्शियस पझेशन’ (ड्रग्ज असल्याची माहिती असणे) समजलं जाईल, असं कोर्टानं जामीन फेटाळताना म्हटलं.
अरबाज मर्चंटकडून सहा ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं होतं. शिवाय NCB न्यायालयासमोर सादर केलेल्या व्हाट्सअॅप चॅटचा उल्लेखही जामीन नाकारताना केला होता.
आर्यन खान ड्रग्ज संदर्भात अज्ञात लोकांशी चर्चा करत होता. त्यात ड्रग्जचं अधिक प्रमाण आणि हार्ड ड्रग्जबाबत चर्चा सुरू होती, हेही त्यावरून स्पष्ट होतं, असं न्यायालयानं म्हटलं.
त्यामुळं आर्यन खान ( aryan khan) प्रतिबंधित अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांच्या संपर्कात होता आणि नियमितपणे मादक पदार्थांशी संबंधित अवैध कृत्यांमध्ये त्याचा समावेश होता, हे प्रथमदर्शनी दिसत असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.
त्यामुळं जामीनावर असताना आर्यन खान पुन्हा असं कृत्य करणार नाही, याबाबत न्यायालयानं साशंकता व्यक्त केली.
या प्रकरणात प्रथम दर्शनी पाहता, कट रचल्याचे (नियोजनबद्धरित्या सर्व काही केल्याचे) पुरावे आहेत आणि सुनावणीदरम्यान यावर सखोल चर्चा केली जाईल, असंही विशेष न्यायालयानं म्हटलं.
या प्रकरणी आर्यन खानच्या aryan khan विरोधात काहीही पुरावे नसल्याचं बचाव पक्षाचं म्हणणं होतं. मात्र सर्व आरोपी एकाच धाग्यानं जोडलेले असून ते एका मोठ्या नेटवर्कचा भाग असू शकतात, असं न्यायालयानं म्हटलं.
आर्यन खानला एनसीबीनं NCB तीन ऑक्टोबरला ड्रग्जशी संबंधित एका छाप्या प्रकरणी अटक केली होती.
एनसीबीनं मुंबईच्या किनाऱ्यावर एका क्रूजवर छापा मारून आर्यन खानसह अनेकांना ड्रग्जचं सेवन आणि कट रचल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
आर्यन खानसह इतर आरोपींना एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (सी) सह 20 बी (खरेदी), 27 (विक्री), 28 (गुन्हा करण्याचा प्रयत्न), 29 (चिथावणी देणे, कट रचणे) आणि 35 (सदोष मानसिक स्थितीची शक्यता) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
प्रकरणाशी संबंधित मोठे प्रश्न
आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नाही. तसंच तो ड्रग्ज सेवन करत असल्याचाही पुरावा देण्यात आलेला नाही, मग त्याला जामीन कोणत्या आधारावर नाकारला जात आहे? हा प्रश्न वारंवार समोर येत आहे.
Midea मीडिया हाईप आणि एनसीबीच्या भूमिकेमुळं आर्यन खानला जामीन मिळण्यात अडचणी येत असल्याचं सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील विकास सिंग म्हणाले.
“हा कायदा प्रामुख्यानं आरोपीकडे ड्रग्ज मिळण्यासंदर्भात आहे. आरोपीकडून किती प्रमाणात ड्रग्ज जप्त झाले त्यावरूनच शिक्षादेखील ठरते,” असंही ते म्हणाले.
”या प्रकरणात आर्यन खान ग्राहक असेल, तर ग्राहकासाठी हा गुन्हा जामीनपात्र आहे. ग्राहक म्हणून आर्यन खान विरुद्ध हे प्रकरण कमकुवत असण्याचं कारण म्हणजे, त्याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाही, किंवा त्याच्या रक्ताचे नमुने अथवा हेअर फॉलिकल्सदेखील घेण्यात आलेले नाही.”
आश्चर्यकारक बाब म्हणजे, एनसीबीनं आर्यन खानला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं मात्र, त्याच्या रक्ताचे, लघवीचे अथवा हेअर फॉलिकल्सचे नमुने घेण्यात आले नाही.
ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपीच्या रक्त आणि लघवीच्या नमुन्यांसह हेअर फॉलिकल टेस्टद्वारे केसांचे नमुने घेऊन अंमली पदार्थांच्या सेवनाची माहिती मिळवली जाते.

सर्व परिस्थितीत तज्ज्ञांच्या मते एनसीबीचा संपूर्ण खटला हा आर्यन खान ड्रग्जची तस्करी आणि संपू्र्ण कटात सहभागी होता यावर आधारित आहे. या आरोपांमुळं न्यायालयाकडून त्याला जामीन मिळणं कठीण ठरणार आहे.
दरम्यान, वकील आशिमा मंडला यांच्या मते, सरकारी पक्षाच्या खटल्यात अनेक कमतरता आहेत.
“आरोपींवर लावलेली कलमं, ड्रग्ज बाळगणे आणि वापराशी संबंधित आहेत. मात्र हे आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाला ठोस पुरावे सादर करता आलेले नाहीत,” असं त्या म्हणाल्या.
(NCB)एनसीबीनं आधी आर्यन खानकडे (ARYAN kHAN) ड्रग्ज आढळल्याचं म्हटलं आणि नंतर त्याला नकार दिला, असं मंडला म्हणाल्या.
नंतर असं सांगण्यात आलं की, तो ड्रग्जचा वापर करत होता, मात्र ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही वैद्यकीय पुरावे नाहीत.
“म्हणजे तो पेडलर आहे, असं एनसीबीला म्हणायचं आहे का? जर हा आरोप असेल तर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचं प्रमाण कमी असल्यानं हे सिद्ध करणंही कठीण ठरेल,” असंही त्या म्हणाल्या.
जामीनाचा निर्णय हा केवळ न्यायालयासमोर ठेवलेल्या पुराव्यांच्या आधारे केला जातो, प्रकरणाच्या गुण-दोषांच्या आधारावर नाही, असंही त्या म्हणाल्या.
शिवाय जर प्रकरण कॉन्शियस पझेशनचं असेल तर क्रूजवरील इतरांवर हा आरोप का लावला नाही? केवळ 20 लोकांपुरतंच हे प्रकरण मर्यादीत का ठेवण्यात आलं, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
संपूर्ण प्रकरण व्हॉट्सअॅप चॅटवर आधारित?
तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत या प्रकरणात समोर आलेली माहिती पाहता, एनसीबीचा या आरोपींच्या विरोधातील खटला केवळ व्हॉट्सॅप चॅटवर आधारित आहे.
गेल्या वर्षी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (reya chakrvati) हिच्या अटकेच्या वेळीदेखील अशाच प्रकारचा घटनाक्रम पाहायला मिळाला होता. अनेक दिवसांच्या चौकशीनंतर एनसीबीनं बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्सशी संबंधित एका प्रकरणात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अटकही केली होती.
28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टानं जामीनावर सोडलं होतं.
आर्यनच्या वकिलांनीही हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याच्या जामीन अर्जावर 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
व्हॉट्सअप चॅट पुरेसे आहेत का?
या प्रकरणातही आर्यन खानला जामीन नाकारण्याचं कारण हे, व्हाट्सअॅप चॅटच असल्याचं सांगण्यात आलं. त्यात आर्यन खान अज्ञात लोकांशी ड्रग्जबाबत चॅटिंग करत असल्याचं सांगण्यात आलं.
म्हणजे केवळ व्हाट्सअॅप चॅटच्या आधारे आर्यन खानचा जामीन अर्ज नामंजूर होऊ शकतो का?
द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातील 15 जुलैच्या एका वृत्तानुसार सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठानं एका प्रकरणाच्या सुनावणीत, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मॅसेजला काहीही महत्त्वं नसल्याचं म्हटलं होतं.
या वृत्तानुसार सोशल मीडियावर सध्या काहीही तयार केलं किंवा हटवलं जाऊ शकतं. न्यायालय व्हाट्सअॅप मॅसेजला महत्त्व देत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.
आशिमा मंडला यांच्या मते, जर एनसीबीकडे व्हाट्सअॅप चॅटमध्ये आरोपींच्या विरोधात पुरावे असतील, तर त्यांनी नावं जाहीर न करता न्यायालयासमोर ती सादर करून, स्पष्टपणे आरोप लावावा.
अधिक माहितीसाठी वाचा – व्हॉट्सअॅप चॅट आरोपीविरोधात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतं?
‘मीडिया ट्रायल अधिक, तपास कमी’
कायदा कडक आहे की नाही हा मुद्दा या प्रकरणात नाही. तर त्या कायद्याचा वापर योग्य पद्धतीने केला जात आहे का? हा मुद्दा आहे, असं वकील विराग गुप्ता म्हणाले.
“या प्रकरणावर मीडिया ट्रायल जास्त होत आहे, आणि ज्या गांभीर्यानं अशा गुन्ह्याच्या विविध पैलूंची चौकशी व्हायला हवी, तेवढी होताना दिसत नाही,” असंही ते म्हणाले.
”जर आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असेल, तर अटकेच्या एवढ्या दिवसांनंतरही त्याच्या संबंधित ठिकाणांवर छापे आणि बँक खात्यांची चौकशी करणंही गरजेचं आहे. त्याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.”
मात्र, एनसीबीनं आर्यन खानवर तो एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी करणाऱ्या समुहाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं त्याला जामीन मिळणं कठिण आहे, असं गुप्ता म्हणाले.
आरोपी आणि त्याचं कुटुंब प्रसिद्ध आणि चर्चित असल्यानं पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, असं सांगून एनसीबी जामीनाला विरोध करत आहे.
लक्ष वेधून घेण्याचा प्रकार?
“हा दावा खरा असेल तर मग, व्हॉट्सअॅप चॅट आणि आरोपींच्या कबुली जबाबांशिवाय एनसीबीनं इतर पुरावे गोळा करण्यासाठी का प्रयत्न केला नाही, असं विराग गुप्ता म्हणाले.
”आर्यनशी संबंधित बँक खाते सील करण्याबरोबर घरी छापे मारून, महत्त्वाची कागदपत्रं का जप्त करण्यात येत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे तसं केल्यास रॅकेटचा भांडाफोड होईल आणि संपूर्ण टोळीला शिक्षा देता येऊ शकेल?
एनसीबीकडून हाय-प्रोफाईल अटक ही माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा कधी-कधी दुसऱ्या एखाद्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी केली जाते, असं विकास सिंह म्हणाले.
“गेल्या वर्षीही एनसीबीनं अनेक सेलिब्रिटींना बोलावत त्यांची अनेक दिवस चौकशी केली होती,” असंही ते म्हणाले.
एनसीबी केवळ लोकांना त्रास देण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचं, विकास सिंह म्हणाले.
“ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या मोठ्या माशांना सोडून, गुन्ह्यात शिकार ठरलेल्या लोकांच्या मागं लागण्यावर एनसीबीनं NCB लक्ष केंद्रीत केलं आहे,”असंही सिंह यांनी म्हटलं.

SURYA MARATHI NEWS

खाजगी वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडी मालकाच्या संमतीशिवाय वाहन दुसऱ्याला दिले नांदुरा पोलीस यांचा पराक्रम

0

 

प्रकरणात गौडबंगाल असल्याचा संशय…

नांदुरा:-स्वतःच्या मालकीची चार चाकी वाहन मित्रांना घेऊन जात असताना नांदुरा पोलिसांनी ते तपासणीच्या नावाखाली थांबविले आणि नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये ते ठेवायला सांगितले सदर प्रकरणात गाडीमालकाने ही गाडी आपली असून याबाबत काय गुन्हा केला अशी विचारणा केल्यानंतर ती गाडी परत देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आणि यानंतर ही गाडी त्रयस्थ माणसाला मालकाची संमती न घेता परस्पर दिल्याने या प्रकरणी नांदुरा पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून सदर प्रकरणात काय गौडबंगाल आहे याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास बरेच काही काळेबेरे उजेडात येईल यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गाडी मालकाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतुन केली आहे..
याबाबत सविस्तर असे की अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या मनात्री येथील रहिवासी अनंत शंकरराव थोरात हे शेगाव येथील सामान्य रुग्णालयात रूग्णवाहीकेवर चालक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 6 /9/ 2021रोजी श्री थोरात हे आपल्या मित्रांसमवेत गाडी क्रमांक एम एच 28 ए.एन. 2827 या अर्टिका गाडीने शेगाव येथून त्रंबकेश्वरला दर्शनासाठी जात होते नांदुरा शहरात तेथील पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गाडी अडवून गाडीची कागदपत्रे मागितली कागदपत्रे दाखल केल्यानंतर गाडी पोलीस स्टेशन मध्ये लावण्यास त्यांनी बजावले. यानंतर गाडी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा कागदपत्र व मालकी हक्काबाबत ठाणेदार गावंडे, चौकशी अधिकारी दौंड यांना सर्व कागदपत्रे दाखविले. त्यावेळी ठाणेदार गावंडे यांनी सदर कागदपत्रे मला नको दाखवू गावातील प्रतिष्ठित नागरिक लाला भाऊ यांना दाखविण्यास सुचविले. ठाणेदार ठाणेदार यांचे बोलणे त्यावेळी मला आश्चर्यकारक वाटले माझी स्वतःची गाडी असताना व सर्व कागदपत्रे सोबत असताना गाडी अडविण्याचा उद्देश काय याबद्दल मला शंका आल्याने मी गाडीची कागदपत्रे दिल्यानंतर गाडीची मागणी केली असता संबंधितांनी मला गाडी देण्यास नकार दिला.. यानंतर अनंत थोरात हे निराश होऊन शेगावला परतले.. सदर प्रकाराची माहिती अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांना दिल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री निलेश घोंगे यांच्याशी संपर्क साधून आपण सर्व घटनाक्रम त्यांना कळविला यामुळे निलेश घोंगे यांनी त्यांचे मित्र युवराज देशमुख यांना सोबत घेऊन नांदुरा पोलिस स्टेशन गाठले . संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार देऊन थोरात यांना वाहन पाहिजे असेल तर त्यांनी न्यायालयात जावे परंतु न्यायालयात जाण्यासाठी पोलिसांचे कोणतेही कागदपत्र देण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर नांदुरा पोलिस स्टेशन मध्ये सदर प्रकरणाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता नांदुरा पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करून नकार दिला. या प्रकरणात गुरुवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी नांदुरा पोलिस स्टेशन मधून सातव साहेब यांचा फोन आला होता व त्यांनी गाडीचा व्यवहार काय आहे असे विचारून मला त्यांनी अपमानजनक वागणूक देऊन तुझ्याविरुद्ध चोरीचा रिपोर्ट आला आहे असे म्हणून माझ्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.. दिनांक 6. 9. 2021 रोजीही या अधिकाऱ्यांनी मला शिवीगाळ करून अपमानीत केले होते. येथे वकिली करू नको अशी मल्लीनाथीही त्यांनी केली. सदर प्रकरणाची तक्रार दिनांक 1/10/2021. रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्या नंतर दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी चौकशी अधिकारी दौंड यांचा फोन आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरणात आपले काहीही स्वारस्य नसून आपण ठाणेदार यांच्या लेखी आदेशाने केले ती सर्व कार्यवाही ठाणेदारांच्या लेखी आदेशाने केल्याने आपण ठाणेदारांशी संपर्क साधावा असे सुचविले. ही गाडी अजूनही गाडीच्या मूळ मालकाला परत मिळालेली नसून पोलिसांनी ती परस्पर दुसऱ्याला दिली असावी किंवा तेच वापरत असावेत अशी शंका येऊ लागली असून या प्रकरणात पोलिसांनी इतके स्वारस्य का दाखवावे याबद्दल आता शंका वाटू लागली आहे सदर प्रकरणाची उच्चाधिकार अधिकारी मार्फत चौकशी करण्याची मागणी श्री थोरात यांनी केली असून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांच्याकडे सदर प्रकरणी चौकशी करावी म्हणून थोरात यांनी नीलेश घोंगे यांच्यामार्फत संपर्क साधल्याची माहिती त्यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

शिवसेनेची बुलंद आवाज मा.खा.संजयजी राऊत साहेब व नासिक जिल्हा संपर्क नेते मा.भाऊसाहेब चौधरी यांचे उद्या २४ आॅक्टोंबर रोजी नांदगाव मतदारसंघात आगमन

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

उद्या दि.२४ आॅक्टों.रविवार रोजी नांदगाव मतदारसंघात शिवसेना पक्षाचे खासदार मा.संजयजी राऊत साहेब तसेच नासिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे विकासकामांच्या
उद् घाटनासाठी शहरात आगमन होणार आहे.आॅक्सिजन प्लांट, मनमाड व नांदगाव तसेच १५ व्या वित्तआयोगातुन १४ कोटींच्या विविध विकासकामांचे भुमिपुजन मा.संजयजी राऊत व भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते होणार असल्याचे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहासअण्णा कांदे यांनी सांगीतले असुन त्याप्रसंगी कार्यकर्ता मे़ळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे तरी सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक ,महीला आघाडी यांच्यासह नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नवरा – बायकोचा अश्लील व्हिडीओ कॉलचा धंदा ; ब्लॅकमेल करून लाखोंची कमाई !

0

 

SURYA MARATHI NEWS

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था लोकांचे नग्न व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या गँगचा गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गँगचा म्होरक्या योगेश गौतम आणि त्याची पत्नी सपना गौतम यांना अटक केली. हे पती पत्नी अन्य राज्यातील लोकांना ब्लॅकमेल करत होते. आतापर्यंत यांनी अनेकांकडून कोट्यवधी रूपये उकळले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

बऱ्याच काळापासून हा ग्रुप लोकांना ठगत होता. गाझियाबाद पोलिसांनी राजकोटच्या व्यक्तीच्या तक्रारीनंतर या गँगचा पर्दाफाश केला. तुषार नावाच्या व्यक्तीनं राजकोटमध्ये तक्रार दाखल केली होती. त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून ८० लाख रूपये उकळण्यात आले

 

या गँगकडून अनेक पॉर्न व्हिडीओ, आपत्तीजनक सामग्री, लॅपटॉ, मोबाईल, अश्लिल सीडी, मेमरी कार्ड, पेन ड्रायईव्ह, रोख रक्कम, चादीचे दागिने जप्त केले असून ८ बँक खात्यांची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. ही गँग नाशिक, दिल्ली-एनसीआरमध्ये सक्रिय होती. राजकोटमधील एका व्यक्तीला ठगून त्यांनी लाखो रूपये लूटले होते.

या गँगच्या म्होरक्याची पत्नी काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याची आयडिया मिळाली. दोन वर्षांपासून पती पत्नी मिळून ही गँग चालवत होते. हे दोघं मुलांना पैसे देण्याचं आश्वासन देऊन अश्लिल व्हॉईस कॉल आणि न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास सांगत होते. यात जे लोक अडकायचे त्यांना पर्सनल व्हॉट्सअॅप क्रमांक देऊन अश्लिल व्हिडीओ चॅट करत होते, अशी माहिती गाझियाबाद सिटी एसपी निपुण अग्रवाल यांनी दिली.

जी मुलगी व्हिडीओ चॅट करायची तिला महिन्याला २५ हजार आणि जी केवळ कॉल करायची तिला महिन्याला १० हजार रूपये दिले जात होते. एका वेबसाईटवर आपला बनावट आयडी तयार करून हा प्रकार केला जात होता. एखाद्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढून नंतर धमकी देत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली जायची असंही पोलिसांनी सांगितलं.

किनगावात तहसिलदारांचे पीएम किशानचे खाते हॅक करीत ३८ जणांच्या नोंदी केल्या म्हणुन एका विरूध्द आयटी अँक्ट अन्वये गुन्हा

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगावात एका सेतु सुविधा केंद्र चाल काने थेट यावल तहसिलदारांचे पीएम किशानचे खाते हॅक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासुन तहसिल कार्यालयात पीएम किशान संर्दभातील नोंदी थांबवण्यात आल्या होत्या व तरी देखील ३८ नोंदी झाल्या कशा या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला व हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तहसिल कार्यालयातील लिपीक दिपक शांताराम बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार तीन वर्षापासुन तहसिल कार्यालयात त्यांच्या कडे महसुल सहाय्यक म्हणुन कामकाज आहे व त्याअनुशंगाने ते मागील दोन वर्षापासुन पि.एम.किसान सन्मान निधी योजनेचे कामकाज पाहत आहेत. सदर योजनेत शेतकऱ्यांचे नोंदणी करणे (रजिस्ट्रेशन), आधारकार्ड वरील नाव दुरुस्ती करणे, चुकीचा खाते क्र.असल्यास ते दुरुस्त करणे, शेतकऱ्यांचे शिवार बदल करणे आदी कामे ते ऑनलाइन पि.एम. किशानच्या संगणकीय संकेतस्थळावर तहसिलदारांच्या आदेशाने करत होते. मात्र दिनांक १४ ते ३० सप्टेंबर या कलावधीत तहसिलदार महेश पवार यांच्या सुचने वरून त्यांनी काम बंद ठेवले होते व संकेतस्थळाचे लॉगीन व आयडी त्यांना तहसिलदार महेश पवार यांच्या परवानगीनेचं उपलब्ध् व्हायचे म्हणुन ते देखील बंद होते दरम्यान दिनांक १४ ते ३० सप्टेंबर दरम्यान नोंदणी बंद असतांना या पिएम किशान संकेतस्थळावर ३८ शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शना आले व त्यांनी या बाबत थेट तहसिलदार महेश पवार यांना विचारणा केली तेव्हा तहसिलदारांच्या लॉगीन आय-डी या पोर्टल वर परवानगी शिवाय संकेतस्थळ हँक करून ललित नारायण वाघ रा.किनगाव ता.यावल यांना कोणतेही अधिकार नसतांना ३८ शेतकऱ्यांच्या नोंदी टाकल्याचे समोर आले व या प्रकरणी आयटी अँक्ट सह विविध कलमान्वये ललीत वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार करीत आहे.
आधी पण नोंदी केल्याचा संशय.
पैसे घेवुन पि.एम.किसानच्या नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या म्हणुन आपण आपल्याचे कर्मचाऱ्यांवर संतप्त होत काम सद्या बंद ठेवण्याच्या सुचना केल्या तेव्हा ३८ नोंदी झाल्याचे समोर आले व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलावुन त्यांचे जवाब घेतले असता नोंदणी करीता किनगाव सेतु केंद्रात प्रत्येकी एक हजार रूपये घेतल्याचे त्यांनी सांगीतंले तर बाहेरील व्यक्ती करीत असलेल्या गैरप्रकारात महसुल प्रशासन बदनाम होते.असे तहसिलदार महेश पवार यांनी सांगीतले- आहे

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, देण्यात आलेले गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

0

 

 

SURYA MARATHI NEWS

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, २०२० करिता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वेबलिंकद्वारे उपरोक्त माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे: (१) आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet: लिंकवर क्लिक करावे. (२) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी. (३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाइल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे. (४) लॉगीन केल्यानंतर गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल. विहित कार्यपध्दतीनुसार गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. उपरोक्त सुविधा ही वरील वेबलिंकवर दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत उपलब्ध राहील.

महसूलमंत्र्याच्या या तालुक्यातील बैंकेत 56 लाखाचा अपहार

0

 

SURYA MARATHI NEWS

अहमदनगर ऑक्टोबर 2021 :- या बैंकेत बनावट कागदपत्र तयार करून कर्ज प्रकरणे मंजूर करून घेतले व बँकेच्या पैशाचा स्वतःच्या फायद्या करिता अपहार (गोटाला )करून चक्क एक बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर शहरातील तत्कालीन युनियन बँकेच्या व्यवस्थापकासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन कुमार, रूपेश धारवाड (दोघांचा पत्ता माहीत नाही) व विलास एल. कुटे (गणपती मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत समाधान सीताराम पवार (वय ३५, रा. रामनगर, सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
की सन २०११ ते २०१३ दरम्यान युनियन बँक ऑफ इंडियाचे (पूर्वाश्रमीची कार्पोरेशन बँक) तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, सिंगल विडो ऑपरेटर रूपेश धारवाड व मध्यस्थ विलास कुटे यांनी संगनमताने १५ जणांच्या नावावर शेतीसाठी कर्जप्रकरणे मंजूर केली होती.
या कर्ज खात्याच्या अनियमिततेमुळे चौकशीसाठी आलेल्या पुणे येथील विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रश्नाच उडवाउडवीच्या उत्तरामुळे संशय बळावल्याने, बैंक शाखा व्यवस्थापक समाधान पवार यांना सविस्तर चौकशी करण्यास सांगितले.
यामध्ये बँकेच्या तत्कालीन शाखाधिकारी नितीन कुमार यांनी दि. १/१/२०११ ते दि. ३१/२२/२०१३ बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरणे मंजूर करून ५६ लाखांचा अपहार केला. या कामासाठी त्यांना रुपेश आर. धारवड, विलास एल कुटे (रा. गणपती मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर) दोघांनी सहकार्य केले.
हा अपहार उघडकीस आल्यानंतर शाखा व्यवस्थापक समाधान पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, रुपेश आर. धारवड, विलास एल. कुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरु आहे

SURYA MARATHI NEWS

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी मा.श्री.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची बिनविरोध निवड

0

 

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

निलंगा मतदार संघाचे लोकप्रिय नेते. मा.श्री.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल निटूर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी भैय्यासाहेबांचा सत्कार करून सन्मान केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,यावेळी सुरेंद्र धुमाळ, रामभाऊ गायकवाड,दिलीप हुलसुरे,दिनकर निटूरे,बापूसाहेब मोगरगे,रमेश मोगरगे,विष्णु पाटील, अशोक निटूरे,जब्बार चाऊस,नर्सिंग ढाकणे,सत्यप्रकश होळीकर, ज्ञानेश्वर पिंड,राम बिराजदार,विकास पाटील,शेख नवाब,दिलीप सुर्यवंशी आदी कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.